नवीन वर्षात शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार; खतांच्या किंमती वाढणार..

Belgaum Belgavkar
2 Min Read

Increase in price of fertilizers

नवीन वर्षात रासायनिक खतांच्या किमती वाढणार; काय आहेत नवीन दर…

खरीप हंगामात झालेले नुकसान कसे भरुन काढावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असतानाच अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. रासायनिक खतांच्या (Chemical fertilizers) किमती आधीच जास्त असताना खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 पासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार रासायनीक खतांच्या किमतीमध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोयाबीनचे दर वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी विक्री थांबवली होती; मात्र उलट दर कमी झाले. खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 पासून रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या आहेत.

वाढीव दरानुसार डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) खताची किंमत प्रतिपिशवी 1350 रुपयांवरून 1590 रुपयांवर गेली आहे. टीएसपी 46 टक्के (ट्रिपल सुपर फॉस्फेट) खताची किंमत 1300 ऐवजी 1350, तर 10:26:26 आणि 12:32:16 या खतांच्या किमती 1470 रुपयांवरून 1725 रुपये होणार आहे. या परिस्थितीत, शेतकरी वर्गातून खतांच्या किमती वाढवण्याऐवजी कमी करण्याची मागणी होत आहे. त्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य बाजारभाव मिळावा, तसेच शेतीसाठी आवश्यक निविष्ठांच्या किमती नियंत्रणात ठेवाव्या, अशी मागणी आहे.

#FertilizerPriceHike #FarmersConcern #AgricultureChallenges #ChemicalFertilizers #RisingCosts #CropProduction #EconomicBurden #SoilHealth #SustainableFarming #MarketPrices #AgriculturalEconomy #FarmingCommunity #CropYields #FertilizerCosts #FarmersRights #FoodSecurity #AgricultureNews #FarmingSolutions #PriceIncrease #SupportFarmers

- Advertisement -

 

Increase in price of fertilizers
Increase in price of fertilizers

Increase in price of fertilizers

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *