Karnataka to get 5 Doppler radars soon
Doppler Weather Radar (DWR)
कर्नाटक—belgavkar : कर्नाटक राज्यामध्ये एकूण 5 डॉप्लर वेदर रडार (डीडब्ल्यूआर) स्थापन करण्यात येणार आहेत. भारुराड, कारवार, मंगळूर, बळ्ळारी आणि बंगळूर येथे प्रत्येकी एक रडार उभारले जाणार आहे. यामुळे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणे शक्य होईल, असे भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी सांगितले.
रडारमुळे हवामानाचा अचूक अंदाज मिळेल
हवामान खात्याच्या कार्यालयाला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या रडारमुळे हवामानाचा अचूक अंदाज मिळेल. त्यामुळे खबरदारी घेणे शक्य होईल. सदर रडार केवळ सरकारी एजन्सीच नव्हे तर नागरिकांनाही सतर्क करण्याचे काम करतील. कर्नाटकातील अनेक गावे पूरग्रस्त आहेत. बंगळुरातही अतिवृष्टी झाली होती. रडार बसवण्याचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल.
आगामी दोन वर्षांत विविध सरकारी एजन्सीबरोबर रडार कार्यरत होतील, अशी माहितीही महोपात्रा यांनी दिली. सध्या हवेचा दर्जा, त्याचा वेग, वाऱ्याची दिशा अशी माहिती हवामान खाते देते. ढगांची रचना, प्रत्येक टप्प्यात वाहणाऱ्या वाऱ्याची माहिती रडारद्वारे मिळेल. यामुळे हवामानाचा नेमका अंदाज व्यक्त करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Karnataka to get 5 Doppler radars soon