भारताच्या डिजिटल क्षेत्रात नवा अध्याय सुरू करत, Reliance Jio ने आपला पहिला ब्लॉकचेन-आधारित रिवॉर्ड टोकन Jiocoin सादर केला आहे. हा टोकन पॉलीगॉन नेटवर्कवर आधारित असून जिओच्या JioSphere नावाच्या वेब ब्राउझरमध्ये समाकलित करण्यात आला आहे. JioSphere browser द्वारे ऑनलाइन ब्राउझिंग केल्यावर वापरकर्त्यांना jio coin रिवॉर्ड म्हणून दिला जातो.
jiocoin म्हणजे काय आणि तो कसा काम करतो?
jio coin हा ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित टोकन आहे, जो भारतातील वापरकर्त्यांसाठी खास डिझाइन केला आहे. जिओच्या विविध app वापरताना हे टोकन्स कमावता येतात. हा टोकन सुरक्षित व्यवहार आणि गोपनीयतेचे संरक्षण करण्याचे आश्वासन देतो.
सध्या jio coin चा बीटा टेस्टिंग फेज चालू असून, तो JioSphere browser app वर उपलब्ध आहे. जिओकॉइन कमवण्यासाठी वापरकर्त्यांनी खालील अटी पूर्ण कराव्या लागतात:
- वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
- भारताचा रहिवासी असावा.
- BBRP प्रोग्राम किंवा त्याच्याशी संबंधित प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली असावी.
वापरकर्त्यांना टोकन्स मिळवण्यासाठी विशिष्ट टास्क पूर्ण करावे लागतात. याचा उपयोग जिओच्या सेवांवर किंवा खास ऑफरमध्ये रिडीम करण्यासाठी करता येतो. हे टोकन्स Web3 वॉलेटमध्ये साठवले जातात. ही प्रणाली ब्रेव्ह ब्राउझरच्या BAT (Basic Attention Token) सारखी आहे.
also read – Microsoft देणार भारतात ५ लाख जणांना ai चे प्रशिक्षण
पॉलीगॉन लॅब्ससोबतचा सहयोग
jiocoin cryptocurrency प्रकल्पाला आणखी बळकट करण्यासाठी पॉलीगॉन लॅब्ससोबत भागीदारी करण्यात आली आहे. या भागीदारीमुळे जिओकॉइनचे ब्लॉकचेन फ्रेमवर्क मजबूत होईल आणि मोठ्या संख्येने वापरकर्त्यांसाठी ते कार्यक्षम व स्केलेबल राहील.
Jiocoin भारतातील क्रिप्टो मार्केटसाठी महत्त्वाचा कसा ठरेल?
Jiocoin च्या आगमनामुळे भारतात क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढण्याची शक्यता आहे. हे टोकन फक्त वापरकर्त्यांना ब्लॉकचेन आणि क्रिप्टो तंत्रज्ञानाबद्दल माहिती देत नाही, तर भारतातल्या इतर कंपन्यांनाही क्रिप्टो क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहित करते.
रिलायन्ससारख्या मोठ्या उद्योगसमूहाने क्रिप्टो क्षेत्रात उडी घेतल्यामुळे या तंत्रज्ञानाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल. शिवाय, जिओकॉइन हे जिओच्या डिजिटल सेवांसाठी एक युटिलिटी टोकन म्हणून कार्य करेल. यामध्ये डेटा स्टोरेज, ई-कॉमर्स, आणि अन्य सेवा समाविष्ट आहेत.
क्रांतिकारी पाऊल
भारतासारख्या मोठ्या देशात, जेथे लोकसंख्या डिजिटल व्यवहाराकडे वळत आहे, जिओकॉइनसारखा टोकन डिजिटल इकोसिस्टमसाठी एक क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतो. यामुळे केवळ वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण होणार नाहीत, तर त्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा फायदा देखील मिळेल.
सध्या बीटा टप्प्यात असलेल्या जिओकॉइनची प्रतिक्षा भारतातील वापरकर्ते उत्सुकतेने करत आहेत. जेव्हा याचे संपूर्ण लाँच होईल, तेव्हा डिजिटल व्यवहार आणि क्रिप्टोच्या क्षेत्रात हा एक नवा मैलाचा दगड ठरेल.