पुणे जिल्यातील दोन मोठे तालुके आंबेगाव, जुन्नर या ठिकाणी बिबट्यांची (Leopard) संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आणि यामुळे होणारे बिबट्यांचे हल्लेही वाढत चाललेले आहे. बिबट्या हल्यामुळे मानवाचे सोडाच पाळीव प्राणीही सुरक्षित ठिकाणी बंदिस्थ अवस्थेत ठेवावे लागत आहेत.
शासनाकडून काहीही ठोस उपाययोजना नाहीत
बिबट्या (Leopard) मुळे आंबेगाव, जुन्नर तालुक्यांमध्ये दिवसा आणि रात्री होणाऱ्या हल्या पासून वाचण्यासाठी शासनाकडून काहीही ठोस उपाय योजना केल्या जात नाहीत. यामुळे कुटुंब आणि आपले पाळीव प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी आपल्या घराच्या चारही बाजूने दहा फुट उंच असे लोखंडी जाळी मारून घेत आहेत. यामुळे संरक्षण तर होईल परंतु शेतकऱ्याचा खिशाला जवळ जवळ दोन लाखाची कात्री बसत आहे.

वनविभाग कर्मचारी काय करतात
सर्वात महत्वाचे म्हणजे बिबट्याचा (Leopard) वन्य जीव श्रेणी एक मध्ये समावेश असल्यामुळे, बिबट्या फक्त पिंजरा लावून जेरबंद करणे आणि जंगलामध्ये सोडून देणे एवढेच काम वनविभागाचे कर्मचारी करू शकतात, त्यांचे हि हात कायद्याने बाधील आहेत. आंबेगाव, जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची वाढलेली संख्या आणि शेतकरी, राजकीय व्यक्ती यांच्याकडून मानहानीची मागणी या सर्व कारणांमुळे अधिकारी हतबल होऊन बसले आहेत.
बागायती ऊस क्षेत्र जास्त
आंबेगाव, जुन्नर तालुक्यामध्ये ऊस कारखाने असल्यामुळे, उसाला भाव चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी ऊस शेतीकडे वळले आहेत. दोन्ही तालुके आणि शेजारील क्षेत्रात ऊस शेती खूपच जास्त प्रमाणात वाढली आहे. बिबट्याला (Leopard) उसात लपून बसण्यास योग्य जागा मिळात आहे. आणि सध्याच्या काळात मानवावर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले हि खूप होत आहे.

बिबट्या (Leopard) हल्यात मृत पावलेली लोकांची संख्या
फक्त जुन्नर तालुक्यामध्ये मागील २४ वर्षामध्ये ५० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणि १५० पेक्षा जास्त जण बिबट्याच्या (Leopard) हल्यात गंभीर जखमी झाले आहेत. ऊस शेती जास्त असल्यामुळे अनेक वेळा बिबट्याने मनुष्य वर हल्ला करून उसात ओढत नेले आहे त्यामुळे वाचवता हि येत नाही. उघड्यावर झोपणे, शेतात वाकून काम करणे, रस्त्याच्या कडेला लघुशंकेला थांबणे, रात्री नदीच्या पुलावरून प्रवास करणे, दुचाकीवरून शेतातून हाणे, रात्री अंगणात बसने बहुतेक अश्या वेळेसच बिबट्याने मानवावर हल्ले केले आहेत.
कुत्रांची संख्या झाली कमी
मानवी वस्ती मध्ये एकतर पाळीव प्राणी किंवा मनुष्यावर बिबट्या हल्ला करतो. सध्या शेतकऱ्यांनी बिबट्या पासून पाळीव प्राणी आणि स्वताची सुरक्षा करण्यासाठी घराच्या चारही बाजूला उंच कम्पाउंड केले आहे. बिबट्यांनी शेतकऱ्यांची पाळीव कुत्री हि सोडली नाहीत, पाळीव कुत्र्यान्सहित भटकी कुत्री हि जवळ जवळ बिबट्याने संपवलीच आहेत.
