मित्रानो स्मार्टफोन उत्पादक itel ने आपले itel A50 आणि itel A50C या दोन नवीन बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन13 ऑगस्ट रोजी भारतात लॉन्च करण्यात केलेले आहे . हे स्मार्टफोन चीनी ब्रँड इटेलचे नवीनतम उत्पादन आहेत आणि विविध रंगांच्या पर्यायात उपलब्ध आहेत.तसेच या फोनमध्ये Unisoc T603 प्रोसेसर वापरलेला आहे. त्यात 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे. तसेच itel A50 मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे, तर A50C मध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी असणार आहे.तसेच यात iPhone सारखा Dynamic Bar फिचर आहे, ज्यामुळे तुम्ही नोटिफिकेशन्स आणि इतर माहिती सहजपणे पाहू शकता. चला तर मित्रानो या 7,000 पेक्षा कमी किंमत असलेल्या स्मार्टफोन मधील स्पेसिफिकेशन्स बघुया
Itel A50, Itel A50C Price in India
भारतामध्ये, itel A50 स्मार्टफोनच्या 3GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ही ₹6,099 असून 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंट ₹6,499 इतक्या किमतीत उपलब्ध आहे. तसेच हा फोन Cyan Blue, Mist Black, Lime Green, आणि Shimmer Gold या रंगांमध्ये उपलब्ध आहे आणि सध्या Amazon वर विक्रीसाठी आहे. दुसरीकडे, itel A50C च्या 2GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत हा ₹5,699 आहे, आणि हा फोन Dawn Blue, Misty Aqua, आणि Sapphire Black या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Itel A 50, Itel A 50C Specifications
Specification | Itel A 50 | Itel A 50C |
---|---|---|
Operating System | Android 14 (Go Edition) | Android 14 (Go Edition) |
Display Size | 6.56 inches | 6.6 inches |
Dynamic Bar | Yes | Yes |
Processor | Octa-core Unisoc T603 | Octa-core Unisoc T603 |
RAM Options | 3GB and 4GB | 2GB |
Storage | 64GB (standard) | 64GB |
Memory Fusion | RAM can be virtually expanded up to 8GB (for 4GB variant) | Not available |
Main Rear Camera | 8-megapixel AI-backed | 8-megapixel AI-backed |
Front Camera | 5-megapixel | 5-megapixel |
Fingerprint Sensor | Side-mounted | Side-mounted |
Face Unlock | Yes | Yes |
Battery Capacity | 5,000mAh | 4,000mAh |
Charging Support | 10W | 5W |
Dimensions | 163.8 x 75.7 x 8.7 mm | 163.9 x 75.7 x 9.4 mm |
- Software : (Android 14 Go Edition): या स्मार्टफोन्स मध्ये Android 14 (Go Edition) हे Google द्वारा कमी शक्तीच्या उपकरणांसाठी डिझाइन केलेले Android चे एक प्रकार वापरलेला आहे. हे अधिक हलके आहे आणि कमी RAM असलेल्या डिव्हाइसवर कार्यक्षमतेसाठी ऑप्टिमाइज्ड केलेले आहे. यामध्ये काही Google अॅप्स आणि अॅप्सचे लाइट वर्जन असतात ज्यामुळे वेगवान आणि सुसंगत वापर अनुभव मिळतो.
- Display : Itel A 50 मध्ये 6.56-इंचाचा डिस्प्ले दिलेला आहे ज्याचे रिजोल्यूशन आणि पिक्सल डेंसिटी स्क्रीनवर स्पष्टता आणि सुस्पष्टता देतात. तर Itel A50C यामध्ये 6.6 -इंचाचा डिस्प्ले आहे ज्यात काहीच किंचित अधिक स्क्रीन रिअल इस्टेट आहे. ह्या डिस्प्लेचा आकार अधिक विस्तृत व स्पष्ट दृश्य अनुभव देतो.
- Dynamic Bar : या स्मार्टफोन्स मध्ये डायनॅमिक बार हे एक विशेष फिचर आहे ज्यामुळे तुम्हाला डिस्प्लेवरील होल पंच कटआउटच्या आजुबाजूला विविध प्रकारच्या नोटिफिकेशन्स (जसे कॉल्स, बॅटरी स्टेटस) सहजपणे पाहता येतात. यामुळे तुम्ही त्याचवेळी सूचना आणि माहिती बघू शकता.
- Processor (Unisoc T603) : यामध्ये Unisoc T603 हा एक ऑक्टा-कोर चिपस वापरलेला आहे. हा प्रोसेसर गेमिंग, मल्टीटास्किंग, आणि सामान्य वापरासाठी पुरेशी गती आणि कार्यक्षमता प्रदान करतो.
- Ram and Storage : Itel A 50 मध्ये 3GB आणि 4GB RAM पर्याय उपलब्ध आहेत. 4GB RAM वेरिएंटसाठी Memory Fusion तंत्रज्ञानामुळे ८GB पर्यंत RAM वर्चुअली वाढवता येते, ज्यामुळे अधिक अँप्स एकाच वेळी चालवता येतात.तर Itel A50 C मध्ये 2GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज. हा स्टोरेज आकार तुम्हाला अपलोड केलेले डेटा, अँप्स आणि मीडिया सुरक्षितपणे ठेवण्यास मदत करतो.
- Camera : Rear Camera : AI सपोर्टेड 8 मेगापिक्सलचा कॅमेरा म्हणजे अधिक चांगले आणि स्पष्ट फोटोज , तसेच AI तंत्रज्ञानामुळे कॅमेरा अधिक चांगले रंग, सुस्पष्टता, आणि कमी प्रकाशात देखील गुणवत्ता प्रदान करतो.
Front Camera : सेल्फी साठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, जो सेल्फी क्लिक करण्यासाठी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी चांगला आहे.
- Security : या स्मार्टफोन्स मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर फोनच्या साइडवर दिलेला आहे, जो फिंगरप्रिंट स्कॅन करून सुरक्षा प्रदान करतो. हे वापरणे सोपे असून याने त्वरित मोबाईल अनलॉकिंक होतो.तसेच यामध्ये फेस अनलॉक ची सुविधा दिखील देण्यात आलेली आहे, जी चेहऱ्याची ओळख करून सुरक्षा सुनिश्चित केली जाते.
- Battery: Itel A50 या स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी दिलेली आहे ज्यामुळे दीर्घकालीन वापरासाठी दिलेली हे आणि 10W चार्जिंग सपोर्टसह जलद चार्जिंग करता येते. तसेच Itel A50C मध्ये 4000 mAh बॅटरी दिलेली आहे , जी कमी क्षमतेसह 5W चार्जिंग सपोर्टसह येते , यामुळे नियमित वापरासाठी पुरेशी बॅटरी चार्जिंग मिळवता येते.
FAQ
Itel A50 आणि Itel A50C कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतात?
A50 आणि Itel A50C दोन्ही Android 14 (Go Edition) वर चालतात, जे कमी संसाधन असलेल्या उपकरणांसाठी सुधारित कार्यक्षमता प्रदान करते.
या फोनमध्ये कोणत्या प्रकारचा फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर आहे?
Itel A50 आणि Itel A50C दोन्ही साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सपोर्टसह आहेत.