कसा साजरा केला जातो दहीहंडी सण (Dahihandi) , काय आहे गोपाळकाल्याचा इतिहास ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रावण महिना सुरू झाला की सुरू होते सर्व सणांची रेलचेल! यातलाच एक सण म्हणजे जन्माष्टमी आणि गोपाळकाला (Dahihandi) . ज्या दिवशी श्री कृष्णाचा जन्म झाला तो दिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरी करण्याची परंपरा आहे. रात्री १२ वाजता श्री कृष्णाचा जन्म आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.

श्री कृष्णाच्या जन्माचा इतिहास आणि गोकुळातील वास्तव्य (Dahihandi)

श्री कृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार होता. कृष्णाचा जन्म मथुरा नगरीतील देवकी व पिता वासुदेव यांच्या पोटी कारागृहात झाला. कंसाचा वध करण्यासाठी देवकीच्या पोटी आठवा पुत्र जन्माला येईल हे देवीने सांगितले होते आणि म्हणूनच कंस कोणतीही विषाची परीक्षा नको म्हणून देवकीच्या अपत्यांना जन्मतःच मारून टाकत होता.

आठव्या वेळी मात्र रात्री बारा वाजता कोणालाही काहीही न समजता देवकीने कृष्णाला जन्म दिला. वासुकीच्या हातापायात असलेल्या बेड्या आपोआप निखळून पडल्या. कारागृहाच्या बाहेर तैनात असलेले दानव सैनिक निद्रेच्या अधीन झाले आणि कारागृहाचे द्वार उघडले गेले. कृष्णाच्या जन्माची बातमी कंसापर्यंत पोहोचण्या आधी वासुदेव एका टोपलीत श्री कृष्णाला घेऊन गोकुळ गाठले.

बाळ कृष्णाचे संपूर्ण बालपण यशोदा मातेच्या संगोपनात गोकुळात गेले. गोकुळात आल्यावर श्री कृष्ण त्याच्या बाललीला/ कृष्णलीला दाखवू लागला. श्री कृष्णाचा जन्म मध्यरात्री बारा वाजता श्रावण महिन्यातील अष्टमीला (Dahihandi) झाला. त्यावेळी रोहिणी शुभ नक्षत्र होते. ज्या ज्या वेळी असा योग जुळून येतो तेव्हा तेव्हा ते खूप शुभ मानले जाते.

हे हि वाचा -  वास्तू कलेचा अद्भुत नमुना असलेल्या kopeshwar temple, खिद्रापूर मंदिराला संवर्धनासाठी 21 कोटींचा निधी

काय आहे गोपाळकाल्याचा (Dahihandi) इतिहास?

बालगोपाल श्री कृष्णाच्या जन्माच्या निमित्ताने अनेक ठिकाणी दहीहंडी (Dahihandi) साजरी केली जाते. लहानपणी श्री कृष्णाला दूध, दही, लोणी हे पदार्थ फार आवडायचे. कृष्णापासून दह्याचे, लोण्याचे रक्षण करण्यासाठी यशोदा माता ती हंडी उंचावर लटकवून ठेवायची पण बाळ कृष्ण आपल्या मित्रांच्या साथीने तिथवर पोहोचण्यात यशस्वी व्हायचा आणि सगळे बाल गोपाळ ते फस्त करायचे. या बाल कृष्णाच्या सर्व मित्रांपासून आपल्या घरचे दही, लोणी सुरक्षित ठेवण्यासाठी सगळेच गावकरी असे करायचे पण काही ना काही मार्ग काढून ही टोळी ते फस्त करायचीच. या क्षणाची आठवण म्हणून दहीहंडी (Dahihandi) हा सण साजरा केला जातो.

कसा साजरा केला जातो दहीहंडी (Dahihandi) सण?

दहीहंडी (Dahihandi) दिवशी ठिकठिकाणी स्पर्धा आयोजित केलेल्या असतात. आदल्या दिवशी म्हणजेच जन्माष्टमी दिवशी सर्व कृष्ण मंदिरे फुलांनी आणि दिव्यांनी सजवलेली असतात. रात्री बारा वाजता कृष्ण जन्म होईपर्यंत भक्तगण श्री कृष्णाच्या भजनात तल्लीन झालेला असतो. दिवभर उपवास केला जातो. श्री कृष्णाची भजने, कीर्तने, आरत्या केल्या जातात. रात्री बारा वाजता बाळ कृष्णाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून पाळणा गायला जातो.

दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी दहीहंडी (Dahihandi) बांधली जाते. अनेक गोविंद पथके ही हंडी फोडण्यासाठी सज्ज असतात. यासाठी महिना महिना आधी सराव देखील केला जातो. कोणते पथक किती हंडी फोडते, कोणते पथक सगळ्यात उंच बांधलेली हंडी फोडते याच्या स्पर्धा लागतात.

त्या हंडी दह्या, लोण्याने भरल्या जातात. गोविंदा पथक एकावर एक थर रचत दहीहंडी (Dahihandi) पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात वर चढलेली व्यक्ती हंडी फोडते. इतर माणसे त्यांना घेरून गाणी गातात, नृत्य करतात आणि जल्लोषात हा सण साजरा करतात. विविध बक्षिसे देऊन गोविंदा पथकांचा सन्मान देखील केला जातो.

हा खेळ कृष्णाच्या आख्यायिकेवर आधारित आहे. कृष्ण लहानपणी त्याच्या मित्रांच्या साथीने गोकुळातील लोकांच्या घरून लोणी चोरून घेऊन जायचा म्हणूनच त्याला माखन चोर असे नाव देखील पडले. या चोरीपासून वाचण्यासाठी लोकं त्यांची लोण्याची भांडी उंचावर लटकवून ठेवायचे तरीही कृष्ण यात यशस्वी व्हायचा. त्याच गोष्टीच्या स्मरणार्थ दहीहंडी साजरी केली जाते.

हे हि वाचा -  भारतातील बारा ज्योतिर्लिंग ची माहिती वाचा सविस्तर मराठीमध्ये -12 jyotirlinga Marathi

गोपाळकाला म्हणजे काय?

गोपाल म्हणजे गायी पाळणारा आणि काला म्हणजे एकत्र मिळवणे. या दिवशी पोहे, ताक, ज्वारीच्या किंवा धान्यांच्या लाह्या, लोणचे, भिजवलेली हरबरा डाळ, साखर, फळांच्या फोडी असे सर्व जिन्नस एकत्र केले जातात म्हणजेच काला केला जातो. हा खाद्यपदार्थ कृष्णाला अतिशय प्रिय होता. श्री कृष्ण त्याच्या सवंगड्यांसोबत गायी चरायला सगळ्यांनी आणलेले पदार्थ असे एकत्र करून म्हणजेच काला करत असे आणि सगळे मिळून तो वाटून खात असत असे सांगितले जाते.


FAQ:-

दहीहंडीत (Dahihandi) काय असते?

दूध, दही, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ एका मातीच्या भांड्यात ठेवून ती हंडी उंचावर टांगली जाते.

दहीहंडी (Dahihandi) साठी कोणते शहर प्रसिद्ध आहे?

मुंबई, गुजराथ, गोवा या संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरी केली जाते.

जन्माष्टमी २०२४ कधी आहे?

२६ ऑगस्ट २०२४ रोजी जन्माष्टमी आहे.

गोपाळकाला २०२४ कधी आहे?

२७ ऑगस्ट २०२४ रोजी गोपाळकाला आहे.

Leave a Reply