Harshit Godha’s Success story of Avocado Farming:- इंडो इस्त्रायल ॲवोकाडो ही हर्षित गोधा यांची स्वतःची कंपनी असून ते लंडनमध्ये शिकत असताना त्यांना या शेतीविषयी प्रेरणा मिळाली. तिथे शिकत असताना लंडनमध्ये इस्त्रायल मधून आणलेले avocado पाहिले आणि त्यांचा यात रस निर्माण झाला.
Harshit Godha यांनी लंडनमध्ये आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. भारतात परत आल्यावर त्यांनी एक आगळीवेगळी शेती सुरू केली आणि आज ते कोट्यवधीचे मालक आहेत. तिथे BBA चे शिक्षण घेत असताना त्यांना तेथील शेतीच्या पद्धतीची आवड निर्माण झाली. भोपाळच्या राहणाऱ्या हर्षित गोधा यांनी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना इस्त्रायल मधून आयात केलेले avocado चे पॅकेट पाहिले आणि त्यांची इस्त्रायल शेती पद्धतीत रुची निर्माण झाली. भारतात परत आल्यावर त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली.
Harshit Godha phone number is +919799909824.
लंडनमध्ये उच्च शिक्षण घेऊन भारतात सुरू केली शेती
Harshit Godha यांचे लंडनमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी इंटर्नशिप सुरू केली. इंटर्नशिप सुरू असताना त्यांना लंडनमध्ये इस्त्रायल मधून फळ आयात झाले आहे ही गोष्ट खास वाटली. याच दरम्यान त्यांच्या मनात शेती विषयी उत्सुकता निर्माण झाली आणि ते इंटर्नशिप अर्धवट सोडून इस्त्रायलला गेले.
इस्त्रायलला पोहोचल्यावर त्यांनी इस्त्रायली शेतकऱ्यांकडून तेथील शेती करण्याचं तंत्र आणि शेती विषयी काही माहिती घेतली. तेथील शेतकऱ्यांकडून इस्त्रायली पद्धतीची शेती शिकून आल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये भोपाळमध्ये ‘इंडो इस्त्रायल ॲवोकाडो’ नावाची कंपनी सुरू केली. आज त्यांच्या या ॲवोकाडोच्या शेतीतून ते कोटींची कमाई करत आहेत.
Avocado च्या १८०० रोपांची लागवड
इस्त्रायल शेतकऱ्यांकडून प्रशिक्षण घेऊन ते आपल्या घरी भोपाळला परत आले. भोपाळला परत आल्यावर त्यांनी विदेशी फळ Avocado Farming सुरू केली. भोपाळमध्येच पाच एकर जमिनीवर त्यांनी Avocado ची १८०० रोपे लावली.

इस्त्रायल मधून केली २० हजार रोपांची आयात
आपल्या पाच एकर जमिनीवर लावण्यासाठी Harshit Godha यांनी इस्त्रायल मधून २० हजार रोपांची आयात करून मोठी गुंतवणूक केली. त्यांना corona काळ आणि इतर काही अडचणींमुळे ही रोपे २०२१ मध्ये मागवता आली. हा उशीर झाल्याने ती रोपे मोठी होत गेली आणि त्यांचा आयातीचा खर्च वाढला पण तरीही त्यांनी हार मानली नाही. २०२१ पासून आत्तापर्यंत त्यांनी वीस हजार रोपांची आयात केली आहे.
रोपे मिळाल्यावर त्यांनी इस्त्रायली पद्धतीने त्यांची लागवड केली आणि आता ती सर्व रोपे फळांनी लगडली आहेत. आता हर्षित इतर शेतकऱ्यांना Avocado ची रोपे लावण्याचे मोफत मार्गदर्शन करतात आणि रोपे शेतकऱ्यांना विकतात. आत्तापर्यंत त्यांनी महाराष्ट्र, सिक्कीम, मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांना ही रोपे विकली आहेत.
Avocado Farming करण्याचा विचार
जेव्हा हर्षित यांचे लंडन मध्ये शिक्षण सुरू होते तेव्हा त्यांनी तिथे इस्त्रायल मधून आयात केलेली Avocado फळांची पाकिटे पाहिली होती आणि लंडन सारख्या शहरात इस्त्रायल मधून हे फळ आयात होत आहे म्हणजे यात काहीतरी खास आहे असे त्यांना वाटले शिवाय इस्त्रायल सारख्या देशात Avocado कसा पिकवला जातो याविषयी त्यांना कुतूहल निर्माण झाले आणि त्यांनी इस्त्रायलला जाऊन तेथील शेतीचे तंत्र शिकण्याचा निर्णय घेतला. तेथील शिक्षण झाल्यावर त्यांनी भारतात येऊन इस्त्रायल प्रमाणे स्वस्त दरात Avocado Farming करण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या जन्म एका वकिलांच्या कुटुंबात झाला पण त्यांना नेहमीच स्वतःचा असा वेगळा काहीतरी व्यवसाय करायचा होता. त्यांना पाच एकर नापीक जमीन Avocado च्या बागेत बदलायची होती आणि म्हणूनच त्यांनी यासाठी मोठी गुंतवणूक करण्याचा देखील निर्णय घेतला. शेवटी त्यांनी आपला वडिलोपार्जित व्यवसाय सोडून स्वतःचा असा व्यवसाय थाटलाच.
Avocado Farming मधून होत आहे कोटींची कमाई
Avocado ची रोपे विकून हर्षित आता वर्षाला एक कोटीची कमाई करत आहेत. आता त्यांना त्यांची पाच एकर शेती अजून विस्तारायची आहे. त्यांना त्यांची Avocado Farming शंभर एकरा पर्यंत वाढवायची आहे. ते भोपाळ मध्येच आता शंभर एकरांची बाग लावण्याचा विचार करत आहेत. त्यातून त्यांना वर्षाला दहा कोटी रुपयांच्या कमाईची अपेक्षा आहे.
Avocado Farming विषयी Harshit Godha यांचे मत
सामान्यतः, एव्होकॅडो ईशान्य भारत, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात घेतले जातात कारण त्यांना 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. Harshit यांना हाच प्रश्न पडला की इस्त्रायल सारख्या उष्ण देशात ही शेती कशी होऊ शकते आणि म्हणूनच ते आपली internship अर्धवट सोडून इस्त्रायलला गेले.
तिथे जाऊन त्यांनी रोपांची लागवड, त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांना पाणी आणि खते देण्याची पद्धत सर्वकाही आत्मसात करून घेतले. ते त्यांच्या शेतात इस्त्रायली पद्धतीचे सिंचन वापरूनच रोपांना पाणी देतात. या रोपांची काळजी घेताना तापमान, पाण्याचे प्रमाण आणि खताचे प्रमाण व्यवस्थित नियोजित करावे लागते म्हणून ते अश्या अद्ययावत सिंचनाचा वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
FAQ