कर्नाटक : सहलीसाठी गोकर्ण, अपघातात शिक्षकांसह एकूण 34 विद्यार्थी जखमी

Belgaum Belgavkar
2 Min Read

34 students, teachers on tour injured as bus overturns in Honnavar

कर्नाटक—belgavkar—belgaum @कारवार : खासगी वाहन उलटून शिक्षकांसह 34 विद्यार्थी जखमी झाल्याची दुर्घटना गुरुवारी रात्री होन्नावर तालुक्यातील मुगवा ग्रा. पं. मधील अरोळ्ळी येथे वळणावर घडली. 34 पैकी 4 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मणिपाल येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

Kolar School tourist Bus Accident In Honnavar

इतर विद्यार्थी व शिक्षक किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी होन्नावर सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. याबद्दल अधिक माहिती अशी, कोलार जिल्ह्यातील मुळूरू तालुक्यातील मास्तीहळ्ळी येथील कर्नाटक माध्यमिक शाळेचे विद्यार्थी शिक्षकांसह दोन खासगी वाहनातून सहलीसाठी श्रीक्षेत्र गोकर्ण येथे दाखल झाले होते. सहलीचा आनंद लुटून परतीच्या मार्गावर असताना 40 विद्यार्थी प्रवास करीत असलेल्या वाहनचालकाचा होन्नावर तालुक्यातील मुगवा ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील अरोळ्ळी येथील एका अवघड वळणावर वाहनावरील ताबा सुटला आणि ते वाहन पलटी झाले.

 

वाहनातील शिक्षकांसह एकूण 34 विद्यार्थी जखमी झाले. ही दुर्घटना गुरुवारी रात्री 12 वा. घडली. दुर्घटनेची माहिती मिळताच होन्नावर पोलिसांनी आणि स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी होन्नावर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. गंभीररित्या जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी मणिपालला हलविण्यात आले आहे. होन्नावर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

#KolarSchoolAccident #Honnavar #BusAccident #StudentSafety #InjuryReport #KarnatakaNews #EmergencyResponse #RoadSafety #TouristBus #SchoolTrip #AccidentInvestigation #LocalNews #CommunitySupport #HealthCare #PoliceResponse #TravelSafety #StudentWellbeing #Belgaum #Karnataka #AccidentAwareness

 

Kolar School tourist Bus Accident In Honnavar

Kolar School tourist Bus Accident In Honnavar

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *