बेळगावमधून गॅस कटर… एटीएम मशीन फोडून 18 लाख रुपये…

Belgaum Belgavkar
2 Min Read

कोवाड (चंदगड, कोल्हापूर) : शनिवारी रात्री चोरट्यांनी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रातील एटीएम मशीन गॅस कटरने फोडून 18 लाख 77 हजार 300 रुपयांची रोकड चोरुन नेली. ATM मशीन फोडण्यासाठी वापरलेले गॅस कटर बेळगावमधून खरेदी केल्याची खात्रीलायक माहिती आता पोलिसांच्या हाती लागल्याने तपासाला गती आली आहे.

 

बेळगावमधून त्यांनी गॅस कटर खरेदी केले

चोरट्यांची आंतरराज्य टोळी असल्याने चंदगड, कोल्हापूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) यांची चार पथके राजस्थान, बेंगळुरु, मुंबई व बेळगावला रवाना झाली आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून चोरटे मुंबईहून बेळगावला आल्याचे निष्पन्न झाले आहे. बेळगावमधून त्यांनी गॅस कटर खरेदी केल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हातील लागले आहेत. त्या अनुषंगाने बेळगाव मधील त्यांचा वावर व त्यांच्या हालचालींची माहिती घेण्यासाठी चंदगड पोलिसांचे पथक रात्रंदिवस काम करत आहे.

 

- Advertisement -

तपासात चोरट्यांचा वावर असलेल्या अनेक ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने महत्वाची माहिती पोलिसांच्या हातील लागल्याचे समजते. चोरट्यांनी कोवाडमधीलचं एटीएम फोडण्यासाठी का निवडले, अशी चर्चा सुरू असल्याने गुढ वाढले आहे. त्यामुळे पोलिसानी स्थानिक पातळीवरही तपासावर भर दिला आहे.

चोरीच्या घटनेनंतर चोरट्यांनी निट्टूर, मलतवाडी, सांबरे, हडलगे मार्गे प्रवास केल्याने चोरीच्या पूर्वी त्याची रेखी केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे चोरट्यांना स्थानिक पातळीवरुन काही टिप्स मिळाल्यात का याचीही चौकशी होत आहे.

Kowad ATM Machine Robbery Belgaum
Kowad ATM Machine Robbery Belgaum

Kowad ATM Machine Robbery Belgaum

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *