Huawei Mate XT एक जगावेगळा मोबाईल: जगातील पहिला तीनवेळा फोल्ड होणारा मोबाईल झाला लाँच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Huawei Mate XT:– चीनची प्रसिद्ध कंपनी असलेल्या Huawei ने आपला जगावेगळा मोबाईल लाँच केला आहे. यात जगावेगळे म्हणजे हा मोबाईल ट्राय फोल्ड म्हणजेच तीन वेळा फोल्ड होणारा जगातला पहिला मोबाईल ठरला आहे. टॅबलेट सारखा दिसणारा हा स्मार्टफोन खूपच भन्नाट फीचर्स सह लाँच झाला आहे. याच्या तीन फोल्ड होण्यामुळे संपूर्ण जगभरात याच मोबाईलची चर्चा सुरू आहे. चला तर मग जाणून घेऊया भारतात या मोबाईलची किंमत किती आहे ते.

आत्तापर्यंत आपण एक किंवा दोनवेळा फोल्ड होणारा मोबाईल पाहिला आहे पण मोबाईलच्या या जगात आता एक विक्रम घडून आला आहे. चक्क तीनवेळा फोल्ड होणारा मोबाईल Huawei कंपनीने बाजारात आणला आहे.


Huawei Mate XT trifold
Huawei Mate XT trifold

9 सप्टेंबर रोजी सगळ्यांचे लक्ष iphone च्या नव्या लाँच होणाऱ्या सिरिजकडे लागले होते. iPhone लाँच होताच काही तासातच चिनी कंपनीने आपला हा आगळावेगळा मोबाईल लाँच केला आणि तो अल्पावधीतच लोकप्रिय ठरला आहे. याच्या फोल्डिंग वरूनच अंदाज लावता येत आहे हा मोबाईल किती मोठा असेल त्याचा.

जेव्हा Samsung, OnePlus, Oppo अश्या कंपन्यांनी आपले double folding मोबाईल बाजारात आणले तेव्हाच सगळे दंग होऊन हे नवे तंत्रज्ञान पाहत होते. हे पचनी पडते न पडते तोवरच चिनी कंपनी Huawei ने आपला हा आगळा वेगळा मोबाईल लाँच करून सगळ्यांना थक्क करून ठेवले आहे. Huawei Mate XT नाव असलेला हा मोबाईल जेव्हा पूर्ण उघडला जातो तेव्हा त्याचा डिस्प्ले आकार 10.2 इंच होतो.



Display and design of Huawei Mate XT

Huawei Mate XT हा मोबाईल जास्तीतजास्त लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे याचा ट्राय फोल्ड होणारा डिस्प्ले आहे. हा मोबाईल पूर्ण उघडला की टॅबलेट सारखा होतो आणि फोल्ड करून स्मार्टफोन सारखा वापरता येतो.

हे हि वाचा -  आनंदाची बातमी vande bharat स्लीपर ट्रेन सुरू होणार

यात 6.4-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. जर हा डिस्प्ले फोल्ड करून एकदा उघडला तर या फोनची स्क्रीन साइज 7.9 इंच होते आणि जेव्हा दुसऱ्यांदा फोल्ड करून उघडल्यावर या फोनची स्क्रीन साइज 10.2 इंच होते आणि हा फोन पूर्णपणे टॅबलेटमध्ये बदलतो.

या मोबाईलच्या डिस्प्ले resolutions बद्दल बोलायचे झाल्यास ते 1 पॅनेल: 2232 x 1008 px, 2 पॅनल: 2232 x 2048 px आणि 3 px 241 x 3 px 3 px असे असेल.

Huawei Mate XT Processor and Performance

Kirin 9 चिपसेटचा या खास मोबाईलमध्ये वापर करण्यात आला आहे. यामुळे फास्ट परफॉर्मन्स मिळेल. तसेच यात 16GB रॅमसह 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज पर्याय आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार हा मोबाईल हाय एंड गेमिंग आणि Multi tasking साठी सर्वोत्तम आहे.

Huawei Mate XT Features and Software

Huawei Mate XT हा EMUI 13 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो जी सिस्टिम Android OS वर आधारलेली आहे. या मोबाईलमध्ये गूगल सेवा चालत नाहीत परंतु असे असले तरीही कंपनीने स्वतःचे ॲप्स आणि सेवा यात दिल्या आहेत. जर आपण याच्या बॅटरी बद्दल बोललो तर यात 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5600mAh ची मोठी बॅटरी आहे.

Huawei Mate XT Maintenance Cost

GSM Arena नुसार Huawei ने Mate XT दुरुस्ती शुल्काची अधिकृत यादी जारी केली आहे. स्क्रीन बदलण्यासाठी 7999 चीनी युआन किंवा सुमारे 94000 रुपये खर्च येईल. वापरकर्त्याने जुना डिस्प्ले ठेवण्याचे निवडल्यास दुरुस्तीसाठी 9799 चीनी युआन किंवा सुमारे 115000/- रुपये खर्च येईल. मदरबोर्डमध्ये बिघाड झाल्यास 1TB मॉडेल बदलण्याची किंमत 10699 चीनी युआन किंवा अंदाजे 126000/- रुपये असू शकते.


Video Credit – Trakin Tech

Huawei Mate XT Camera

या मोबाईलमध्ये ट्रिपल Rear कॅमेरा सेटअप आहे. याचा मुख्य कॅमेरा 50MP तर Ultra wide camera आणि telephoto Camera प्रत्येकी 12MP चे आहेत. याचप्रमाणे याचा सेल्फी कॅमेराही 8MP चा आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा मोबाईल फोटोग्राफी आणि videography साठी सर्वोत्तम आहे.

हे हि वाचा -  iPhone 16 Pro and iPhone 16 Pro Max launching : सप्टेंबर महिन्यात होणार आहे आयफोन 16 सिरीज लाँच! बघा अपेक्शित फीचर्स.

Huawei Mate XT Price and availability

Huawei Mate XT या दमदार फीचर्स आणि जगातला पहिला तीन वेळा फोल्ड होणारा फोन हे पाहता याची किंमतही तशीच आहे. चिनी युआन मध्ये या मोबाईलची सुरुवातीची किंमत 19999/- म्हणजेच 2810/- डॉलर्स आहे. भारतीय रुपयात ही किंमत जर पाहायला गेलो तर ही किंमत जवळजवळ 2 लाख 35 हजारांहून अधिक असेल. तसेच पाकिस्तानी चलनात याची किंमत 7 लाखांहून अधिक आहे.

Huawei Mate XT Price depends on Variants

Storage Variant Price in Chinese Yuan Price in Indian Rupees
16GB + 256GB19999/-235900/-
16GB + 512GB21999/-259500/-
16GB + 1TB23999/-283100/-
सध्या हा मोबाईल फक्त आणि फक्त चीनमध्ये उपलब्ध आहे पण कंपनी लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारात हा मोबाईल लाँच करणार आहे. यात दोन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. ज्यात Rui Red आणि Dark Black असे पर्याय आहेत.

FAQ

  1. Does the Huawei Mate XT have any Colour options?

    It is available in two colours; Rui Red and Dark Black.

  2. Does the Huawei Mate XT have Google services?

    No, it can’t support any Google services.

Leave a Reply