कर्नाटक : 60 टक्के कमिशन | कुमारस्वामी संतापले

Belgaum Belgavkar
1 Min Read

HD Kumaraswamy levels 60% commission charge against Karnataka govt

Kumaraswamy claims 60% corruption in contracts

कर्नाटक—belgavkar—belgaum : केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आले आहे. कुमारस्वामी यांना दौऱ्यासाठी वाहन उपलब्ध करून न दिल्याने राज्य सरकारने राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

हे दरवाढीचे सरकार

सध्या कुमार स्वामी हे केंद्र सरकारच्या वाहनातून मंड्या, म्हैसूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आहेत. यावेळी त्यांनी कर्नाटकातील बस तिकीट दरवाढीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली सरकार सर्वसामान्यांची लूट करत असून हे दरवाढीचे सरकार आहे, असे कुमारस्वामी म्हणाले.

काँग्रेसच्या काळात आता 60 टक्के कमिशन घेण्यात येत असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, थेट विधानसौधमध्ये मंत्री लाच घेत आहेत. सर्वच खात्यांमध्ये भ्रष्टाचार मोठ्याप्रमाणात वाढला आहे. मंत्र्यासाठी किती कमिशन द्यायचे हे ठरलेले आहे, असे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि कंत्राटदार सांगत आहेत.

HD Kumaraswamy commission charge Karnataka
HD Kumaraswamy commission charge Karnataka

- Advertisement -

HD Kumaraswamy commission charge Karnataka

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *