बेळगाव—belgavkar—belgaum : रायबाग : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चिकोडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी ठार झाल्याची घटना गुरुवारी नंदी कुरळी (ता. रायबाग) येथे घडली. एम. मंजुनाथ सत्तीगेरी पी. सत्तीगेरी (वय 26, रा. केसरकोप्प, महालिंगपूर) असे ठार झालेल्या पोलिसाचे नाव आहे.
मंजुनाथ हे चिकोडी पोलीस ठाण्यात सेवा बजावत होते. गुरुवारी सकाळी पोलीस ठाण्याच्या कामासाठी दुचाकीने कुडची (ता. रायबाग) येथे गेले होते. तेथून काम आटोपून चिकोडीकडे येताना नंदीकुरळी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन मंजुनाथ हे दुचाकीवरून रस्त्याकडेला असलेल्या दगडांवर आपटले. दुचाकीच्या धडकेत हेल्मेट निसटून पडल्याने दगडावर डोके आपटून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Belgaum Police Accident MotorcycleCrash #RoadSafety #TrafficAccident #Manjunath #SadNews #Condolences #PoliceLife #CommunitySupport #SafetyFirst #TragicEvent #LocalNews #Awareness #HelmetSafety #RIP #JusticeForManjunath
kudachi chikodi belgaum police accident motorcyclecrash