निपाणी येथील हुडको कॉलनीमधील चोरी
बेळगाव—belgavkar—belgaum : निपाणी येथील हुडको कॉलनीमधील रहिवासी सावित्री माळगे यांच्या कुलूपबंद घरात 31 डिसेंबर रोजी चोरी झाली होती. या चोरीचा छडा लावण्यात बसवेश्वर चौक पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील संशयित सूरज राजू खानापुरे (रा. पट्टणकुडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडून साडेचार तोळ्याचे १ लाख ४८ हजार किंमतीचे सोन्याचे दागीने, ४५ हजार किंमतीची दुचाकी व अन्य असा मिळून १ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निपाणीतील हुडको कॉलनीत सावित्री माळगे या उमराणी या गावी त्यांच्या घराला कुलूप लावून ३१ डिसेंबर रोजी गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. तिजोरीतील सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. त्यामध्ये १५ ग्रॅमचा अंदाजे ६०,००० हजार किमतीचा नेकलेस, गंठण १० ग्रॅम अंदाज किंमत ३८,०००, कानातल्या तीन जोड्याआणि व्हेलची एक जोडी १५ ग्रॅम अंदाजे किंमत ४०,०००, हाताची अंगठी ३ ग्रॅम अंदाजे १०,००० यांचा समावेश आहे.
चोरीची फिर्याद माळगे यांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत सदर संशयितास जेरबंद करण्यात यश मिळवले. बेळगाव पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरीक्त अधीक्षक श्रुत्ती एन. बसनगौडा बसरगी, चिक्कोडीचे उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर, मंडल पोलिस निरीक्षक बी. एस. तळवार, उपनिरीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आर. जी. कुंभार, रामगौडा पाटील, मारुती कांबळे, जयश्री सांग्गोळी, रोहन मदने, प्रशांत कुदरी यांनी ही कारवाई केली.
Hudco Colony house burglary arrest in Nipani Belgaum
Hudco Colony house burglary arrest in Nipani Belgaum