आय ओ एस १८ (ios 18 features) मधील सगळे फीचर्स जुनेच – फक्त जाहिरात

Admin
3 Min Read
sakaltime.com

सध्या चर्चा आहे ती फक्त आय ओ एस १८ (ios 18 features) ची आणि त्यात दिलेल्या नवीन सर्व फीचर्स ची.  एप्पल (APPLE) कंपनी दर वर्षी काहीतरी नवीन फीचर्स घेऊन आपल्या मोबाईल ची जाहिरात जोरात करत असते. या हि वर्षी बरेच नवीन फीचर्स आय ओ एस १८ मध्ये दिले आहेत. आणि आय ओ एस १८ हे अपडेट सर्व एप्पल मोबाईल मध्ये देणार आहे. सध्या आय ओ एस १८ हे फक्त बीटा व्हर्जन मध्ये मिळत आहे. काही मोबाईल मध्ये ते घेता येते. तसे पहिले तर यातील बरेच फीचर्स आपण याआधी एन्द्रोइड (ANDROID) मध्ये खूप दिवसांपासून वापरत आहोत. यातील काही महत्वाचे फीचर्स आपण पाहूयात.

फोन रेकोर्डिंग आणि ट्रान्सलेट (CALL RECORDING AND TRANSLATE)

तसे तर हे फीचर्स एन्द्रोइड मध्ये खूप दिवसांपासून युजर वापरत आहे. परंतु एप्पल वाले तरसले होते या फीचर्स साठी, यापुढील नवीन मोबाईल मध्ये फोन रेकोर्डिंग आणि ट्रान्सलेट हे फीचर्स मिळणार आहे आणि जुन्या डिव्हाइस मध्ये आय ओ एस १८ हे अपडेट मध्ये हि हे फीचर्स मिळणार आहे. फोन चालू असताना तुम्ही आवाज रेकोर्डिंग करून ते रेकोर्डिंग ट्रान्सलेट हि करू शकता.

होम स्क्रीन फ्रीडम ( HOME SCREEN )

एप्पल मोबाईल मध्ये हे फीचर्स कित्येक दिवस मिसिंग होते. मोबाईल वरील होम स्क्रीन मध्ये कोणतीही छेडछाड करता येत नव्हती. परंतु आता कोणतेही एप्प कुठेही हलवू शकतो आणि कोणतेही एप्प चा शोर्टकट होम स्क्रीन वर घेऊ शकतो.

ए आय फीचर्स (AI )

सध्या ए आय चा जमाना आहे. त्यामुळे सर्व मोबाईल मध्ये ए आय फीचर्स आलेले आहे. मग एप्पल का मागे राहावे.एप्पल मध्ये हि ए आय फीचर्स आले आहे. यामध्ये आवडीचे इमोजी तयार करू शकता. त्याच व्यतिरिक्त ए आय नोटिफिकेशन, फोटो एडिटिंग, नोट्स यामध्येही ए आय फीचर्स भरभरून दिलेले आहेत.

- Advertisement -

एप्प आयकोन फीचर्स (APP ICON)

एप्पल मध्ये आपल्याला आतापर्यंत एप्प चे आयकोन बदलता येत नव्हते. पण आय ओ एस १८ मध्ये एप्प आयकोन आपण बदलू शकतो, त्याचा कलर बदलू शकतो, त्याचा आकार बदलू शकतो. त्याचप्रमाणे वालपेपर आपल्याला पाहिजे तो ठेवता येणार आहे.

एप्प लॉक आणि हिडन एप्प (APPS LOCK)

एन्द्रोइड मध्ये तर पहिल्यापासून हे फीचर्स आहे. आता एप्पल ने हि हे फीचर्स नवीन आय ओ एस १८ मध्ये आणले आहे. आता तुम्हाला कोणतेही एप्प पासवर्ड टाकून लॉक करता येणार आहे त्याचप्रमाणे कोणतेही एप्प हिडन हि करता येणार आहे.

गेम मोड फीचर्स (GAME MODE)

हे ऐकल्यावर तुम्हाला हसायला येईल. कारण एन्द्रोइड मध्ये गेम मोड म्हणजे किरकोळ फीचर्स आहे. परंतु एप्पल युजर साठी हे खूप मोठे फीचर्स आहे कारण गेम मोड मध्ये आता बेटरी ची बचत होऊन दीर्घ काळ चालणार आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *