शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; चार लाख रुपये अनुदान मिळावा आणि शेतात तलाव आणि विहिरी बांधा असा करा अर्ज – Government subsidy

By Pratiksha Majgaonkar

Published on:

Government subsidy
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारत सरकार शेतकऱ्यांचा विचार करून अनेक योजना राबवत असते. याच योजनेतील एक योजना आहे मागेल त्याला विहीर योजना. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना चार लाख रुपये अनुदान (Government subsidy) दिले जाते ज्याचा उपयोग शेतकरी त्यांच्या शेतात विहीर किंवा तलाव बांधण्यासाठी करू शकतात.

भारतातील बहुतांश शेती ही मान्सून म्हणजेच पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. खरीप हंगामात पिकांचे कमी पाण्यामुळे नुकसान होऊ नये आणि खरीप हंगामात देखील पिकांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी ही योजना ४ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. ही राज्य सरकारची योजना असून ८० ते १०० टक्के अनुदानाचा (Government subsidy) लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो. आता याच योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन सरकार द्वारे करण्यात आले आहे.

चला तर मग जास्त वेळ न घालवता या योजनेचा अर्ज कसा करायचा? यासाठी काय काय कागदपत्रे लागतील? पात्रता निकष काय आहेत? हे सविस्तर जाणून घेऊया.

या योजने अंतर्गत तलाव आणि विहिरी बांधण्यासाठी किती अनुदान मिळेल?

जर तुमची जमीन खाजगी असेल तर कूपनलिका बांधण्यासाठी ८०% अनुदान सरकार देईल. याशिवाय सामुदायिक जमिनींवर विहीर बांधण्यासाठी १००% अनुदान (Government subsidy) दिले जाईल.

विहिरींचा आणि तलावाचा आकार काय असावा? – Government subsidy

या योजने अंतर्गत खाजगी जमिनीवर विहीर बांधताना त्याचा आकार १० फूट व्यास आणि ३० फूट खोल असा असावा असे सांगितले गेले आहे. हेच सामुदायिक जमिनीवर विहीर बांधण्यासाठी व्यास १५ फूट आणि खोली ३० फूट असा आकार सांगितला गेला आहे.

तलाव बांधण्यासाठी त्याचा आकार १५० फूट लांब, ६६ फूट रुंद आणि १० फूट खोल असा सांगितला गेला आहे. याशिवाय कृषी पाउंडच आकार १०० फूट लांब, ६६ फूट रुंद आणि १० फूट खोल असा असेल.

या योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागतील? – Government subsidy

सरकारच्या GR नुसार खालील कागदपत्रे यासाठी आवश्यक असतील:-

  1. 7/12 चा ऑनलाईन उतारा
  2. 8 अ चा ऑनलाईन उतारा
  3. जॉब कार्डची प्रत
  4. सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा जास्त सलग जमीन असल्याचा पंचनामा
  5. सामुदायिक विहीर असल्यास सामोपचाराने पाणी वापराचे करारपत्र.
  6. आधार कार्ड
  7. जमिनीचा नकाशा
  8. जातीचा दाखला (लागू असेल तरच)
  9. उत्पन्नाचा दाखला

या योजनेसाठी लाभार्थी कोणत्या क्रमाने निवडले जातील?

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या जमाती
  • विमुक्त जाती
  • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  • स्त्री-कर्ता असलेली कुटुुंबे
  • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
  • जमीन सुधारणांचे लाभार्थी
  • इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत असलेले लाभार्थी.
  • सीमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत असलेली भू धारणा)
  • १ अल्प भूधारक (५ एकर पर्यंत असलेली भू धारणा)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा? – Government subsidy

सरकारी योजनांसाठी प्रथम येणार त्यास प्राधान्य या तत्त्वावर लाभ मिळतात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज केल्यास लाभ मिळण्याची शक्यता जास्त असेल. या योजनेसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २० ऑगस्ट २०२४ च्या आत अर्ज करायचे आहेत.

Online अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करावी:-

  1. सर्व प्रथम सरकारच्या अधिकृत संकेस्थळावर जा.
  2. तिथे असलेल्या Apply पर्यायावर क्लिक करा.
  3. तलाव आणि विहीर अनुदान अर्ज स्क्रीनवर दिसू लागेल.
  4. . तो डाउनलोड करून काळजीपूर्वक भरून लागणारी कागदपत्रे आणि अर्ज स्कॅन करून आपले सरकार या संकेतस्थळावर अपलोड करा.
  5. यासाठी तिथे विचारली जाणारी माहिती भरा आणि तुमचे अकाऊंट ओपन करून घ्या.
  6. सर्व अपलोड करून झाल्यावर मिळाली अर्जाची ऑनलाईन पावती नीट डाऊनलोड करून किंवा प्रिंट करून ठेवून द्यावी.

ऑफलाईन अर्ज कसा करावा?- Government subsidy

  1. यासाठी जवळच्या कृषी कार्यालयात जा.
  2. अर्जाची प्रत मिळावा आणि भरा.
  3. आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा.
  4. अर्जाचे शुल्क भरा
  5. कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज जमा करून पोचपावती घ्या.

या योजनेच्या अटी काय आहेत?- Government subsidy

  1. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  2. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांच्या आत असावे.
  3. अर्जदाराने याआधी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  4. ज्या ठिकाणी विहीर बांधायची आहे त्या जागेच्या १०० मीटर भागात दुसरी विहीर नसावी.

FAQ:-

मागेल त्याला विहीर ही योजना कोणकोणत्या राज्यात आहे?

ही योजना महाराष्ट्र सरकारने आणली असल्याने ही योजना फक्त महाराष्ट्रात आहे.

विहीर योजनेसाठी वार्षिक उत्पन्न किती असावे?

योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी असावे.

नवीन विहीर बांधण्यासाठी सरकार द्वारे किती अनुदान दिले जात आहेत?

नवीन विहीर बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ८०% अनुदान (Government subsidy) मिळत आहे.


तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की सांगा आणि एखाद्या गरजू शेतकऱ्याला याची माहिती नक्की द्या.

1 thought on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; चार लाख रुपये अनुदान मिळावा आणि शेतात तलाव आणि विहिरी बांधा असा करा अर्ज – Government subsidy”

Leave a Reply