‘मुख्यमंत्री माझी ladaki bahin’ योजनेसाठी ठरवलेल्या निकषांमध्ये अनेक लाभार्थ्यांचा समावेश होत नाही, अशी शक्यता आहे. त्यामुळे अशा महिलांनी स्वत:हून आपले नाव योजनातून कमी करून महिला व बाल कल्याण विभागाच्या ladaki bahin लेखाशीर्षावर पैसे भरावेत, अशी सूचना विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी केली आहे. यामुळे निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभांवर मर्यादा येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निकष पूर्ण न करणाऱ्यांसाठी इशारा
डिसेंबरपर्यंत या योजनेतील निधी वितरित न झाल्याने लाभार्थ्यांच्या तपासणीची चर्चा सुरू होती. मात्र, मंत्री अदिती तटकरे यांनी ladaki bahin योजनेतील लाभार्थ्यांची तपासणी होणार नसल्याचे सांगितले होते. दुसरीकडे, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांनी स्वत:हून योजना सोडावी, अन्यथा त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल केली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे ladaki bahin लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
also read – california मधील जंगलातील अग्नितांडव : पूर्ण शहर उद्ध्वस्त
योजनेचे निकष आणि लाभार्थींची अट
Ladaki bahin योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांचे वय १८ ते ६५ दरम्यान असणे, वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असणे, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसणे, तसेच चारचाकी वाहनाचा मालक नसणे आवश्यक आहे. याशिवाय, संजय गांधी निराधार योजना किंवा तत्सम योजनांचा लाभ घेतलेल्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
‘लेक लाडकी’ योजनेसाठी नवे उद्दिष्ट
महिला व बाल कल्याण विभागाने ‘लेक लाडकी’ योजनेसाठी सुमारे अडीच लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यांतून आलेल्या अर्जांना मान्यता देऊन रक्कम थेट मुलींच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अधिकाधिक लाभार्थ्यांनी अर्ज करावा, यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी दिले आहेत.