Human error caused chopper crash that killed CDS Bipin Rawat
first Chief of Defence Staff (CDS)
- देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत
- हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू
- अपघातात रावत यांच्या पत्नीचाही मृत्यू
Mi-17 V5 crash that killed CDS Gen Bipin Rawat caused by ‘human error’, confirms defence report
Parliamentary panel report | General Rawat’s wife also died in the crash : देशाचे पहिले Chief of Defence Staff (CDS) जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता (Mi-17 V5 helicopter crash on December 8, 2021). या अपघातात रावत यांच्या पत्नीसह लष्करी अधिकाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले होते. या अपघाताचे कारण आता 3 वर्षांनी समोर आले आहे.
संसदेत रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा रिपोर्ट सादर करण्यात आला. यानुसार मानवी चुकांमुळे ही हेलिकॉप्टर दुर्घटना झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Human error behind chopper crash
8 डिसेंबर 2021 मध्ये एमआय 17 व्ही 5 या लष्करी हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ हे हेलिकॉप्टर कोसळले होते. संसदेत संरक्षण संबंधी स्थायी समितीने 13 व्या संरक्षण योजनेच्या काळातील भारतीय हवाई दलाच्या विमानांच्या अपघाताशी संबंधीत आकडे जाहीर केले. यामध्ये 34 अपघात झाल्याचे म्हटले आहे.
हे अपघात मानवी चूक असे म्हणण्यात आले आहेत. या अहवालात 33 वी दुर्घटना ही रावत यांच्या हेलिकॉप्टरची आहे. याचे नाव एमआय 17 असे देण्यात आले असून तारीख रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची आहे. यामध्ये मानवी चूक (एअर क्रू) / “Human Error (Aircrew)” असे नोंदविण्यात आले आहे. या सर्व अपघातांची चौकशी पूर्ण करण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
भारतीय वायुसेनेचे Mi-17 V5 हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील सुलूर हवाई दल तळावरून वेलिंग्टनमधील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाकडे जाण्यास निघाले होते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 12 सशस्त्र दलाचे कर्मचारी या विमानात होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले. या अपघातानंतर शौर्य चक्र पुरस्कार विजेते ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव बचावले होते. परंतू त्यांचा अपघाताच्या आठवडाभरानंतर मृत्यू झाला होता.
#BipinRawat #CDS #HelicopterCrash #HumanError #IndianAirForce #MilitaryAccident #Mi17V5 #TamilNadu #Kunnur #DefenceReport #TragicLoss #AviationSafety #IndianMilitary #AircrewError #GeneralRawat #WifeLoss #Courage #NationalHero #AviationAccident #RememberingRawat
Human error chopper crash CDS Bipin Rawat
Human error chopper crash CDS Bipin Rawat
Human error chopper crash CDS Bipin Rawat