iPhone 16 Pro and iPhone 16 Pro Max launching : सप्टेंबर महिन्यात होणार आहे आयफोन 16 सिरीज लाँच! बघा अपेक्शित फीचर्स.

By Pravin Wandekar

Published on:

iphone 16 plus price
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 16 series: Apple च्या iPhone 16 सिरीजविषयीच्या उत्साहात वाढ होत आहे. त्यातच Apple Hub या X हँडल पोस्ट करत या स्मार्टफोन च्या लाँच बद्दल सांगण्यात आलेले आहे. त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे iPhone 16 सिरीज चे लाँच सप्टेंबर महिन्यात होईल, आयफोन उत्पादक कंपनी त्यांच्या प्रत्येक पुढच्या व्हर्जन मध्ये नवनवीन महत्वपूर्ण सुधारणा करत असते.यावररूनच लक्षात येते की या iPhone 16 सिरीज मध्ये मोठे चेंजेस बगायला मिळतील. या नवीन मॉडेल्समध्ये अधिक प्रगत प्रोसेसर, सुधारित कॅमेरा सिस्टम, आणि अद्वितीय डिस्प्ले,तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वपूर्ण अपग्रेड्स असण्याची शक्यता आहे. यामुळे वापरकर्त्यांना अधिक वेगवान, प्रभावी आणि उत्कृष्ट अनुभव मिळणार आहे.

iPhone 16 series Expected Key Spaces

FeatureSpecification
ChipsetApple A17 Pro
RAM (GB)N/A
Storage128GB, 256GB, 512GB
Display6.1-inch, 2556 x 1179 pixels
Front Camera12MP
Primary Camera48MP + 12MP
Battery20 hours video playback, 80 hours audio playback
Operating SystemiOS 18
iPhone 16 series Expected Key Spaces

iPhone 16 Pro Series Expected Display and Design

16 Pro सिरीज च्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे मोठा OLED डिस्प्लेची. तर 16 Pro मध्ये 6.3-इंच स्क्रीन असण्याची अपेक्षा आहे, जी की iPhone 15 Pro मधील 6.1-इंच डिस्प्लेच्या तुलनेत मोठी आहे. याउलट, iPhone 16 Pro Max मध्ये 6.9-इंच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे, जी iPhone 15 Pro Max मधील 6.7-इंच स्क्रीनपेक्षा मोठी असेल. Apple च्या या नवीन मॉडेल्समध्ये अधिक इन-हैंड अनुभवासाठीथोडे चेंजेस देखील केलेजाणार आहे. iPhone 16 Pro च्या कड्यांची रुंदी फक्त 1.2 मिमी असेल, तर 16 Pro Max ची कड्यांची रुंदी 1.15 मिमी इतकी असेल. यामुळे वापरकर्त्यांना एक चांगला अनुभव मिळेल.

iPhone 16 Pro Series Expected Performance

16 Pro सिरीजच्या अंतर्गत, लेटेस्ट A18 Pro चिप असण्याची अपेक्षा आहे, जी आधीच्या मॉडेल्समध्ये वापरलेल्या A17 Pro चिपपेक्षा चांगली असणार आहे. या नवीन प्रोसेसरमुळे या स्मार्टफोन ची कार्यक्षमता, गती, आणि एकूण वापरकर्ता अनुभव सुधारण्याची शक्यता आहे.त्यासोबतच, Apple नवीन “Apple Intelligence” नावाच्या वैयक्तिक AI सुइटची ओळख करणार आहे. या AI सुविधेमुळे वापरकर्त्यांना अधिक स्मार्ट फिचर्स आणि कार्यक्षमता मिळेल, ज्यामुळे उपकरणांची कामगिरी आणखी सुधारली जाईल.तसेच iPhone 16 Pro सिरीज अधिक सुसंगत आणि प्रभावी अनुभव देईल.

हे हि वाचा  – OnePlus Open Apex Edition to Launch in India : वन प्लस चा हा स्मार्टफोन अनोख्या रंगात होतोय भारतात या दिवशी लाँच!

iPhone 16 Pro Series Expected Camera

16 Pro आणि 16 Pro Max च्या कॅमेरा सिस्टीम्समध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये मागच्या बाजूला 48-मेगापिक्सेलचा Ultra-Wide कॅमेरा असण्याची शक्यता आहे. याशिवाय, अशी अफवा आहे की Apple यामध्ये नवीन 5x टेलीफोटो लेन्स जोडणार आहे, जी पूर्वीच्या 3x टेलीफोटो लेन्सला बदलेल. या सुधारित लेन्समुळे झूम क्षमतांमध्ये वाढ होईल, ज्यामुळे अधिक स्पष्ट फोटोस काढता येणार आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये सेल्फी साठी पुढच्या बाजूला एक सिंगल कॅमेरा असणार आहे,जो की 12 मेगापिक्सएल चा असणार आहे.

FeatureSpecification
Rear Camera ModuleDual
Rear Camera Specs48MP f/1.6 primary camera + 12MP f/2.4 120° ultra-wide camera
Rear Camera Features12MP 2x Telephoto (enabled by quad-pixel sensor), Sensor Shift, Panorama, Night Mode, Burst Mode
Front Camera ModuleSingle
Front Camera Specs12MP, f/1.9 aperture
Front Camera FeaturesFace ID, Smart HDR 5, Deep Fusion
iPhone 16 Pro Series Expected Camera

iPhone 16 Pro Series Battery

iPhone 16 सिरीज मधील 16 Pro मध्ये 3,577mAh बॅटरी असू शकते, तर 16 Pro Max मध्ये 4,676mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही मॉडेल्स 40W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 20W MagSafe वायरलेस चार्जिंगला समर्थन करतिल, जे आधीच्या स्मार्टफोन च्या 27W वायर्ड आणि 15W MagSafe चार्जिंगच्या तुलनेत एक मोठा बदल असणार आहे. यामुळे, वापरकर्त्यांना अधिक जलद चार्जिंगचा अनुभव मिळेल.

Apple 16 Pro Series Expected Price

सध्याच्या अफवांनुसार, 16 Pro आणि 16 Pro Max च्या किंमती त्यांच्या पूर्वीच्या मॉडेल्सच्या समान राहण्याची अपेक्षा आहे, जरी या नवीन मॉडेल्समध्ये अनेक महत्वाच्या सुधारणा असतील. तरी 16 Pro ची अमेरिका मध्ये सुरूवातीची किंमत $999 ही आणि भारतात ₹129,800 असण्याची अपेक्षा आहे. तसेच 16 Pro Max ची अमेरिका मध्ये सुरूवातीची किंमत $1,199 ही आणि भारतात ₹151,700 इतकी असण्याची अपेक्षा आहे.
तथापि, काही लीकनुसार, उत्पादन खर्च वाढल्यामुळे Apple किंमत वाढवण्याचा विचार करू शकते. त्यामुळे, किंमत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


FAQ

1) आयफोन 16 सिरीज कधी लाँच होणार आहे?

आयफोन 16 सिरीज 2024 च्या सप्टेंबर महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. Apple सहसा या महिन्यात आयफोन लाँच इव्हेंट आयोजित करेल.

2) आयफोन 16 सिरीजमध्ये कोणकोणते मॉडेल्स असू शकतात?

आयफोन 16 सिरीजमध्ये आयफोन 16,आयफोन 16 प्लस,आयफोन 16 प्रो,आयफोन 16 प्रो मॅक्स हे मॉडेल्स असू शकतात.

2 thoughts on “iPhone 16 Pro and iPhone 16 Pro Max launching : सप्टेंबर महिन्यात होणार आहे आयफोन 16 सिरीज लाँच! बघा अपेक्शित फीचर्स.”

Leave a Reply