सरकारी नोकरीत काहीच नाही… आमच्यापेक्षा चांगले पाणी-पुरीवाले @कर्नाटक तहसीलदार

Belgaum Belgavkar
2 Min Read

Panipuri wala leads a better life than we do

Pani puri seller’s life is better: Karnataka Tahsildar slams government jobs

सरकारी कार्यालयांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि त्यांच्या वरिष्ठांच्या अधिकार्‍यांवरील ताणाबद्दल संताप व्यक्त करून, तहसीलदार म्हणाले की, “पानीपुरी वाला किंवा गोबी मंचूरियन विक्रेता” असणे चांगले.

Karnataka Tahsildar’s grouse : कर्नाटकतील एका तहसीलदाराने सरकारी कार्यालयांतील कार्यप्रणाली आणि कर्मचाऱ्यांचा वाढत असलेला ताणतणाव यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तहसीलदार महोदयांचे म्हणणे आहे की, सरकारी नोकरीत काहीच ठेवलेले नाही, आमच्यापेक्षा चांगले तर पानी-पुरी अथवा गोबी मंचुरियनचा ठेला चालवणारे आहेत. त्यांची कमाईदेखील आमच्यापेक्षा अधिक आहे.

Panipuri vendors better off than govt officers in handling work stress

होलेनरसीपुर (हासन) येथील तहसीलदार केके कृष्णमूर्ती हे तालुक राज्य सरकारी कर्मचारी संघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले,ठेला चलाणारे दबावापासून मुक्त होऊन आनंदात जीवन जगत आहेत. ते सुट्ट्यांवर जाऊ शकतात. शांततेत घरी परतू शकता आणि आपल्य जीवनाचा आनंद घेऊ शकतात. या उलट सरकारी अधिकारी नेहमीच तणावाचा सामना करत असतात. एवढेच नाही, तर आपल्या कुटुंबाला मंदिरातही नेऊ शकत नाहीत (Karnataka’s Holenarasipur Tahsildar KK Krishnamurthy criticised the stressful working conditions in government jobs).

तहसीलदार साहेब पुढे म्हणाले, तंत्रज्ञानामुळे कामाचा ताण कमी होण्याऐवजी वाढला आहे. वरिष्ठ अधिकारी व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे कामांवर लक्ष ठेवतात. त्याच दिवसात निकाल मागतात. उशीर झाल्यास विभागीय चौशी होते अथवा चौकशीच्या नावाखाली धमकावले जाते.

- Advertisement -

 

 

कृष्णमूर्ती पुढे म्हणाले, गावातील लेखापाल सूडाच्या भीतीने त्यांच्या संघर्षाचा आवाज उठवू शकत नाहीत आणि शिक्षकांवर शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मुलांना अंडी आणि नाश्ता वाटप करण्यासारख्या सरकारी योजनांच्या तणावाखाली आहेत.

 

यावेळी तहसीलदार कृष्णमूर्ती यांनी, हाई ब्लड प्रेशर, शुगर तथा किडनी आणि लिव्हरच्या वाढत्या आजारपणांचा हवाला देत, अधिकाऱ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांसंदर्भात चिंता व्यक्त केली. एवढेच नाही तर, अत्यंतिक ताणतणावामुळे आपण स्वैच्छा निवृत्तीसंदर्भातही विचार करत आहोत, असेही यावेळी तहसीलदार साहेबांनी म्हटले आहे.

 

#Panipuri #StreetFood #FoodVendor #LifeOfVendors #BetterLife #Karnataka #GovernmentJobs #WorkStress #FoodCulture #LocalBusiness #Entrepreneurship #StreetFoodLovers #FoodieLife #VendorLife #CulinaryDelight #HappinessInSimplicity #LifeLessons #SuccessStories #Inspiration #CommunitySupport

 

Karnataka Tahsildar slams government jobs

Karnataka Tahsildar slams government jobs

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *