Gharat Ganpati चित्रपट पाहिलात का ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gharat Ganpati Marathi Film : कोकण आणि गणेशोत्सव याचा खूप घनिष्ठ संबंध आहे. वर्षभर कोकणातला चारकरमानी कुठेही असो पण गणेशोत्सवच्या वेळी तोच चाकरमानी कोकणात धावत येतो. कोकणात आणि कोकणी माणसाच्या मनात गणेशोत्सवाला एक वेगळे आणि महत्त्वाचे स्थान आहे. आणि याच कोकणी माणसाच्या मनात गणेशोत्सवावरती आधारित चित्रपट म्हणजे ‛ घरत गणपती’

या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखन नरेंद्र बांदिवडेकर यांनी केले आहे. या चित्रपटात अनेक जेष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते.

‘Gharat Ganapati’ film star cast

‘Gharat Ganpati’ दिग्दर्शक आणि लेखन-नरेंद्र बांदिवडेकर
निकिता दत्ता
भूषण प्रधान
अजिंक्य देव
अश्विनी भावे
संजय मोने
शुभांगी लाटकर
शुभांगी गोखले
डॉ.शरद भुताडीया
सुषमा देशपांडे
या सर्वांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Gharat Ganpati  चित्रपट  पाहिलात का ?

‘Gharat Ganapati’ movie story

कोकणातील छोट्या खेड्यात घडणारी ही कथा! या कथेची सुरवातच होते गणपती शाळेपासून जिथे गणपतीच्या नेत्रांचे रेखाटन सुरू असते आणि तो गणपती असतो घरत कुटुंबाचा! पूर्ण कथा ही गौरी गणपती सणा भोवती सुंदर रित्या गुंफलेली आहे. गौरी गणपतीच्या सणाची परंपरा घरत कुटुंबात 124 वर्षांपासून सुरू असते आणि या सणासाठी सगळे कुटुंब एकत्र येत असते आजी-आजोबा,भाऊ-बहीण, ननंद-भावजय त्यांची मुले असे सगळे या सणाच्या निमित्ताने एकत्र येतात. त्यात मग त्यांच्या नात्यांमधील प्रेम, हेवे-दावे आणि नात्यातील विविध पैलू आपल्याला ‘Gharat Ganpati’ या चित्रपटात पहायला मिळतात.

माई (सुषमा देशपांडे) आणि अप्पा (डॉ. शरद भुताडीया) हे दोघे या कुटूंबातील घरत वाड्यातील जेष्ठ आणि कुटुंब प्रमुख त्यांचा एक मुलगा गावाकडे तर एक मुलगा शहरात राहतो.शरद (अजिंक्य देव) अहिल्या (अश्विनी भावे) दोघे ही शहरात स्थिरस्थावर झालेले असतात आणि गावाकडच्या भावाला आर्थिक पाठबळ देत असतात. तर भाऊ (संजय मोने) सुनंदा (शुभांगी लाटकर) हे दोघे गावातील सुपारी-नारळीच्या बागा राखत असतात.सुनंदा (शुभांगी लाटकर) या घरातल्या सदस्यांना काय हवे नको पाहते. कुसुम आत्या (शुभांगी गोखले)आणि अशोक भावोजी ( समीर खांडेकर) हे घरत यांचे मुलगी आणि जावई असतात. या कुटुंबात होणारे मतभेद, हेवे दावे याची कथा गौरी-गणपती या सणा भोवती फिरत राहते.

हे हि वाचा -  monkeypox virus वेगाने पसरतोय; पाहा काय आहेत लक्षणे

Love story from ‘Gharat Ganapati’ movie

गौरी गणपतीच्या सणाला एकत्र आलेल्या घरत कुटुंबात अचानक एका पाहुण्याचा प्रवेश होतो. कोणतीही पूर्वकल्पना न देता केतन (भूषण प्रधान) त्याच्या दिल्लीतील मैत्रिणीला अर्थात क्रिती अहुजा (निकिता दत्ता) हिला आपल्या गावी घेऊन येतो. क्रिती ही केतनची प्रेयसी असते. परंतु ही बाब सुरुवातीला तो आपल्या कुटुंबापासून लपवतो. केतनच्या भावंडांना म्हणजेच जितू (आशिष पाथोडे), निनाद (रूपेश बने), नेहा (राजसी भावे), दिपाली (परी तेलंग) यांना त्यांच्या प्रेमसंबंधांचा अंदाज आलेला असतो. क्रितीनं कुटुंबातील सर्वांची मनं जिंकावी हा तिला घरी आणण्यामागचा हेतू असतो. परंतु, केतनच्या आईला (अहिल्या – अश्विनी भावे) त्याचं प्रेमप्रकरण रुचलेलं नसतं. हळूहळू क्रिती घरातील ज्येष्ठ आप्पा (डॉ. शरद भुताडिया) आणि माई (सुषमा देशपांडे) यांचं मन जिंकते.पण अहिल्या आणि बाकी लोकांचे ती मग जिंकते का हे पाहण्यासारखे आहे.

त्यातच माई-अप्पाची मुलं पुढच्या वर्षीपासून ही घरत घराण्याची गौरी-गणपती परंपरा मोडीत काढायला निघतात. गणपती पुढच्या वर्षीपासून दिड दिवसांचाच असावा असा प्रस्थाव माई आणि अप्पांच्या पुढे मांडला जातो.

त्यामागे भाऊची होणारी आर्थिक ओढाताण असतेच पण बाकी सदस्यांचे एकमेकांच्या मनात असलेले हेवे-दावे, हे देखील कारण असतेच

‘Gharat Ganpati’ या चित्रपटात कोकणातील पारंपरिक गौरी-गणपती हा सण दाखवण्यात आला आहे. तसेच आपल्या परंपरा, सांस्कृतिक सणाचे दर्शन होते आणि हा चित्रपट याच सणा भोवती एका कुटुंबाच्या भावनिक, आर्थिक आणि पारंपरिक नाते संबंध, गणपती वरील श्रद्धा या सगळ्यात गुंफला गेला आहे.

124 वर्षांची घरत कुटुंबाची गौरी-गणपती सणाची परंपरा मोडीत निघेल का? सगळे एकमेकांविषयी असलेले हेवे-दावे विसरून एकत्र येतील का? पण कसे? केतन आणि क्रिती यांच्या प्रेमाचा स्वीकार घरत कुटुंब करणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी ‘Gharat Ganpati’ हा चित्रपट पहावा लागेल.

निष्कर्ष

‘Gharat Ganpati’ चित्रपटाची कथा काही विशेष नाही. टिपिकल कथा असलेला हा कौटुंबिक मराठी चित्रपट आहे. तेच कुटुंबातील हेवे-दावे आणि तीच लव्हस्टोरी पण या कथेला गौरी-गणपती सणाची जोड दिली आहे त्यामुळे कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव आपल्याला चित्रपटातून पहायला मिळतो. तसेच कोकणातील निसर्ग सौंदर्य डोळ्यांना सुखावते.

बाकी सगळे कलाकार कसलेले असल्यामुळे सगळ्यांनी त्यांच्या भूमिका उत्तमरीत्या पार पडल्या आहेत.पात्रांच्या संबंधातील पेच आणि गांभीर्य वैभव चिंचाळकर आणि चेतन सैंदाणे यांनी संवादातून चांगल्या प्रकारे दाखवले आहे.

कौटुंबिक नातेसंबंधामधील कथा आणि त्या जोडीला असलेली एक प्रेमकथा! एकत्र कुटूंबतीलच मानसिकता त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध त्यांच्या मनातील राग-लोभ आणि गणेशोत्सवच्या सणा भोवती फिरणारी ही कथा ज्यांना कौटुंबिक चित्रपट पहायची आवड आहे त्यांनी ‘Gharat Ganpati’ हा चित्रपट एकदा पहायला काहीच हरकत नाही.

2 thoughts on “Gharat Ganpati चित्रपट पाहिलात का ?”

Leave a Reply