शेतकऱ्यांना गिफ्ट, ‘या’ पिकाची MSP वाढवली. ₹ 855 कोटी रुपयांची तरतूद

Belgaum Belgavkar
3 Min Read

Government raises Copra MSP

Govt increases Copra MSP by up to Rs 422

Centre increased MSP for milling copra and ball copra : मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं सुक्या खोबऱ्याच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सुक्या खोबऱ्याच्या हमीभावात ₹ 422 रुपयांची वाढ केली आहे.

Cabinet approves MSP at ₹12,100 per quintal for copra

minimum support price (MSP) for copra : त्यामुळं खोबऱ्याची एमएसपी 12100 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. त्यासाठी सरकारनं 855 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या (Commission for Agricultural Costs and Prices (CACP)) शिफारशींच्या आधारे ही आधारभूत किंमत ठरवण्यात आली आहे. उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के अधिक एमएसपी निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे एकूण आर्थिक भार 855 कोटी रुपयांवर येईल.

MSP for “milling copra” has been raised by Rs 422 to Rs 11,582 per quintal

 

MSP for “ball copra” has been raised by Rs 100 to Rs 12,100 per quintal

 

- Advertisement -

नॅशनल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (NAFED) आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन (NCCF) यांची खरेदीसाठी केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली आहे.

कर्नाटक हे नारळाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य

कर्नाटक हे नारळाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे. एकूण उत्पादनात त्याचा वाटा 32.7 टक्के आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडू (25.7 टक्के), केरळ (25.4 टक्के) आणि आंध्र प्रदेश (7.7 टक्के) यांचा क्रमांक लागतो. याशिवाय महाराष्ट्रातही नारळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तसेच पश्चिम बंगाल, ओडिशा, दमण-दीव आणि गुजरातमध्येही नारळाची लागवड कमी प्रमाणात केली जाते.

वाढीव MSP नारळाच्या उत्पादनांना चांगला नफा तर देईलच पण शेतकऱ्यांना नारळ उत्पादन वाढवण्यास प्रवृत्त करेल. दरम्यान, खोबऱ्याच्या MSP मध्ये वाढ केल्यामुळं याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. तसचे या वाढलेल्या दरामुळं नारळ लागवडीला देखील प्रोत्साहन मिळणार आहे.

 

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत याबाबत निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता सुक्या खोबऱ्याच्या (कोपरा) किमान आधार मूल्यात 422 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. राज्य सरकारे त्यांच्या महामंडळांच्या माध्यमातून सुक्या खोबऱ्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण करतील, असेही वैष्णव यांनी म्हटलं आहे.

#CopraMSP #FarmersSupport #GovernmentInitiative #AgriculturePolicy #CoconutProduction #MSPIncrease #KarnatakaCoconut #Nafed #Nccf #CoconutFarmers #AgriculturalReform #SupportFarmers #CoconutMarket #CoconutIndustry #MSPForFarmers #CoconutProfit #CoconutHarvest #CoconutGrowth #CoconutEconomy #CoconutInvestment

Government raises Copra MSP
Government raises Copra MSP

Government raises Copra MSP

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *