बापरे कोण घेणार हि गाडी ? तीन कोटी रुपये पण फीचर्समध्ये  कुठेच कमी नाही- Defender 130

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

land Rover कंपनीची डीफेंडर ( Defender 130 ) हि गाडी सध्या खूपच चर्चेचा विषय बनली आहे. हि गाडी खूप उंच, खूप लांब, खूप मोठी, आणि ८ सीटर आहे. land Rover कंपनीने डीफेंडर चे डीझेल, पेट्रोल आणि इंजिन क्षमतेनुसार जवळ जवळ ३० मोडेल बाजारात आणले आहेत.  गाडीचे लूक आणि फीचर्स चे लोक दिवाने झाले आहेत.  भारतात आल्यापासून भरपूर मोडेल ची विक्री झाली आहे.

Defender ची किंमत लाखांपासून कोटींपर्यंत

या गाडीचे जवळ जवळ ३० मोडेल आहेत. इंजिन क्षमतेनुसार गाडीची एक्स शोरूम किंमतही रु. ९३.५५ लाखापासून सुरु होऊन टोप मोडेल रु. २.३० कोटी पर्यंत आहे.  सर्वात कमी रुपयात म्हणजेच ९३.५५ लाखाला डीफेंडर मध्ये Defender 110 SE 2.0 Petrol हे व्हेरीएंट मिळते, यामध्ये 2.0 लिटर इंजिन आहे, आणि सर्वात महाग Defendar 110 Carpathian 5.0 हे मोडेल उपलब्ध आहे, या मोडेल मध्ये 5.0 लिटर हे इंजिन आहे. या दोन मोडेल मधील जवळ जवळ २८ व्हेरीएंट मधील फरक हा इंजिन आणि पेट्रोल, डीझेल चा आहे. या व्यतिरिक्त Defender 90 HSE 2.0 Petrol, 90 HSE DIESEL, 110 HSE पेट्रोल असे भरपूर व्हेरीएंट आहेत.

DEFENDER मायलेज किती

Defender या गाडीचे  मायलेज हि चांगले आहे. फ्युल नुसार मायलेज कमी जास्त आहे. पेट्रोल आटोमेटीक मध्ये 2.0 लिटर इंजिन मध्ये गाडी ९.२४ किमी/लिटर मायलेज देते तरपेट्रोल आटोमेटीक मध्ये 3.0 लिटर इंजिन मध्ये गाडी ८.७९ किमी/लिटर चे मायलेज देते. डीझेल मधे आटोमेटीक मध्ये 2.0 लिटर इंजिन मध्ये गाडी १२.०४ किमी/लिटर मायलेज देते तर डीझेल आटोमेटीक मध्ये 3.0 लिटर इंजिन मध्ये गाडी ११.५ किमी/लिटर चे मायलेज देते.डीझेल आणि पेट्रोल व्हेरीएंट ची तुलना केली तर गाडी कमीत कमी ६.८ किमी/लिटर  आणि जास्तीत जास्त १३.२ चे मायलेज देते.

हे हि वाचा -  भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी गाडी कोणती- Top Selling Cars In India

Defender हायब्रीड चे मायलेज ४० किमी/ लिटर

पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे Defender हि गाडी हायब्रीड मध्ये हि उपलब्ध आहे. हायब्रीड म्हणजे पेट्रोल आणि इलेक्ट्रिक एकत्रित काम करते. हायब्रीड मध्ये कंपनीने सध्या एकच व्हेरीएंट लौंच केले आहे. या व्हेरीएंट ची एक्स शोरूम किंमत १.४७ कोटी एवढी आहे. आणि बेटरी सोबत पेट्रोल वर गाडी चालवली तर कंपनी क्लेम नुसार ४० किमी/ लिटर चे मायलेज मिळते. या मोडेल ची सिटींग कॅपेसिटी हि पाच ची आहे. आहे गाडी थोडी छोटी केली आहे.

Defender सर्वात लांब, उंच आणि मोठी गाडी

Defender हि गाडी खूपच लांब, खूपच उंच आणि खूपच मोठी असल्यामुळे कोणत्याही रस्त्यावर चालवायला अडचण येणार नाही कुठेही अडकणार नाही. या गाडीची लांबी हि ५०१८ मिमी, रुंदी हि २१०५ मिमी, उंची हि १९६७ मिमी, वजन जवळ जवळ २६०० किलो आहे. ग्राउंड क्लिअरन्स हि खूपच मोठ्ठा म्हणजेच २२८ मिमी इतका देण्यात आला आहे. गाडीमध्ये ५ मजबूत दरवाजे सहित १६० लिटर चा बूट स्पेस देण्यात आला आहे. इंधन टाकी ची केपेसिटी हि ८५ लिटर ची आहे.

Defender १३० हे मोडेल 8 सीटर

कंपनीने Defender चे नाविन मोडेल १३० हे लौच केले आहे यामध्ये 8 सीटर ची जागा मिळते. या व्हेरीएंट ची किंमत एक्स शोरूम १.२२ कोटी रुपयांपासून टोप मोडेल एक्स शोरूम किंमत २.८५ कोटी रुपये इतकी आहे. १३० मोडेल मधेही 2.0 लिटर इंजिन पासून 5.0 लिटर इंजिन पेट्रोल आणि डीझेल मध्ये  उपलब्ध आहे.  Defender 130 मध्ये लग्झरी सर्व फीचर्स दिले आहेत. स्तेडियम स्टाईल मध्ये सिटींग मिळते त्याचप्रमाणे तीनही रोमध्ये पेसेंजर एकदम आरामदायक प्रवास करू शकतात. ३६० डिग्री कॅमेरा, मेट्रिक्स एल.इ.डी. लाईट, वायर लेस चार्जिंग, २० इंच आलोय व्हील, ११.४ इंच  अशी मोठी टचस्क्रीन हे सगळे फीचर्स मिळतात. याशिवाय महत्वाचे म्हणजे फोअर झोन ए.सी. सिस्टीम मिळते ज्यामुळे गाडीमधील प्रत्येक पेसेंजर ला सारखी थंड हवा मिळते.

हे हि वाचा -  Honda Activa ला टक्कर देणारी TVS Jupiter 110 झाली आहे भारतात लाँच, बघा किंमत आणि डिझाईन.

Defender कुणाकुणाकडे आहे भारतात

Land Rover Defender हि गाडी भारतामध्ये सध्या खूप अभिनेते, बिसनेसमन यांच्याकडे पहायला मिळते. मुकेश अंबानी यांच्याकडे ग्रे कलर मध्ये Defender ११० हे मोडेल आहे तसेच प्रसिद्ध अभिनेता सनी देओल याकडे व्हाईट कलर मध्ये आहे. त्याचप्रमाणे अर्जुन कपूर, आयुष शर्मा, विजय वसंत, पृथ्वीराज, रवी तेजा या सर्व बॉलीवूड अभिनेत्यांकडे Defendar आहे. इंडिअन एक्स्प्रेस चे एम.डी. आणि चेअरमन श्री. विवेक गोनेखा यांना हि महागड्या कार कलेक्ट करण्याचा चंद आहे, त्यांच्याही कार कलेक्शन मध्ये Land Rover Defendar हिहि गाडी आहे. 

2 thoughts on “बापरे कोण घेणार हि गाडी ? तीन कोटी रुपये पण फीचर्समध्ये  कुठेच कमी नाही- Defender 130”

Leave a Reply