सोशल मीडियामुळे आज सामान्य माणसाला देखील सेलिब्रिटीचे स्टेटस मिळत आहे. Youtube मुळे तर सामान्य लोकांना स्वतःचे कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ तर मिळालेच पण आज Youtube Channel लोकांच्या उदारनिर्वाहाचे साधन देखील झाले आहे.अनेक लोक आज यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाखो रुपये कमावत आहेत. आपण अशाच एक यु ट्युबर विषयी आज माहिती पाहणार आहोत. गणेश शिंदे आणि योगिता शिंदे ( Ganesh Shinde and Yogita Shinde ) हे सोलापूर जिल्ह्यातील गरीब दांपत्य. पत्र्याच्या शेडमध्ये राहणारे हे कुटुंब. गणेश शिंदे हे प्लंबिंगचे काम करत होते. घरची परिस्थिती बिकट. त्यांना शुभांगी ही पहिली मुलगी होती.
टिकटॉक ते यू ट्यूबर हा प्रवास
गणेश शिंदे हे त्यांचे आणि योगिता शिंदे (Ganesh Shinde and Yogita Shinde) नवरा-बायकोचे पंधरा पंधरा सेकंदाचे विनोदी व्हिडीओ टिकटॉकवर टाकत होते. तिथे त्यांच्या व्हिडीओजचे चांगलेच फॉलोवर्स होते. भारत सरकारने टिकटॉकवर बंदी आणली आणि ते दुसरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शोधू लागले. त्यातच गणेश शिंदे यांना यू ट्यूबवर त्यांचे पंधरा-पंधरा सेकंदाचे जोडून टाकलेले व्हिडीओ दिसले आणि त्यांनी स्वतःचे यू ट्यूब चॅनल सुरू केले.
बाळांपणासाठी नव्हते पैसे (Ganesh Shinde and Yogita Shinde)
कोरोनाचा काळ सुरू होता आणि योगिता शिंदे या दुसऱ्या वेळी गरोदर होत्या. गणेश शिंदे हे घरोघरी जाऊन प्लंबिंगचे काम करायचे पण कोरोना काळात त्यांचे काम ठप्प झाले.योगिता शिंदे सांगतात की त्यांची पहिली डिलिव्हरी नॉर्मल झाली होती त्यामुळे त्यांनी 10000 ते 15000 जमवले होते पण डॉक्टरणांनी सांगितले की सिझेरियन करावे लागेल आणि 35000 ते 40000 लागतील एका रात्रीत इतके पैसे आणायचे कुठून हा प्रश्न गणेश शिंदे यांना पडला आणि त्यांनी यू ट्यूबवर मदतीसाठी आवाहन केलं आणि लोकांनी त्यांना मदत केली. आणि एका रात्रीत तेवढे पैसे जमा झाले.
अचानक झाले व्हिडीओ व्हायरल
लोकांच्या मदतीमुळे यांची अडचण दूर झाली आणि योगिता यांची डिलिव्हरी सुखरूप पार पडली. त्यांना दुसरी मुलगी खुशी झाली. गणेश शिंदे (Ganesh Shinde and Yogita Shinde) यांनी त्या सर्व प्रसंगांचे व्हिडीओ यु ट्यूबवर टाकले आणि त्यांचे व्हिडीओ अचानक व्हायरल झाले आणि त्यांचे यू ट्यूब चॅनल मॉनिटाइज झाले.
डिलिव्हरीसाठी दिलेल्या पैशातून घर बांधल्याचा आरोप
यु ट्यूबमधून पैसे मिळायला लागल्यावर त्यांनी नवीन घर बांधायला घेतले पण लोकांनी त्यांच्यावर डिलिव्हरीसाठी मदत म्हणून दिलेल्या पैशातून घर बांधले असा आरोप केला. काही लोकांनी त्यांना आता परिस्थिती सुधारल्यावर तुम्ही लोकांचे पैसे परत करणार का?असा प्रश्न ही विचारला. त्यावर व्हिडीओच्या माध्यमातून गणेश- योगिता शिंदे (Ganesh Shinde and Yogita Shinde) यांनी उत्तर दिले होते.
त्यांनी सगळ्या लोकांना शोधून पैसे परत करणे शक्य नाही पण लोकांनी केलेली मदत अनाथ आश्रमात दान करणार असल्याचे सांगितले होते. आणि त्यांनी त्यांची मुलगी खुशी हिचा पहिला वाढदिवस अनाथ आश्रमात साजरा केल्याचे सांगितले.
पत्र्याचे शेड ते नवीन घर, कार असा प्रवास (Ganesh Shinde and Yogita Shinde)
गणेश शिंदे यांचे घर मोहोळ गावातील रेल्वे स्टेशन जवळच्या वस्तीत आहे. आज यु ट्यूबमुळे त्याचे रूपांतर पक्क्या घरात झाले आहे. या वस्तीत गेलं की गणेश शिंदे यांचे पिवळ्या रंगाचे घर लक्ष वेधून घेते. योगिता सांगतात की कायम असे वाटायचे की आपले ही पक्के घर असावे. आता ते यू ट्यूब परिवरामुळे झाले आहे. लोकं भेटायला येतात घर पाहून कौतुक करतात तेंव्हा छान वाटते. याच यु ट्यूबच्या कमाईतून गणेश शिंदे यांनी नविकोरी कार देखील खरेदी गेली आहे.
लोकांच्या कमेंटचा होत होता मानसिक त्रास
गणेश शिंदे आणि योगिता शिंदे (Ganesh Shinde and Yogita Shinde) हे नियमित यू ट्यूबवर व्हिडीओ टाकत असतात. पण घर आणि गाडी घेतल्यामुळे त्यांच्यावर लोकांनी सडकून टीका केली. आता ही व्हिडिओवर बऱ्याच नकारात्मक कमेंट येतात. पण आम्ही आता त्या कमेंटकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहोत असं दोघे ही सांगतात.
शिंदे दांपत्य यु ट्यूबवरून कमावते महिना 2 लाखाचे उत्पन्न
गणेश आणि योगिता (Ganesh Shinde and Yogita Shinde) यांच्या शिवानी आणि खुशी या दोन्ही मुली सुद्धा आता व्हिडीओमध्ये काम करतात. आणि दोन्ही मुली आता चांगल्याच फेमस झाल्या आहेत. गणेश शिंदे यांचे यू ट्यूब चॅनलवर आठ लाख फॉलोवर्स आहेत आणि यातून त्यांना महिन्याला 2 ते 2.50लाख इतके उत्पन्न मिळते.
“गणेश शिंदे सांगतात की सुरवातीला मी प्लंबरचे काम करायचो आणि रोज आपली पिशवी घेऊन कामाला जायचो. परंतु जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला चांगलं म्हणत नाहीत. काही लोकं कौतुक करतात पण काही लोकं टीका करतात आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही. आपण आपले काम करत राहायचं.”
ही आहे एका गरीब दांपत्याची (Ganesh Shinde and Yogita Shinde) त्यांच्या कलेच्या माध्यमातून यू ट्यूबवरून उंच भरारी घेतल्याची कथा!
1 thought on “पत्र्याचे शेड ते यू ट्यूबमधून लाखोंचे उत्पन्न कसा होता शिंदे दांपत्याचा प्रवास? – Ganesh Shinde and Yogita Shinde”