Karnataka approves 15% hike in bus fares from Jan 5
Karnataka bus fare hike
Revised Karnataka bus fares come into effect
बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : राज्यातील 4 परिवहन महामंडळांच्या बस भाड्यात 15 टक्के वाढ करण्यात आली असून, शनिवारी मध्यरात्रीपासून सुधारित भाडे लागू करण्यात आले आहे. वेगदूत, राजहंस, व्होल्वो, व्होल्वो मल्टी एक्सेल, ऐरावत, एसी स्लीपर, नॉन एसी स्लीपर, अंबारी उत्सव यांसह सर्व बसेसचे भाडे 15 टक्के वाढले आहे. एसी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारित भाड्यासह जीएसटी भरावा लागणार आहे.
सामान्य बस दरात 1 ते 6 रुपये, वेगदूत बसदरात 7 ते 115 रुपयांपर्यंत वाढ
टक्केवारीनुसार सरकारने 15 टक्के भाडे वाढवण्यास प्रशासकीय मान्यता देत आदेश जारी केला आहे. 15 टक्के दरवाढ लागू झाली आहे. सामान्य बस दरात 1 ते 6 रुपये, वेगदूत बसदरात 7 ते 115 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वातानुकूलित बसच्या दरात 15 टक्के दरवाढीसह जीएसटी टोल शुल्काचाही समावेश करण्यात आला आहे. या दरवाढीनंतरही इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकातील दर कमी असल्याचे दिसून आले आहे.
बस तिकीटाच्या दरात 15 टक्के वाढ झाल्याने चारही विभागांना एकूण 78 उत्पन्न आणि वार्षिक 930 कोटीचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. यापैकी केएसआरटीसी आणि बीएमटीसीच्या नफ्याच्या प्रमाणात सर्वाधिक वाढीची शवयता आहे.
बस भाडेवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडियाच्या धारवाड जिल्हा समितीच्या वतीने शनिवारी धारवाड उपनगरीय व ग्रामीण बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकार जनविरोधी धोरण अवलंबत असून, सर्वसामान्यांवर बोजा टाकत आहे. स्वयंपाकाचे तेल, धान्य,खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती आणि इंधनाच्या महागाईमुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. आधुनिक जीवनाची मूलभूत गरज असलेल्या परिवहन कंपन्यांनी बस तिकीट दरात केलेली वाढ अडचणीत भर घालते. सरकारने जनतेला अडचणी आणणाऱ्या नवीन वर्षाची भेट दिल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला.
1 एप्रिल ते 30 नोव्हेंबरपर्यंत 2024-25 वर्षात केएसआरटीसी, बीएमटीसी, कल्याण कर्नाटक आणि वायव्य कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळाला एकूण 8418.46 कोटी रुपये उत्पन्न आले. या कालावधीतील कर्मचाऱ्यांच्या पगारासह सर्व खर्चासाठी एकूण 9511.41 कोटी रुपये खर्च आला. 1092.95 कोटी रुपये खर्च निव्वळ तूट असल्याचा प्रस्ताव व्यवस्थापकीय संचालकांनी सरकारला सादर केला होता.
1 मार्च 2023 पासून 4 महामंडळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 टक्क्याने सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार खर्च 12.85 कोटींवरून 18.36 कोटी झाला आहे. दररोज 5.51 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडत आहे. 2014 आणि 2015 मध्ये प्रतिलिटर डिझेलची किंमत अनुक्रमे 46.24 रुपये आणि 60.98 रुपये होती. त्यावेळी डिझेलसाठी रोज 9.16 कोटी रुपये खर्च होता. सध्या तो खर्च वाढून 13.21 कोटी रुपये झाला आहे. त्यामुळे परिवहन संस्थांनी भाडेवाढीसाठी मंजुरी मागितली होती.
Karnataka bus fare hike
Karnataka bus fare hike