सध्या CNG वर चालणाऱ्या गाड्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर अनेक नवीन नवीन गाड्या सध्या बाजारात येत आहेत. यातच समावेश आहे टाटा पंच (Tata Punch) आणि आता नवीनच आलेल्या Hyundai Exter CNG चा. नवीन नवीन तंत्रज्ञान आणि लोकांना जास्तीत जास्त फायदा आणि त्यांची सोय कशी होईल याकडे प्रत्येक कंपनी लक्ष देते. जुन्या CNG गाड्यांमध्ये काय त्रुटी होत्या किंवा अजून कंफर्ट कसा निर्माण करता येईल याचा विचार करूनच नवीन उत्पादन घेतले जाते आणि याचेच हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
Tata Punch ही गाडी सी.एन्.जी. ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञानाने बनवली गेली आणि लवकरच तिला प्रसिध्दी मिळाली पण आता भारतीय बाजारपेठेत या गाडीला टक्कर देण्यासाठी Hyundai Exter CNG ही गाडी आली आहे. Hyundai Motor India ने ही गाडी एस, एस एक्स आणि नाईट एडिशन अश्या तीन व्हेरियंटमध्ये बाजारात आणली आहे.
कसे आहे याचे CNG?
Hyundai Exter CNG ने या गाडीत दोन छोटे CNG सिलेंडर बसवले आहेत. एकाच मोठ्या सिलेंडर ऐवजी हा बदल करण्यात आला आहे. इतर CNG गाड्यांच्या तुलनेत या गाडीत सामान ठेवण्यासाठी बूट स्पेस सहजपणे उघडता येते हा या गाडीचा एक प्लस पॉइंट म्हणावा लागेल.
हे हि वाचा – कार घ्यायची, सी.एन.जी पण पाहिजे, बूट स्पेस पण पाहिजे आणि आटोमेटिक पण पाहिजे- TATA TIGOR
CNG to Petrol आणि petrol to CNG करता येते का?
होय. या Hyundai Exter CNG गाडीत इंटिग्रेटेड कंट्रोल युनिट बसवण्यात आले आहे त्यामुळे वाहनाचे CNG मधून पेट्रोल मध्ये आणि पेट्रोल मधून CNG मध्ये सहज रूपांतर करता येते.
Hyundai Exter CNG चे फीचर काय आहेत?
यात तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सहा एअर बॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC) अश्या काही फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जसे आपण आधी पाहिले यात दोन लहान CNG सिलेंडर बसवले आहेत त्यामुळे याची बूट स्पेस वाढली आहे. यात १.२ लिटरचे द्वी इंधन इंजिन आहे. यामुळे CNG तसेच पेट्रोलवर ही गाडी चालते. याच्या सिलेंडरची क्षमता ६० लिटर आहे आणि इंजिन ६० पी एस पॉवर जनरेट करते. ही Hyundai कार 27.1 किमी/किलो मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.यात ऑटोमिक गिअर बॉक्सचा पर्याय उपलब्ध नसेल. यात पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
तसेच या गाडीला टायर प्रेशर मॉनिटर, तीन पॉइंट सीट बेल्ट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, मागील सेन्सर, ऑटोमॅटिक हेडलाईट, एक फास्ट चार्जर टाइप-सी पोर्ट इत्यादी फीचर्स यात आहेत.
Hyundai Exter ची किंमत काय?
Hyundai Exter HY- CNG duo ची X ची किंमत 8.50 लाख ते 9.38 लाख अशी ठेवण्यात आली आहे.
Tata Punch नंतर ड्युअल सिलेंडर सोबत असलेली ही दुसरी कार ठरली आहे. त्यामुळे यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा.
1) What is the waiting period for hyundai Exeter CNG ?
For the availability and waiting period, we would suggest you to please connect with the nearest authorized dealer in your city as it depends on their stock book. Follow the link and select your desired city for dealership details.
2) What is the transmission type of Hyundai Exter?
The Hyundai Exter is available in Manual and Automatic transmission variants.
3) What is the fuel type of Hyundai Exter?
The Hyundai Exter has 1 Petrol Engine and 1 CNG Engine on offer. The Petrol engine is 1197 cc while the CNG engine is 1197 cc . It is available with Manual
4 thoughts on “टाटा पंचला टक्कर देणार आता ही गाडी किंमतही कमी – Hyundai Exter CNG”