Give plastic waste and take Gold : आपल्या देशात बरीच राज्य आहेत आणि त्यात खूप सारे जिल्ह्ये आणि त्यात नगरपालिका, ग्रामपंचायत आणि नगरपरिषदा! प्रत्येक गावात या स्थानिक स्वराज्य संस्थान द्वारा स्वच्छता राहावी म्हणून आणि कमीत कमी प्रदूषण व्हावे म्हणून निरनिराळ्या योजना राबविल्या जातात.भारत सरकार देखील राष्ट्रीय स्वच्छ गाव पुरस्कार तसेच राष्ट्रीय स्वच्छता अभिमान आणि स्वच्छ भारत सुंदर भारत सारख्या बऱ्याच योजना राबवत असते.
देशाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार रोज नवनव्या योजनांची घोषणा करत असते.त्याची अंमलबजावणी देखील स्थानिक पातळीवर होत असते.यातच केंद्र आणि राज्यपातळीवर देखील निरनिराळ्या योजना आखल्या जात असतात. अनेक ग्रामपंचायती आणि नगरपालिका देखील आपले गाव स्वच्छ राहावे म्हणून स्थानिक पातळीवर विविध योजना राबवत असतात. या योजने अंतर्गत गाव स्वच्छ रहावे म्हणून नागरिकांना अनेक प्रकारचे पुरस्कार वगैरे दिले जातात.
भारतात सोने खरेदीची खूप क्रेझ आहे. काही लोक सोने गुंतवणूक म्हणून खरेदी करतात तर काही हौस म्हणून घेतात. पण तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही खूप सारा कचरा दिला तर तुम्हाला सोने मिळेल. तर विश्वास बसणार नाही ना? पण हे खरं आहे भारतात असे एक गाव आणि पंचायत आहे जिथे तुम्ही प्लास्टिक कचरा दिला तर तुम्हाला त्या बदल्यात सोन्याचे नाणे मिळते आणि असे गाव आणि अशी पंचायत आहे तरी कुठे याची माहिती आपण घेणार आहोत.
हो आपल्या भारतात एक असे गाव आहे जिथे (Give plastic waste and take Gold) प्लॅस्टिक घेऊन लोकांना सोन्याची नाणी दिली जातात. आणि त्याच गावाची पूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
प्लास्टीक दो और सोना लो योजना (Give plastic waste and take Gold)
गावच्या विकासासाठी अशीच एक भन्नाट अशी सोनेरी योजना एक गाव राबवत आहे. भारतातील जम्मू-काश्मीर राज्यातील अनंतनाग जिह्यात एक सादिवरा नावाचे गाव आहे.जिथे लोक प्लास्टिक मुक्त पृथ्वीचे स्वप्न पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी पुढाकारही घेतला आहे. एका हिंदी संकेतस्थळाने या विषयी माहिती दिली आहे.
समोर आलेल्या माहिती नुसार सध्या हे गाव चर्चेचा विषय बनत आहे. याठिकाणी तुम्हाला 20 क्विंटल प्लास्टिक कचरा देण्यासाठी एक सोन्याचे नाणे दिले जात आहे. हे गाव सध्याच्या दक्षिण काश्मीरमधील आनंतनाग जिल्ह्यातील सादिवरा असं या गावाचं नाव आहे. येथील सरपंचांनी गाव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मोठा उपक्रम सुरू केला. गावचे सरपंच फारुख अहमद गवई यांना गाव प्लास्टिकमुक्त करायचं होते व्यवसायाने वकील असलेल्या गवई यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र फारसे यश मिळाले नाही. पण त्यांनी अशी घोषणा केल्याने लोकांची गर्दी झाली.ही गोष्ट जाहीर होताच कचरा कमी होऊ लागला.
सरपंचांनी ‛ प्लास्टिक दो सोना लो’ ही मोहीम राबवली आहे.योजनेंतर्गत कोणी वीस क्विंटल प्लास्टिक कचरा दिल्यास पंचायत त्याला सोन्याचे नाणे देते.मोहीम सुरू झाल्यापासून अवघ्या पंधरा दिवसांत संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त घोषित करण्यात झाले आहे. हे पाहून जवळपासच्या इतर अनेक पंचायतींनीही त्याचा अवलंब केल्याचे अनेक रिपोर्टस्मध्ये नमूद करण्यात आले आहे.
Give plastic waste and take Gold – या योजने विषयी सरपंच म्हणतात
या गावचे सरपंच या योजने विषयी बोलताना सांगतात. मी माझ्या गावात बक्षिसाच्या रुपात सोने देण्याची घोषणा केली,जी यशस्वी झाली नद्या-नाले स्वच्छ करण्यासाठी मी पुढाकार घेतला. या योजनेमुळे आमचे गाव प्लास्टिक मुक्त तर झालेच पण नदी-नाल्यांमधील प्लास्टिक कचरा दूर होऊन नद्या-नाल्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
गावाबाहेरील व्यक्तीने दिला प्लास्टिक कचरा तर मिळते का सोने?
जर कुणी बाहेरील व्यक्ती आली तरीही त्याला गावातील कचराच गोळा करावा लागतो.म्हणजेच तुम्ही तिथे जाऊन प्लास्टिकच्या बदल्यात सोन्याचे नाणे मिळवू शकता पण अट एकच कचरा गावातीलच असावा आणि सोन्याचे नाणे मिळवावे.
प्लास्टिकही एक समस्या
खरं तर वाढत्या प्लास्टिकच्या वापरामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. प्लास्टिक लवकर विघडीत होत नसल्याने जमिनीचे प्रदूषण वाढते. जर त्याला जाळण्याचा प्रयत्न केला तर वायू प्रदूषण होते.वाहत्या पाण्यात प्लास्टिक साचल्यामुळे पाण्याचे प्रवाह अडतात आणि पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.मुकी जनावरे प्लास्टिक चारा म्हणून खातात आणि त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. एकीकडे ही समस्या नुसती आपल्या देशाला नाही तर अख्या जगाला ग्रासून आहे. पण दुसरीकडे प्लास्टिकचा वापर कमी होण्या ऐवजी वाढतच आहे आणि त्यावर उपचाय योजना करणे खूप गरजेचे आहे.
हा सगळा विचार करूनच काश्मीरमधील सादिवरा गावचे सरपंच फारुख अहमद गवई यांनी प्लास्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना राबवली आणि ती त्यांच्या गावात यशस्वी देखील झाली आहे.
1 thought on “‘प्लास्टिक कचरा द्या आणि सोन घ्या’ कुठे राबवली जाते ही योजना? – Give plastic waste and take Gold”