iphone ला टक्कर देणारी Google Pixel 9 सिरीज झाली आहे भारतात लाँच, बघा याची खरी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Pravin Wandekar
7 Min Read
Google Pixel 9

Google Pixel 9 Series Launch: Google कंपनी ने भारतात Pixel 9 सिरीजमधील स्मार्टफोन्स च्या किंमती, तपशील आणि उपलब्धतेची माहिती अधिकृतपणे जाहीर केली आहे. यावेळी, Google दोन नाही तर चार Pixel फोन भारतात आणत आहेत, त्यात एक फोल्डेबल फोनचाही समावेश आहे. चला Pixel 9, Pixel 9 Pro, आणि Pixel 9 Pro XL च्या किंमत तसेच वैशिष्ट्ये आणि उपलब्धतेची माहिती या लेखातुन घेऊयात

Google Pixel 9 Series भारतीय किंमत आणि उपलब्धता

ModelPrice
Google Pixel 9 12GB+256GBRs 79,999
Google Pixel 9 Pro 12GB+256GBRs 1,09,999
Google Pixel 9 Pro XL 12GB+256GBRs 1,24,999

google pixel 9 series colors :


Google Pixel9 seriesची किंमत भारतात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.ज्यामध्ये Google Pixel9 ची किंमत ₹79,999 इतकी आहे, ज्यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेजचा एक वेरिएंट उपलब्ध आहे. तसेच Pixel 9 Pro ची सुरुवातीची किंमत ही ₹1,09,999 असून, या मॉडेलमध्येही 12GB RAM आणि 256GB स्टोरेज दिले जात आहे.तर Pixel 9 Pro XL सर्वात महागडं मॉडेल असून, याची प्रारंभिक किंमत ₹1,24,999 आहे. हे सर्व मॉडेल्स भारतात उच्च गुणवत्ता आणि प्रीमियम अनुभव देण्यासाठी डिझाइन केले आहेत.

google pixel 9 series colors :

Google Pixel 9 विविध रंगांच्या पर्यायात उपलब्ध असेल. यामध्ये Obsidian, Porcelain, Wintergreen, आणि Peony रंगांचा समावेश आहे. ग्राहकांच्या विविध आवडीनिवडींनुसार. Pixel 9 Pro XL साठी रंग पर्यायात Obsidian, Porcelain, Hazel, आणि Rose Quartz उपलब्ध आहेत. हे रंग विशेषत: प्रीमियम आहेत, ज्यामुळे फोनच्या सौंदर्याला एक अतिरिक्त आकर्षण मिळते.

google pixel9 series pre order :

Pixel 9 आणि Pixel9 Pro XL साठी भारतात प्रि-ऑर्डर 14 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेले आहे. याचा अर्थ, ग्राहक या दोन्ही मॉडेल्ससाठी त्याआधीच बुकिंग करू शकतात. तर Pixel9 Pro आणि Pixel9 Pro Fold सप्टेंबर महिन्यात बाजारात येतील. हे मॉडेल्स त्यांच्या चांगल्या वैशिष्ट्यांसाठी लोकप्रिय असतील आणि ते सप्टेंबरमध्ये उपलब्ध होतील.

- Advertisement -

google pixel9 series purchase date :

नवीन Pixel फोन ऑनलाइन Flipkart वर उपलब्ध असतील, जे एक प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. याशिवाय, Reliance Digital आणि Croma या फिजिकल स्टोअर्समध्येही Pixel 9 सिरीजच्या मॉडेल्सची खरेदी करता येईल.यामुळे, ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या प्लॅटफॉर्मवरून किंवा स्टोअरमधून स्मार्टफोन सहज उपलब्धध होतील.


Google Pixel 9 मधील स्पेसिफिकेशन्स

FeatureSpecification
Display6.3-inch OLED Super Actua
ProcessorGoogle Tensor G4 with Titan M2 security coprocessor
Cameras50MP primary camera, 48MP ultra-wide camera, 10.5MP selfie camera
Battery & Charging4,700mAh battery, 45W fast wired charging, fast wireless charging
SoftwareAndroid 14 out of the box, 7 years of OS, security, and Pixel Drop updates
  • google pixel 9 display : Pixel9 स्मार्टफोन मध्ये 6.3-इंच OLED सुपर एक्टुअल डिस्प्ले आहे, तसेच तो 120Hz रिफ्रेश रेट सह येतो,आणि यामध्ये Gorilla Glass Victus 2 सुरक्षा दिलेली आहे, 1,800 निट्स HDR ब्राइटनेस आणि 2,700 निट्स पीक ब्राइटनेस यामध्ये उपलब्ध आहे .
  • google pixel 9 processor : Google Tensor G4 प्रोसेसरसह Titan M2 सुरक्षा कोप्रोसेसर आहे , जो उच्च कार्यक्षमता आणि सुरक्षिततेसाठी डिझाइन केलेला आहे.
  • google pixel 9 processor : 50MP प्रायमरी कॅमेरा, 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 10.5MP सेल्फी कॅमेरा, उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी दिलेला आहे .
  • google pixel 9 battery mah : यामध्ये 4,700mAh बॅटरी दिलेली आहे , जी 45W फास्ट वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करते, ज्यामुळे 30 मिनिटांत 55% चार्ज करण्याची क्षमता देते.
  • google pixel 9 software : Android 14 च्या नवीनतम आवृत्तीसह, 7 वर्षे OS, सुरक्षा आणि Pixel Drop अपडेट्सची हमी या स्मार्टफोन मध्ये आहे .

Google Pixel 9 Pro, Pixel9 Pro XL मधील स्पेसिफिकेशन्स

FeatureGoogle Pixel 9 ProGoogle Pixel 9 Pro XL
Display6.3-inch LTPO OLED Super Actua6.8-inch LTPO OLED Super Actua
ProcessorGoogle Tensor G4 with Titan M2 security coprocessorGoogle Tensor G4 with Titan M2 security coprocessor
Cameras50MP primary sensor, 48MP ultra-wide sensor, 48MP telephoto camera with 5x optical zoom, 42MP selfie camera50MP primary sensor, 48MP ultra-wide sensor, 48MP telephoto camera with 5x optical zoom, 42MP selfie camera
Battery & Charging4,700mAh battery, 45W fast wired charging, fast wireless charging5,060mAh battery, 45W fast wired charging, fast wireless charging
SoftwareAndroid 14Android 14
  • google pixel9 pro / pro xl display : Pro मध्ये 6.3-इंच LTPO OLED स्क्रीन दिलेली आहे आणि 9 Pro XL मध्ये 6.8-इंच LTPO OLED स्क्रीन दिलेली आहे. तसेच या दोनही स्मार्टफोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेट दिलेला आहे, व Gorilla Glass Victus 2, 2,000 निट्स HDR ब्राइटनेस आणि 3,000 निट्स पीक ब्राइटनेस सुविदा यामध्ये आहे .
  • google pixel 9 pro / pro xl processor : Google Tensor G4 प्रोसेसरसह Titan M2 सुरक्षा कोप्रोसेसर आहे,जो उच्च कार्यक्षमता आणि सुरक्षिततेसाठी आहे.
  • google pixel9 pro / pro xl camera : 9 Pro मध्ये मागच्या बाजूला 50MP प्रायमरी कॅमेरा, 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, व 48MP टेलिफोटो कॅमेरा 5x ऑप्टिकल झूमसह दिलेले आहे , आणि 42MP सेल्फी कॅमेरा दिलेला आहे.
  • google pixel9 pro / pro xl display battery: 9 Pro मध्ये 4,700mAh बॅटरी आणि 9 Pro XL मध्ये 5,060mAh बॅटरी दिलेली आहे, जी 45W फास्ट वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते,तसेच यामध्ये बॅटरी शेअरिंग ची सुविधा देखील आहे, तसेच स्मार्टफोन 30 मिनिटांत 70% चार्ज होतात असा कंपनीचं दावा आहे.
  • google pixel9 pro / pro xl display software : Android 14 च्या नवीनतम आवृत्तीसह दिलेला आहे, 7 वर्षांचे OS, सुरक्षा आणि Pixel Drop अपडेट्सची हमी दिलेली आहे.

FAQ

Google Pixel 9 ची भारतीय किंमत किती आहे?

Google Pixel 9 ची किंमत भारतात ₹79,999 किंमत आहे.

Pixel 9 Pro XL किती जलद चार्ज होऊ शकतो?

Pixel 9 Pro XL मध्ये 5,060mAh बॅटरी आहे, आणि 45W फास्ट वायर्ड व वायरलेस चार्जिंगसह 30 मिनिटांत 70% चार्ज होण्याचा दावा आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *