भारतीय रेल्वे मेगा भरती; रेल्वेत काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी – Indian Railway Mega Recruitment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी नोकरी असावी अशी बहुतांश जणांची इच्छा असते. वेगवेगळ्या सरकारी क्षेत्रात निघणाऱ्या भरतीसाठी तरुण तयारी करत असतात. जर तुमचेही सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. त्यातही रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा बऱ्याच जणांची असते. चला तर मग बघूया Indian Railway Mega Recruitment कोणत्या पदांसाठी भरती निघाली आहे पासून ते फॉर्म कसा भरायचा पर्यंतची संपूर्ण माहिती.

रेल्वे बोर्डाने NTPC म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीच्या अधिसूचना जाहीर केल्या आहेत. Indian Railway ने नॉन टेक्निकल लेव्हल ४, ५ आणि ६ साठी १६१५४ पदे तर लेव्हल २ आणि ३ मध्ये ३४४५ पदांच्या भरतीची घोषणा केली आहे.

लाखो तरुण Indian Railway तील ग्रुप डी पदांच्या भरतीची वाट पाहत आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात या रिक्त जागा भरण्यासाठी घोषणा केली जाईल. मागच्या ग्रुप डी भरतीच्या वेळी १.२५ लाख तरुणांनी अर्ज केले होते. आता या नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीची तरुण आतुरतेने वाट पाहत आहेत. रेल्वे २०२४ च्या अखेरीस ६१५२९ रिक्त जागा भरणार आहे तर पुढील भरती ही जानेवारी ते डिसेंबर महिन्यात पुन्हा सुरू होईल. या नव्या नियमामुळे Indian Railway रिक्त पदे लगेच भरली जातील आणि वयाची पूर्तता होण्याआधी तरुणांच्या हातात नोकरी असेल असा या मागचा उद्देश आहे.

CEN 05/2024 साठी पदवीधरांसाठी कोणती पदे आहेत (Indian Railway)?


१. चीफ कमर्शिल कम तिकीट पर्यवेक्षक:- या जागेसाठी १७३६ पदे आहेत.

हे हि वाचा -  भारतातील बारा ज्योतिर्लिंग ची माहिती वाचा सविस्तर मराठीमध्ये -12 jyotirlinga Marathi

२. स्टेशन मास्तर:- ९९४ पदे.

३. गुड्स ट्रेन मॅनेजर:- ३१४४ पदे.

४. कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंक लेखक:- १५०६ पदे.

५. वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक:- ७३२ पदे.

CEN 06/2024 अंडर ग्रॅज्युएटसाठी कोणत्या पोस्ट आहेत?


१. कमर्शिल कम तिकीट क्लार्क:- २०२२ पदे.

२. लेखा लिपिक सह टायपिस्ट:- ३६१ पदे.

३. कनिष्ठ लिपिक सह टायपिस्ट:- ९९० पदे.

४. ट्रेन क्लार्क:- ७२ पदे.

Indian Railway भरतीसाठी पात्रता निकष काय आहेत?

कोणत्याही सरकारी भरतीसाठी शैक्षणिक आणि वयोमर्यादा यांचे निकष असतातच. या भरतीसाठी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या CEN 05/2024 आणि CEN 06/2024 चा रिफ्रेन्स घेणे आवश्यक आहे.

Indian Railway पदवीधर पदांसाठी apply करताना अर्जदाराकडे पदवी असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला पदवी पूर्व पदासाठी अर्ज करायचा असेल तर १०+२ म्हणजेच उच्च माध्यमिक शिक्षण असणे आवश्यक आहे.

या पदांसाठी वयोमर्यादा काय आहे?

या पदांसाठी १८ ते ३३ वर्षे वयोमर्यादा आहे. आरक्षित वर्गासाठी वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

पदांसाठी निवड कशी केली जाईल?

सदर पदांसाठी संगणक आधारित चाचण्या (CBT – 1) आणि (CBT – 2), टायपिंग टेस्ट, दस्ताऐवज पडताळणी (डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन) आणि वैद्यकीय चाचणी अश्या परीक्षांचा समावेश असेल.

या पदासाठी अर्ज कसा करायचा?

१. सगळ्यात आधी RRB ची अधिकृत वेबसाईट indianrailways.gov.in वर जा.

२. अधिकृत वेबसाईटवर आल्यावर RRB NTPC recruitment 2024 online form यावर क्लिक करा.

३. इथे एक नोंदणीचा फॉर्म दिसेल.

४. यावर स्वतःचे पर्सनल डिटेल्स टाकून पुढे जा.

५. आता आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करा.

६. फॉर्मची फी भरा.

७. फी भरून झाल्यावर सबमिट करा.

८. भरलेल्या फॉर्मची प्रिंट घ्या. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट जपून ठेवा.

या परीक्षेची फी किती आहे?

या पदांच्या परीक्षेसाठी रू.५००/- फी आहे. ही फी जनरल कॅटेगरीसाठी आहे. तर महिला उमेदवार, माजी सैनिक, ट्रान्सजेंडर, PWD, SC/ST, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय आणि आरक्षित वर्गासाठी याच फॉर्मसाठी रू. २५०/- फी आहे.

हे हि वाचा -  पत्र्याचे शेड ते यू ट्यूबमधून लाखोंचे उत्पन्न कसा होता शिंदे दांपत्याचा प्रवास? - Ganesh Shinde and Yogita Shinde

RRB NTPC UG (Under Graduate ) पगार किती असेल? (अपेक्षित)

कमर्शियल कम तिकीट क्लर्क – २१७००/- रुपये.
लेखा लिपिक सह टंकलेखक – १९९००/- रुपये.
कनिष्ठ लिपिक सह टायपिस्ट – १९९००/- रुपये.
ट्रेन्स क्लर्क – १९९००/- रुपये.

RRB NTPC पदवीधर (Graduate) पगार किती असेल? (अपेक्षित)

चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक – ३५४००/- रुपये.
स्टेशन मास्तर – ३५४००/- रुपये.
गुड्स ट्रेन मॅनेजर – २९२००/- रुपये.
कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक – २९२००/- रुपये.
वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक – २९२००/- रुपये.

RRB NTPC परीक्षेचे पॅटर्न काय आहे?

CBT – 1 या पेपरमध्ये १०० गुणांचे १०० प्रश्न आहेत. यासाठी १ तास ३० मिनिटांचा वेळ मिळतो. यात maths आणि reasoning चे प्रत्येकी ३० प्रश्न असतात तर सामान्य ज्ञानाचे ४० प्रश्न विचारले जातात.

CBT – 2 हा पेपर १२० गुणांचा असतो. यात १२० प्रश्न विचारले जातात. यात maths आणि reasoning चे ७० प्रश्न तर general awareness आणि general intelligence चे ५० प्रश्न विचारले जातात.

Leave a Reply