KMF launches Nandini idli-dosa batter
Nandini launches protein-infused idli-dosa batter for urban consumers in Karnataka
idli-dosa batter in Karnataka
बेळगाव—belgavkar—belgaum @कर्नाटक : दिवसेंदिवस कर्नाटक दूध महामंडळ (केएमएफ – Karnataka Milk Federation. (KMF), Belgaum) यांच्या नंदिनी ब्रँड उत्पादनांच्या यादीत एक एक नवीन उत्पादनांची भर पडत आहे. नंदिनीच्या बहुतांश उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे. आता प्रथिनेयुक्त डोसा पीठ आणि इडलीचे पीठही बाजारात आले आहे.
Karnataka Milk Federation (KMF) finally launched its much-awaited Nandini idli-dosa batter on December 25.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नंदिनी ब्रँडच्या ‘रेडी टू कूक’ नंदिनी प्रोटिन-आधारित इडली आणि डोसा पीठ विक्रीचा शुभारंभ केला. केएमएफद्वारे बाजारात आणलेल्या या डोसा आणि इडलीच्या पीठात 5 टक्के प्रथिने सामग्री आहे. सध्या ते बंगळूर शहरात प्रायोगिकरित्या विकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत मागणीनुसार इतर जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्याचा विचार आहे.
डोसा आणि इडली पिठाची विक्री 450 ग्रॅम पॅकसाठी 40 रुपये आणि 900 ग्रॅम पॅकसाठी 80 रुपये ठेवण्यात आली आहे.
Karnataka’s Nandini dairy launches idli-dosa batter in Bengaluru, to enter into other cities after feedback
केएमएफच्या नंदिनी उत्पादनांनी देशव्यापी बाजारपेठ निर्माण केली आहे. नंदिनी दूध देशाची राजधानी दिल्लीतही पोहोचले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यातील प्रमुख शहरांमध्येही नंदिनी दुधाला मागणी येत आहे.
देशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या तिरुपतीचा प्रसिद्ध लाडू प्रसाद नंदिनी तुपाने तयार केला जातो. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ‘एक्स’मध्ये लिहिले की, नंदिनीच्या विविध उत्पादनांना मोठी मागणी आहे.
नागरिकांच्या प्रदीर्घ मागणीनुसार नंदिनी उत्पादनांमध्ये नवीन भर म्हणून डोसा आणि इडलीचे पीठ बाजारात दाखल झाले आहे. हे प्रोटिनवर आधारित उच्च दर्जाचे पीठ ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. न्याहारीसाठी कुरकुरीत डोसा, स्वादिष्ट इडलीसह चव आणि आरोग्य वाढवते.
#KMF #Nandini #IdliDosaBatter #ProteinInfused #Karnataka #UrbanConsumers #FoodInnovation #HealthyEating #ReadyToCook #DosaBatter #IdliBatter #KarnatakaMilkFederation #Belgaum #CulinaryDelight #FoodLovers #TasteOfKarnataka #GourmetFood #LocalProducts #NandiniBrand #Foodie
KMF launches Nandini idli-dosa batter
KMF launches Nandini idli-dosa batter