KSRTC Employees To Begin Indefinite Strike From December 31
KSRTC employees to begin strike from December 31; buses to go off-road
बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : वेतन थकबाकी, आरोग्य योजनेसह विविध मागण्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचार्यांनी 31 डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. याबाबत सरकारला नोटिस देण्यात आली आहे (employees of all 4 State road transport corporations will begin an indefinite strike on December 31) सोमवारी सरकारकडून काहीच निर्णय न आल्यास मंगळवारपासून कर्मचारी संपावर जाणार आहेत.
Karnataka State Road Transport Corporation (KSRTC (Karnataka))
सरकारने सोमवारी कामगार आयुक्तांच्या नेतृत्वाखाली बैठक बोलावली आहे. परिवहन महामंडळाच्या चारही विभागांतील प्रतिनिधींचा समावेश असणार्या संयुक्त कृती समितीने तीन महिन्याआधीच संपाबाबतची माहिती जाहीर केली होती. बेळगावातील सुवर्णसौधमध्ये आयोजित हिवाळी अधिवेशनावेळी परिवहन कर्मचार्यांनी आंदोलन केले. त्याचवेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना बेमुदत संपाबाबत नोटीस देण्यात आली होती. याची दखल घेताना अधिवेशन झाल्यानंतर बैठक बोलावण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी जाहीर केले होते.
पण, माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनामुळे बैठकी होऊ शकली नाही. मागील आठवड्यात काँग्रेसचे अधिवेशन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन यामुळे बैठक पुढे ढकलण्यात आली. ही बैठक सोमवारी होत आहे.
राज्य सरकारने शक्ती योजना जारी केल्यापासून परिवहन महामंडळाचे चारही विभाग फायद्यात आहेत. पण कर्मचार्यांची वेतन थकबाकी, वेतनवाढ, निवृत्त कर्मचार्यांची बाकी देण्यात आली नाही. एकूण ₹ 6468 कोटींची थकबाकी असून ती मंजूर करण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. इंधन, सुटे भाग, देखभाल खर्च वाढला आहे. त्यातच आता थकबाकी वाढत चालला असून त्याची जुळवाजुळव करणे कठीण जात आहे. सरकारने 2023-24 मध्ये विशेष भांडवलीसाठी 600 कोटी रुपये शासनाने दिले होते. मोटार वाहन कर अंतर्गत 581.47 कोटी रुपयांची सूट दिली होती. तरीही परिवहन महामंडळे नुकसानीत आहेत.
मागण्या काय? :
25 टक्के वेतनवाढ
38 महिन्यांचे थकीत वेतन
निवृत्त कर्मचार्यांची थकबाकी
सुट्टीच्या पगाराची थकबाकी
भविष्य निर्वाह निधी
इंधन पुरवठादारांची थकबाकी
सुटे भाग पुरवठादारांची थकबाकी
कर्ज थकबाकी
महामंडळांना द्यावयाची थकबाकी
KSRTC employees to begin strike from December 31
KSRTC employees to begin strike from December 31
KSRTC employees to begin strike from December 31