Give timely information on outbreaks in China, India tells WHO
HMPV outbreak in China: Is it a new virus? How is it similar to Covid-19?
No unusual rise in respiratory illnesses, influenza cases in India – Health Ministry
चीनमध्ये कोरोना सारख्या पसरणाऱ्या ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसमुळं (एचएमपीव्ही) घाबरण्याचं कारण नाही. कारण चीनमध्ये सध्या या आजाराचं प्रमाण वाढत असलं तरी तिथली परिस्थिती असामान्य नाही. तसंच श्वसनामार्फत पसरणारं संक्रम हाताळण्यासाठी सज्ज आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
HMPV has been observed in India
चीनमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त मॉनिटरिंग ग्रुपच्या बैठकीनंतर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली. मंत्रालयानं म्हटलं की, कोणत्याही संभाव्य धोक्यांबद्दल माहिती मिळवण्यासाठी अधिकारी जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि इतर आंतरराष्ट्रीय चॅनेलच्या माध्यमातून बारकाईनं निरीक्षण करत आहे. तसेच जागतीक आरोग्य संघटनेला (WHO) वेळेवर सूचना देण्याची विनंती करण्यात आली आहे. HMPV सारखे विषाणू भारतात आधीपासूनच आहेत, पण सध्याच्या देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा कोणत्याही संभाव्य आजारांचं व्यवस्थापन करण्यात सक्षम आहे, असंही मंत्रालयानं नमूद केलं आहे.
‘India well-prepared’: Government says closely monitoring HMPV situation in China
त्यामुळं नागरिकांनी गोंधळून जाऊ नये शांत राहावं. स्वतःच्या शरिराची स्वच्छता राखवी आणि काही लक्षणं दिसल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा, तसंच काही एसओपीजचं देखील पालन करावं, असं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, चीनमध्ये श्वासामार्फत पसरणाऱ्या आजारांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा व्हायरल या आजारासाठी कारणीभूत ठरल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या महिन्यातच चिनी सरकारनं या आजारांची हिवाळ्यात वाढ होऊ शकते हे लक्षात घेता यासाठी तपासणी यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आहे. याबाबत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये HMPV झपाट्याने पसरत असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये प्रामुख्यानं मुलं आणि वृद्धांना त्रास होऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.
HMPV मुळं सामान्यतः सर्दीसारखी लक्षणं दिसतात, जसं की खोकला, घरघर, नाक वाहणे किंवा घसा खवखवणे अशी लक्षणं दिसतात. तथापि, लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या व्यक्तींमध्ये जर याची लक्षण दिसून आली तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक असल्याचंही सांगितलं जात आहे. पण आता सरकारनं नागरिकांना दिलासा दिल्यानं सरकार वेळोवेळी जे निर्देश देईल त्याचं पालन केल्यास या आजारापासून दूर राहता येऊ शकतं.
HMPV outbreak in China
HMPV outbreak in China