चीनमध्ये नव्या व्हायरसचे थैमान, रुग्णालयांत मोठी गर्दी

Belgaum Belgavkar
3 Min Read

China faces Covid-like scare again : All you should know about HMPV & other viruses

कोरोनानंतर आता आणखी एका महामारीने काढले डोके वर; चीनमध्ये ‘त्या’ व्हायरसने माजवला हाहाकार

Human metapneumovirus

Msterious virus grips China, kids and elderly remain major targets

China battles new ‘mystery’ virus outbreak 5 years after Covid pandemic

2020 मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (Human metapneumovirus (HMPV)) वेगाने पसरत आहे, ज्यामुळे रुग्णालयांमध्ये खूप गर्दी होत आहे. या human metapneumovirus (HMPV) व्हायरसने चीनमध्ये कोरोनासारखा कहर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वृत्तानुसार, HMPV मुळे मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडत आहेत.

 

चीनी सोशल मीडियावर दावा केला जात आहे की HMPV, इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि COVID-19 सारखे अनेक व्हायरस एकाच वेळी रुग्णालयात पसरत आहेत. चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे आणि लोक चिंतेत आहे की, चीन सरकार या नवीन व्हायरसबद्दल योग्य माहिती देत ​​नाही. एनडीटीव्ही आणि रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनमधील आरोग्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत (Symptoms resemble those of the flu or a cold, including fever, cough, and runny nose, with some patients experiencing wheezing).

- Advertisement -

 

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. 2001 मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा असतो आणि हिवाळ्यामध्ये हे सर्वात सामान्य आहे.

 

HMPV चे मुख्य सॉफ्ट टार्गेट मुलं आणि वृद्ध आहेत. याच लोकांना कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक फटका बसला होता. व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना मास्क घालण्याचा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा आणि वारंवार हात स्वच्छ करण्याचा सल्ला दिला आहे.

 

चीनच्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, हिवाळ्यात श्वासोच्छवासाच्या आजारांची प्रकरणं देशात झपाट्याने वाढू शकतात. चीनच्या रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं की, ते या आजारावर लक्ष ठेवत आहेत. चीनी सरकार व्हायरसशी संबंधित वास्तविक डेटा आणि परिस्थिती पूर्णपणे उघड करत नसल्याने चिंता वाढली आहे.
Human metapneumovirus (HMPV) is a viral infection that typically leads to symptoms resembling those of the common cold

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *