भारतीय क्रिकेट स्टार Shikhar Dhawan ने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shikhar Dhawan announces retirement: भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने शनिवार, 24 ऑगस्ट 2024 रोजी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या 38 व्य वर्षी Shikhar Dhawan ने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करत, आपल्या करियरभर समर्थकांच्या अटूट प्रेमासाठी आभार मानले. तसेच धवनने आपल्या निवृत्तीच्या घोषणा दरम्यान म्हटले की, तो एक समाधानकारक मनाने क्रिकेटच्या क्षेत्रातून निवृत्त होत आहे . 2010 मध्ये विशाखापट्टणममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध च्या वनेडे सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण शिकरने केल्यापासून, त्याने भारताचे प्रतिनिधित्व सर्व तीन फॉर्मेट्समध्ये केले आहे. तसेच रोहित शर्मा बरोबर मिळुन कित्येक सामने गाजवलेले आहे. तसेच क्रिकेट च्या दुनियेत या खेळाडूने आपापले चांगलेच नाव कमावलेले आहे.

Shikhar Dhawan आपल्या निवृत्तीच्या घोषणेत काय बोलला

Shikhar Dhawan पोस्ट केलेल्या विडिओ मध्ये बोलला माझ्या जीवनात एकच स्वप्न होते आणि ते म्हणजे भारतासाठी खेळणे, आणि मी ते साध्य केले आहे. माझ्या प्रवासात योगदान देणाऱ्या अनेक लोकांचे मी आभार मानतो. सर्वप्रथम, माझ्या कुटुंबाचे आभार. माझ्या बालपणीच्या प्रशिक्षक, दिवंगत तारक सिन्हा सरांचे आणि मदन शर्मा यांचे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी क्रिकेटची प्राथमिक तत्त्वे शिकली,धवनने सांगितले. माझ्या टीमचेही आभार मानतो, ज्यासोबत मी इतक्या जास्त वेळ क्रिकेट खेळलो. मला एक नवीन कुटुंब मिळाले, नाव, प्रसिद्धी आणि सर्व चाहत्यांचे प्रेम मिळाले, असे त्यांनी पुढे सांगितले.

NoNameDetails
1NameShikhar Dhawan
2BornDecember 05, 1985, Delhi
3Batting StyleLeft hand Bat
4Bowling StyleRight arm Offbreak

Shikhar Dhawan चे क्रिकेट करियर

Shikhar Dhawan ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मंचावर 2004 च्या आयसीसी U19 विश्वचषकात पदार्पण केले, जिथे त्याने 500 हून अधिक धावा केल्या, त्यात तीन शतकांचा समावेश होता. या फॉर्मेटमध्ये त्याने दाखवलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याचे क्रिकेट जगतात आगमन झाले. दिल्लीमध्ये जन्मलेल्या क्रिकेटपटू शिखर धवनने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरची सुरुवात काहीशी अडचणीने केली. आणि पदार्पणाच्या सामन्यात डक होऊन बाहेर पडल्यामुळे त्याला बऱ्याच आव्हानांचा सामोरे जावे लागले.अखेर, प्रारंभिक अडचणींनंतर, धवनने 2013 मध्ये जोरदार पुनरागमन केले आणि सर्व फॉर्मेट्समध्ये त्याची जागा फिक्स केली. चांगल्या फॉर्म चालू असतानाच इंग्लंडमध्ये झालेल्या भारताच्या विजयी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये शिखर धवन ला टूर्नामेंटचा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरव प्राप्त झाला.

हे हि वाचा -  पाहा का साजरा केला जातो रक्षाबंधन (Rakshabandhan) सण; वाचा संपूर्ण माहिती

Shikhar Dhawan च्या कॅरियर ला वळण देणारी घटना म्हणजे मोहाली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे टेस्ट पदार्पण. या सामन्यात त्याने फक्त 85 चेंडूंत शतक मारले , ज्यामुळे त्याने टेस्ट पदार्पणातच सर्वात जलद शतक ठोकण्याचा रेकॉर्ड तोडला. तसेच, धवनच्या टेस्ट पदार्पणाची सुरुवात अनपेक्षित परिस्थितीत झाली. तर झाले असे की टेस्ट च्या पहिल्याच ओव्हर मध्ये धवन समोर मिचेल स्टार्कच्या बॉलिंग करण्यासाठी आला पहिल्या त्या च्या पहिल्याच चेंडूने धवनला गडप केले असते, कारण त्याचे स्टंप्स बाहेर होते. ऑस्ट्रेलियांनी अ‍ॅपील न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे धवनने आपल्या पदार्पणातच जलद शतक ठोकण्याचा विक्रम गाठला.धवनच्या शिखरावर असताना, त्याच्या आक्रमक खेळी आणि शक्तिशाली हिटिंगने त्याला एक प्रमुख खेळाडू बनवले. त्याने रोहित शर्मा सोबत भारताच्या बॅटिंग लाईनअपमध्ये एक यशस्वी भागीदारी बनवली आणि त्याने मिळालेल्या समर्थनाचे सतत आभार मानले.

Shikhar Dhawan आयपीएल करिअर

आंतरराष्टीय क्रिकेट प्रदर्शना प्रमाणेच शिखर धवन ने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये ही एक उल्लेखनीय खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली. त्याने आयपीएलमध्ये एकूण 222 खेळले असून, 6769 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतकं आणि 51 अर्धशतकांच समावेश आहे.तसेच धवन आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार ठोकण्यारा खेळाडू आहे, त्याने त्याच्या IPL करियर मध्ये 768 चौकार मारले आहेत. यासोबतच, दोन सलग शतकं ठोकण्याचा मान सुद्धा त्याने मिळवलेला आहे, जो त्याच्या आक्रमक खेळाचे एक उदाहरण आहे.

2016 साली, सनरायझर्स हैदराबादने आयपीएलचा विजेतेपद जिंकताना धवनने एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याव्यतिरिक्त, त्याने दिल्ली, मुंबई, आणि पंजाब संघांसाठी खेळले असून, विविध वेळांवर दिल्ली आणि पंजाब संघाचे कर्णधारपदही सांभाळले आहे.या सत्रात, धवनने पंजाब किंग्ससाठी खेळले, पण जखमेमुळे त्याच्या सीझनला अपूर्ण समाप्तीला सामोरे जावे लागले. धवनच्या आयपीएल करिअरने त्याला भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वपूर्ण स्थान दिले आहे, आणि त्याच्या आक्रमक आणि प्रभावी खेळीने अनेक चाहत्यांचे मन जिंकले आहे.

हे हि वाचा -  iphone ला टक्कर देणारी Google Pixel 9 सिरीज झाली आहे भारतात लाँच, बघा याची खरी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

FAQ

Shikhar Dhawan ने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरची सुरुवात कधी केली?

धवनने2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणम येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने मार्च 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Leave a Reply