HMD Crest Series- 25 जुलै ला भारतात झाली आहे लाँच! या तारखे पासून येणार खरेदी करता.

Pravin Wandekar
5 Min Read
sakaltime.com

HMD Crest series: HMD स्मार्टफोन च्या बाबतीत या वर्षाच्या सुरवाती पासूनच बातम्या येत होत्या, अखेर HMD कंपनी ने आपले स्मार्टफोन बाकी देशान समवेद भारतात लाँच केलेले आहे.तसेच हा स्मार्टफोन 6 ऑगस्ट पासून हा खरेदी करता येणार आहे. HMD Crest या सिरीज मधील स्मार्टफोन मध्ये 6.67 इंचाचा मोठा डिस्प्ले दिलेला आहे, जो FHD+ रिझोल्यूशनसह येतो. यामुळे तुम्हाला चांगला आणि स्पष्ट दृश्य अनुभव मिळतो.तसेच स्क्रीनवरील तपशील अधिक स्पष्ट आणि रंगीत दिसतात, ज्यामुळे तुम्ही मुव्ही पाहणे, गेम खेळणे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मल्टीमीडिया सामग्रीचा आनंद घेऊ शकतात. याचा प्रकारे या स्मार्टफोनमध्ये खूप नवनवीन व धमाकेदार फीचर्स दिलेले आहे,चला तर मग यामधील सर्व फीचर्स बद्दल जाणून घेऊया.

HMD Crest series Display

HMD Crest series मध्ये OLED डिस्प्ले दिलेला आहे. या डिस्प्ले मुले स्क्रीनवर रंग अधिक जिवंत आणि गडद दिसतात. यामुळे वाचन किंवा व्हिडिओ पाहताना अधिक तीव्रता मिळते.तसेच या स्मार्टफोन मध्ये 6.67 इंची मोठी स्क्रीन दिलेली आहे, जी मोठ्या आणि आरामदायक दृश्य अनुभवासाठी खूप छान आहे. या आकारामुळे गेमिंग करताना किंवा फिल्म पाहताना अधिक आनंद मिळतो. व या स्मार्टफोन मध्ये 1080 x 2400 पिक्सल रिझोल्यूशन दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला उच्च-गुणवत्तेची फोटोग्राफ आणि व्हिडिओ मिळतात. FHD+ (फुल HD+) रिझोल्यूशनामुळे स्क्रीनवर अधिक तपशील आणि स्पष्टता प्राप्त होते.

HMD Crest Series

HMD Crest Series Colour

HMD Crest या series मधील स्मार्टफोनमध्ये तीन आकर्षक रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे ज्यामध्ये डीप पर्पल,रॉयल पिंक, आणि एक्वा ग्रीन हे तीन कलर उपलब्ध आहे.

HMD Crest Series Camera

या सिरीज मधील स्मार्टफोन्स मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. ज्यामध्ये 64 MP वाइड अँगल प्राइमरी कॅमेरा, 5 MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2 MP मॅक्रो कॅमेरा दिलेला आहे. तसेच या कॅमेऱ्यांमध्ये ऑटोफोकस आणि LED फ्लॅश देखील आहे, ज्यामुळे तुमच्या फोटोंमध्ये अधिक स्पष्टता आणि ब्राईटपणा अनुभवता येतो. या कॅमेऱ्यांद्वारे उच्च गुणवत्ता असलेले फोटोस काढता येतात. तसेच या स्मार्टफोन मध्ये सेल्फी साठी 50 MP प्राइमरी कॅमेरा दिलेला आहे. तसेच यामुळे तुम्हाला उच्च गुणवत्तेच्या आणि स्पष्ट सेल्फींचा अनुभव मिळतो.

- Advertisement -

हे हि वाचा  – OnePlus Open Apex Edition to Launch in India : वन प्लस चा हा स्मार्टफोन अनोख्या रंगात होतोय भारतात या दिवशी लाँच!

HMD Crest Series Battery

HMD Crest या series मधील स्मार्टफोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी दिलेली आहे, जी एका चार्जमध्ये दीर्घकाळ टिकते.तसेच यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते,त्यामुळे ती जलद गतीने चार्ज होऊ शकते. याशिवाय यामध्ये USB Type-C पोर्ट देखील उपलब्ध आहे, जो डेटा ट्रान्सफर आणि चार्जिंगसाठी दिलेला आहे.

HMD Crest Series Processor

हा स्मार्टफोन Unisoc T760 या प्रोसेसर सह लाँच झालेला आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये Android v14 हि ऑपरेटिंग सिस्टिम दिलेली आहे. तसेच या सिरीज मधील HMD Crest या स्मार्टफोन मध्ये 8 GB रॅम व 128 GB इंटरनल स्टोरेज दिलेले आहे.तसेच HMD Crest Max या स्मार्टफोन 8GB RAM आणि 256GB स्टोरेज दिलेले आहे.

HMD Crest Series Sensor

या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिलेले आहे, जो उजव्या साईड ला दिलेला आहे. यासोबतच, अतिरिक्त सेन्सर्समध्ये लाईट सेन्सर, एक्सलेरोमीटर, कम्पास आणि जायरोस्कोप दिलेले आहेत. यामुळे तुमच्या स्मार्टफोनचा वापर अधिक सोयीस्कर आणि स्मार्ट होतो.

HMD Crest series Network & Connectivity

या स्मार्टफोनमध्ये डुअल SIM स्लॉट आहे, ज्यामध्ये दोन्ही SIM नॅनो आकाराचे आहेत. SIM1 आणि SIM2 दोन्ही 5G, 4G, 3G, आणि 2G नेटवर्कला समर्थन देतात, भारतात 5G नेटवर्क उपलब्ध आहे. याशिवाय, VoLTE सुद्धा उपलब्ध आहे, जे तुमच्या कॉलिंग अनुभवाला सुधारते.तसेच या स्मार्टफोन मध्ये Wi-Fi, Wi-Fi Features, Bluetooth, GPS, NFC,USB या सर्व काँनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.

HMD Crest series Price In India

HMD Crest च्या 6GB+128GB वेरियंटची किंमत भारतात Rs 14,499 इतकी आहे.तर दुसरीकडे, HMD Crest Max च्या 8GB+256GB वेरियंटची किंमत ही Rs 16,499 इतकी आहे. तसेच, HMD Crest Max अधिक उच्च-प्रदर्शन आणि विस्तारित स्टोरेजसह एक प्रीमियम पर्याय आहे.

FAQ

1) HMD Crest सिरीज च्या स्मार्टफोन्स च्या बॅटरीची क्षमता काय आहे?

HMD Crest मध्ये 5000 mAh क्षमता असलेली बॅटरी आहे, जी जलद 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

2) HMD Crest सिरीज च्या स्मार्टफोन्स मध्ये कोणते रंग पर्याय आहेत?

HMD Crest तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे: डीप पर्पल, रॉयल पिंक, आणि एक्वा ग्रीन.

3) HMD Crest सिरीज मधील HMD Crest या स्मार्टफोन मध्ये किती स्टोरेज आणि RAM आहे?

HMD Crest मध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह उपलब्ध आहे.

4) HMD Crest सिरीज मधील HMD Crest Max या स्मार्टफोन स्टोरेज आणि RAM पर्याय काय आहेत?

HMD Crest Max मध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह उपलब्ध आहे.

Share This Article
2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *