साऊथ फिल्म इंडस्ट्रीज चा देव – Rajinikanth उर्फ थलाईवा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अनेकांना बॉलिवूड पेक्षा साऊथ फिल्म जास्त आवडतात. त्यांचे कथानक, सादरीकरणाची पद्धत आणि अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बॉलीवूड मध्ये मिसिंग असल्याचे जाणवते. साऊथ चे हिरो तर सगळ्यांचाच आवडीचा विषय! साऊथ सिनेमा म्हणलं की डोळ्यासमोर येतं ते पहिलं नाव म्हणजे Rajinikanth!

साऊथ सिनेमांचे अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेले Rajinikanth आजही तितकेच लोकप्रिय आहेत जितके आधी होते. साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्यांना देवाचा दर्जा दिला जातो. चला तर मग जाणून घेऊया रजनीकांत यांचा जीवनपट.

What should Rajinikanth do before making his debut in cinema?

सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधी Rajinikanth बस कंडक्टर म्हणून काम करायचे. त्यांचे आधीपासूनच स्वप्न होते आपण एक सिने हिरो व्हायचे. हेच स्वप्न उराशी बाळगून त्यांचे त्या दिशेने प्रयत्न देखील सुरू होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच ते बस कंडक्टर म्हणून कामावर रुजू झाले. बस कंडक्टर असतानाच त्यांची तोंडाने शिट्टी वाजवण्याची कला लोकप्रिय झाली.

Where was Rajinikanth born?

बंगळुरू येथील मराठी कुटुंबात १२ डिसेंबर १९५० रोजी रजनीकांत यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे.

How did Rajinikanth move towards his dream of becoming a hero?

त्यांचे आधीपासूनच हिरो होण्याचे स्वप्न होते. त्यांच्या या स्वप्नपूर्तीसाठी त्यांचे मित्र राज बहादुर यांनी त्यांना साथ दिली. राज बहादुर यांनीच Rajinikanth यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला होता. १९७५ मध्ये ‘अपूर्वा रागानगाल’ या चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला परंतु ‘अंधा कानुन’ या १९८३ साली आलेल्या चित्रपटामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली.

हे हि वाचा -  आज बैठकीत मुख्यमंत्री Eknath Shinde यांचे विभाग वाईज महत्त्वपूर्ण निर्णय

हिंदी, तेलगू, कन्नड आणि बंगाली सिनेमांत रजनीकांत यांनी काम केले आहे. भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील यांचा मोठा चाहतावर्ग आहे. भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार म्हणजे रजनीकांत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवण्यात आले आहे.

How much is Rajinikanth’s earnings?

रजनीकांत यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात दोन हजार रुपयांपासून केली होती. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी श्रीदेवींसोबत एक सिनेमा केला होता ज्यासाठी त्यांना दोन हजार रुपये मानधन मिळाले होते. आजच्या घडीला मात्र ते एका सिनेमासाठी १०० कोटींपेक्षा कमी मानधन घेत नाहीत. जेलर या सिनेमासाठी त्यांनी ११० कोटी मानधन घेतले होते. त्यांना विविध प्रकारच्या गाड्यांची देखील आवड आहे त्यामुळे त्यांच्याकडे अनेक महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत.

What awards has Rajinikanth received?

भारत सरकारने त्यांना 2000 मध्ये पद्मभूषण, 2016 मध्ये पद्मविभूषण आणि 2019 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले आहे.

How do Rajinikanth’s fans behave?

रजनीकांत यांच्या प्रसिध्दी बद्दल बोलायचे झाले तर जपानमध्ये त्यांच्या चित्रपटांनी रेकॉर्ड ब्रेक व्यवसाय केला आहे. त्यांच्या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहत्यांची अक्षरशः शर्यत लागते. जर कोणी व्यक्ती त्यांच्याबद्दल अपशब्द बोलली तर मोठी भांडणे होऊन त्यांच्यात मारामारी देखील होते.

एकदा तर एका चाहत्याने रजनीकांत यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला होता. झाले असे होते की, २९ एप्रिल २०११ रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ऍडमिट करण्यात आले आणि त्यांना बरे वाटल्यावर सोडले. परंतु पाच दिवसांत पुन्हा त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तेव्हा त्यांची किडनी फेल गेल्याचा निष्कर्ष निघाला. त्यांना किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे अशी बातमी पसरली. त्यांच्या स्वास्थ्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी अनेक यज्ञ केली, देवळात ते तासनतास बसून असायचे. अश्यातच रजनीराजा अरोकिसामी नावाच्या 40 वर्षीय चाहत्याने त्यांना आपली किडनी देता यावी म्हणून झोपेच्या गोळ्यांचा ओव्हर डोस घेऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला. आपली किडनी रजनीकांत यांना देण्याची त्याची इच्छा होती पण त्यांचा हा आत्महत्येचा प्रयत्न फसला आणि त्यांना वाचवण्यात यश आले. या किस्स्यावरून आपण अंदाज लावूच शकतो की रजनीकांत यांची लोकप्रियता किती आहे.

हे हि वाचा -  सावधान तरुणाच्या खिशातच मोबाईलचा स्पोट (MOBILE BLAST), तरुणाचा पाय निकामी

दक्षिणेतील अनेक ठिकाणी रजनीकांत यांच्या २०१६ साली प्रदर्शित झालेल्या कबाली चित्रपटासाठी अनेक कंपन्यांनी सुट्टी जाहीर करून आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत तिकीट वाटप देखील केले होते.

चाहत्यांमध्ये रजनीकांत इतके लोकप्रिय आहेत की, पडद्यावर त्यांची एन्ट्री झाल्यावर एकाचवेळी प्रेक्षकांनी इतकी नाणी फेकली होती की थिएटरचे पडदे फाटले होते. या प्रसंगानंतर थिएटरमध्ये नाण्यांना बंदी घालण्यात आली.


FAQ:-

When is Rajinikanth’s birthday?

December 12

What is Rajinikanth’s real name?

Rajinikanth’s real name is Shivajirao Gaikwad.

At what age did Rajinikanth make his film debut?

Rajinikanth’s film career started at the age of 25.

1 thought on “साऊथ फिल्म इंडस्ट्रीज चा देव – Rajinikanth उर्फ थलाईवा”

Leave a Reply