आता आपल्या भारतीय ग्राहकांसाठी Lava एक नवीन फोन लाँच करत आहे. Lava Blaze 3 5G असे या नव्या मोबाईलचे नाव आहे. Amazon वर या नव्या फोनचे लँडिंग पेज लाईव्ह करण्यात आले आहे. Vibe Light segment मध्ये प्रवेश करणारा हा Lava चा पहिला मोबाईल असणार आहे. हा मोबाईल प्रीमियम ग्लास बॅक डिझाईनसह आणला जाणार आहे. मोबाईलची किंमत, मोबाईलचे खास फीचर्स कंपनीने मोबाईल लाँच होण्या पूर्वीच सांगितले आहेत.
रोजच्या रोज बाजारात नवनवीन फीचर्स आणि लेटेस्ट लूक असलेले स्मार्ट फोन लाँच होत आहेत. सगळेच मोबाईल आपल्या ग्राहकांच्या गरजा पाहून डिझाईन केले जात आहेत. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फीचर्स कसे देता येतील याचा विचार सगळ्याच कंपन्या करतात. जास्त मेमरी, चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा, सिक्युरिटी फंक्शन सगळेच सर्वोत्तम कसे देता येईल याचा विचार करूनच नवीन नवीन मोबाईल डिझाईन तयार होत आहेत.
One plus, iPhone सारखे महागडे मोबाईल सर्वांनाच परवडतात असे नाही. सामान्य माणसाला परवडेल आणि त्याच्या गरजा भागून थोडीफार हौस पूर्ण होईल अश्या स्वस्त आणि मस्त मोबाईल बद्दल जाणून घ्यायला सामान्य माणूस उत्सुक असतोच. अश्याच सामान्य माणसांची गरज ओळखून Lava ने एक नवा स्मार्ट फोन लाँच होण्याचा टिजर लाँच केला आहे. चिनी मोबाईलला भारी पडेल असा हा मोबाईल लवकरच सामान्य माणसाच्या हातात असेल. चला तर मग जाणून घेऊया काय काय आहेत याचे फीचर्स त्याबद्दल.
No | Specs | Details |
---|---|---|
1 | Display | 6.56 inch, lcd screen, 720×1600 pixel, 90 hz refresh rate |
2 | Camera | 50 MP + 2 MP (1080 p FHD Video Recording) |
3 | Processor | MD 6300 Chipset, 2.4 Ghz, Octa core processor |
4 | Ram | 6 GB Ram + 6 GB Virtual Ram |
5 | Storage | 128 GB Inbuilt Rom + 1TB Memory Card Slot |
6 | Connectivity | 4G, 5G, VoLTE |
7 | Battery | 5000 mah Battery, 18W Fast Charger |
LAVA Blaze 3 5G Processor and RAM storage
MediaTek D6300 हा प्रोसेसर या लावाच्या नव्या मोबाईलमध्ये वापरला गेला आहे.
मोबाईल म्हणले की एक महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे मोबाईलमध्ये storage किती मिळत आहे तो. चांगल्या storage चा mobile घेतला की त्यात बऱ्याच गोष्टी साठवता येतात आणि हँग होण्याचे प्रमाणही कमी होते म्हणून मोबाईल खरेदी करताना हमखास पाहिले जाते ते मोबाईल मध्ये storage किती मिळेल याबद्दल. या मोबाईलच्या storage बद्दल बोलायचे झाल्यास 6 GB RAM आणि 128 GB UFS storage सह मिळणार आहे. किमतीच्या मानाने हे खूप चांगले फीचर्स आहेत.
LAVA Blaze 3 5G Colour options
Lava ने हा मोबाईल दोन कलर ऑप्शन्स सह आणला आहे. ग्लास ब्ल्यू आणि ग्लास गोल्ड असे दोन ऑप्शन आहेत. यात 6.56 HD+ punch hole display असणार आहे. या मोबाईलचा रिफ्रेश रेट 90hz आहे.
LAVA Blaze 3 5G camera
मोबाईलला कॅमेरे आल्यापासून सगळ्याच आठवणींचा खजिना आपसूक मोबाईलमध्ये साठवला जातो. सण समारंभाचे फोटो, कार्यक्रमाचे किंवा निसर्गाचे फोटो टिपण्यासाठी मोबाईलचा कॅमेरा चांगला असणे खूप गरजेचे असते.
Lava Blaze 3 5G या आगामी मोबाईलचा कॅमेरा 50 mp + 2 mp AI रेयर camera सह आणला गेला आहे. तर या मोबाईलचा सेल्फी कॅमेरा 8 mp आहे. या मोबाईलमध्ये vibe Light function चांगले कामी येणार आहे. जेव्हा वापरकर्ता कमी प्रकाशात व्हिडिओ रेकॉर्ड करत असेल तेव्हा vibe Light मुळे lighting adjust करता येईल आणि यामुळे कमी प्रकाशातही चांगले व्हिडिओ शूट होऊ शकतात. यामुळेच फोटोग्राफीचा खूप चांगला अनुभव वापरकर्त्याला मिळणार आहे.
LAVA Blaze 3 5G battery
प्रत्येक मोबाईलचा जीव म्हणजे बॅटरी. जर बॅटरी चांगली असेल तर मोबाईल वापरताना शक्यतो जास्त अडचणी येत नाहीत. या लावा मोबाईलच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाल्यास याची बॅटरी 5000mAh ची आहे. 18W चार्जर सपोर्ट या बॅटरीला देण्यात आला आहे.
LAVA Blaze 3 5G Price
कंपनी हा मोबाईल 9999/- रुपयांच्या स्पेशल किमतीसह लाँच करत आहे. लवकरच या मोबाईलच्या लॉन्चिंग तारीख जाहीर केली जाईल.
LAVA Blaze 3 5G box contains
Lava मोबाईलच्या बॉक्स मध्ये तुम्हाला स्मार्ट फोन, चार्जर adopter, चार्जिंग cod आणि सिम injector मिळणार आहे.
FAQ:-
1. Is Lava phone Chinese?
Lava is an Indian mobile company.
2. What is Price of Lava blaze 3 5G?
Launching Price of this mobile is ₹ 9999/-
3. Who is the CEO of Lava?
Hari Om Rai.