पेरीस ऑलंपिकमध्ये झाली महिला बॉक्सरची पुरुष बॉक्सरशी लढत? – Iman Khalifa vs Angela Carini 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Iman Khalifa vs Angela Carini fights news – ऑलंपिक ( Paris Olympics 2024 ) ही ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय खेळाची स्पर्धा आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जगभरातून अनेक देश आपले खेळाडू पाठवत असतात. आणि या स्पर्धेची चर्चा जगभरात होत असते. सध्या ऑलंपिक 2024 स्पर्धा पॅरिसमध्ये सुरू आहे. या वर्षीची ही स्पर्धा वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. या स्पर्धेतील सहावा दिवस गाजला तो खेळासाठी नाही तर एका वेगळ्याच कारणासाठी. दोन महिलांमध्ये बोक्सिक मॅच (Girl Boxing Fight ) होणार होती पण महिलेची पुरुषाबरोबर लढत झाली?

Iman Khalifa vs Angela Carini fights – का आणि कशी?

बॉक्सिंगमध्ये इटलीची अँजेल कॅटरेन (Angela Carini ) आणि अल्जेरियाची इमान खलिफा (Iman Khalifa) या 66 किलो वजन गटात एकमेकांच्या समोर होत्या. पण अल्जेरियाची ) इमान खलिफा ही ट्रान्सजेंडर (Transgender) आहे. अर्थात ती महिला म्हणून वावरत असली तरी तिची ताकद पुरुषासारखी आहे आणि जेंडर स्त्रीचे असले तरी बायोलॉजीकली पुरुषासारखी ताकद तिच्या अंगी आहे. त्यामुळे ही लढत महिला विरुद्ध पुरुष अशी झाली म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

सौजन्य – CNN-NEWS 18 (Youtube)

जेंडर टेस्ट म्हणजे काय?


या टेस्टमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूच्या शरीरात पुरुषी हार्मोन्स आहेत का ते पाहिले जाते? म्हणजे जर X. Y हे क्रोमोझोन एखाद्या खेळाडूच्या शरीरात जास्त असतील तर त्या खेळाडूमध्ये पुरुषी हार्मोन्स जास्त असतात त्यामुळे अशा खेळाडूला महिले बरोबर खेळण्याची परवानगी दिली जात नाही. तो खेळाडू अपात्र ठरतो.

हे हि वाचा -  पाहा का साजरा केला जातो रक्षाबंधन (Rakshabandhan) सण; वाचा संपूर्ण माहिती

2023 मध्ये वर्ड चॅन्पियनशिपमध्ये अंतिम सामन्याच्या आधी इमान खलिफाची लैंगिक चाचणी ठरली होती फेल

नवी दिल्लीत झालेल्या वर्ड बॉक्सिंग चॅन्पियनशिपमध्ये इमान खलिफा लैंगिक चाचणीत फेल ठरली होती. आणि तिला अपात्र घोषित करण्यात आले होते.तिच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हे पुरुषी हार्मोन्स जास्त प्रमाणात आढळून आले होते त्यामुळे ती जेंडर एलिजीबल टेस्टमध्ये अपात्र झाली होती असं असून ही तिला ऑलंपिकमध्ये महिलां खेळाडू बरोबर सहभागी का करून घेतले? या प्रश्नाने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

कोण आहे ही इमान खलिफा? (Iman Khalifa)

इमान खलिफा (Iman Khalifa) ही ट्रान्सजेंडर एथलिट नाही तर ती जन्माने महिला होती. पण तिला सेक्स डेव्हलपमेंटचा विकार आहे त्यामुळे तिच्याजवळ X Y क्रोमोझोन आणि एका पुरुष एथलिट सारखा टेस्टोस्टेरॉन स्तर आहे. 25 वर्षाची इमान खलिफा टीआरेट, अल्जेरियाची आहे.तिच्या वडिलांना तिचे बॉक्सिंग करणे आवडत नव्हते पण आता तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा जिंकल्याने त्यांना तिचा अभिमानच वाटत आहे.

हे हि वाचा

  1. टाटा पंचला टक्कर देणार आता ही गाडी किंमतही कमी – Hyundai Exter CNG
  2. बापरे कोण घेणार हि गाडी ? तीन कोटी रुपये पण फीचर्समध्ये  कुठेच कमी नाही- Defender 130

अवघ्या 46 सेकंदात स्पर्धकाने माघार घेतली.

या खेळत इटलीच्या अँजेल कॅटरेनी (Angela Carini ) अवघ्या 46 सेकंदात माघार घेतली. कारण तिला इमान खलिफाचा (Iman Khalifa) पुरुषी बुक्का इतका जोरात लागला की ती गंभीर जखमी झाली. इमान खलिफाच्या पुरुषी ताकदीसमोर तिचा निभाव लागणार नाही हे तिच्या लक्षात आले आणि तिने कॉरर्टर फायनलच्या कॉलिफिकेशन राऊंडमधून माघार घेतली.

अँजेल कॅटरेनीचे (Angela Carini ) म्हणणे

अँजेल कॅटरेनीने (Angela Carini ) सामना संपल्यावर सांगितले की इमान खलिफाचा (Iman Khalifa) हिचा पंच तिला इतका जोरात तोंडावर बसला.तिने आजतागायत असा जोराचा पंच अनुभवला नव्हता तिला असे वाटले की तिला एखाद्या पुरुषाने मारले आहे. ती सहसा माघार घेण्यातली नाही पण तिने तिच्या आरोग्याचा विचार करून माघार घेतली. इमान खलिफाला महिलांसमोर स्पर्धक म्हणून उभे करणे योग्य की अयोग्य याचा निर्णय मी घेऊ शकत नाही.

हे हि वाचा -  हे काय वेगळच ! मुलगा अठरा वर्षाचा झाला म्हणून या Japan राजघराण्याने केला आनंद साजरा

ट्रान्सजेंदर महिलांसाठी आणि ऑलंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी देखील आव्हाहन?

आजकाल ट्रान्सजेंडर लोकांचे प्रमाण वाढले आहे. आणि त्यांना सामाजिक आणि कायदेशीर मान्यता देखील मिळत आहे. त्यामुळे स्त्री पुरुष होत आहेत तर पुरुष स्त्री होत आहेत. याचा परिणाम म्हणजे खेळाच्या स्पर्धात जर स्त्रीच्यासमोर ट्रान्सजेंडर स्त्री उभी राहिली तरी ती बायोलॉजीकली पुरुषच राहते. आणि पुरुषी शक्तीसमोर स्त्रीचा निभाव लागणे केवळ अशक्य आहे. त्यासाठी अशा स्पर्धांच्या आयोजकांना वेगळे नियम अवलंबण्याची गरज आहे.

अँजेल कॅटरेनीला (Angela Carini ) सोशल मीडियावरून सपोर्ट

बऱ्याच दिग्गज आणि सामान्य लोकांना देखील असे वाटतेय की अँजेल कॅटरेनी (Angela Carini ) हिच्यावर अन्याय झाला आहे त्यामुळे अनेक लोक तिला त्याबाबत सपोर्ट करून तिच्यावर झालेल्या अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. या विवादात आता अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंम्प यांनी उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर पोस्ट करत म्हणले आहे की
“मी स्त्रियांच्या खेळापासून पुरुषांना दूर ठेवेण ” आणि या मॅचचा व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केला आहे. तसेच डोनाल्ड ट्रंम्पच्या पार्टीचे उप- राष्ट्रीपती पदाचे उमेदवार जेडी वेंग म्हणाले “ एका पुरुषाला एका स्त्रीला मारण्याची परवानगी कशी मिळू शकते? सगळ्या लिडर्सनी या घटनेचा विरोध केला पाहिजे.

टेस्लाचे CEO इलॉन मस्कने अँजेल कॅटरेनीचे समर्थ करत म्हणाले की “ स्त्रियांच्या खेळत पुरुषांना स्थान नाही.” तसेच इतकीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनीने ही त्यांच्या देशाची खेळाडू अँजेल कॅटरेनीला समर्थ दिले आहे.

तुम्हाला काय वाटते अँजेल कॅटरेनवर (Angela Carini ) खरंच अन्याय झाला आहे का?

1 thought on “पेरीस ऑलंपिकमध्ये झाली महिला बॉक्सरची पुरुष बॉक्सरशी लढत? – Iman Khalifa vs Angela Carini ”

Leave a Reply