GST on insurance premiums
GST Council defers decision on lowering tax on health, life insurance premiums
Goods and Services Tax (GST) on insurance premiums, including health and life insurance
आरोग्य आणि जीवन विमा हप्त्यावरील वस्तू आणि सेवा करात सूट अथवा त्यात कपात करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने शनिवारी लांबणीवर टाकला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत या संबंधाने नियुक्त मंत्रिगटाला कोणताही निर्णय घेण्यासाठी आणखी वेळ हवा असून, त्याने त्यांच्या शिफारशी बैठकीपुढे ठेवल्याचं नाहीत.
सध्या, जीवन आणि आरोग्य विम्यावर भरलेल्या हप्त्यावर 18 टक्के दराने जीएसटी आकारला जातो. मंत्रिगटापुढे, यात सूट देण्यासह, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा आणि मुदतीच्या जीवन विम्यावर करात सूट देण्याची तसेच 5 लाख रुपयांच्या आरोग्य विम्याच्य संरक्षणावरील 5 टक्के कर दर कमी करण्याबाबत शिफारस देण्यास सांगण्यात आले होते.
विमा हप्त्यावरील करासंबंधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिक विचारविनिमय करण्याची गरज आहे असे मत परिषदेच्या काही सदस्यांनी व्यक्त केले. विम्यासंबंधी मंत्रिगटाच्या समितीचे अध्यक्ष असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सांगितले की गट विमा, वैयक्तिक विमा, ज्येष्ठ नागरिकांच्या पॉलिसी यावर करआकारणीसंबंधी निर्णय घेण्यापूर्वी आणखी एका बैठक घेणे आवश्यक आहे. केंद्रीय अर्थमंत्री आणि सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री यांचा जीएसटी परिषदेत समावेश होतो.
सध्या आरोग्य आणि जीवन विम्यावर 18 टक्के कर आकारला जातो. त्यामध्ये कपात करावी अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात आहे. मंत्रिगटानेही तशी शिफारस केली होती. त्यामुळे शनिवारी झालेल्या जीएसटी परिषदेमध्ये त्यासंबंधी निर्णय होईल अशी अपेक्षा होती; मात्र, ती फोल ठरली.
The 55th GST Council meeting
Finance Minister Nirmala Sitharaman
Goods and Services Tax (GST) on insurance premiums, including health and life insurance
issue of reducing GST for health and life insurance premiums
1. #GSTonInsurance
2. #InsurancePremiums
3. #HealthInsuranceTax
4. #LifeInsuranceGST
5. #TaxReform
6. #InsuranceTaxation
7. #GSTCouncil
8. #InsurancePolicy
9. #TaxationDebate
10. #HealthCoverage
11. #LifeCoverage
12. #InsuranceIndustry
13. #TaxationIssues
14. #FinancialPlanning
15. #InsuranceAwareness
16. #GSTUpdates
17. #InsuranceRegulations
18. #TaxPolicy
19. #ConsumerProtection
20. #InsuranceCosts
GST on insurance premiums