Former PM Manmohan Singh passes away at 92
Former Prime Minister and senior Congress leader Manmohan Singh
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. आज रात्री 8.06 वाजता श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी आज रात्री 9.51 वाजता अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
Former Prime Minister Manmohan Singh died in Delhi on Thursday after a prolonged illness. He was admitted to AIIMS Delhi on Thursday evening after his health deteriorated.
प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. आता त्यांचं निधन झालं आहे. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली.
सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यानंतर 2009 साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले.
बेळगावमध्ये होत असलेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या अधिवेशनातील कार्यक्रम रद्द
कर्नाटक सरकारने शुक्रवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. शाळा, महाविद्यालयांनाही (काॅलेज) सुट्टी
Karnataka declares holiday on December 27 as former PM Manmohan Singh passes away at 92
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर कर्नाटक सरकारने बेळगावसह राज्यभरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. सुट्टी व्यतिरिक्त, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी यांच्या योगदानाचा आणि वारशाचा सन्मान करण्यासाठी कर्नाटकमध्ये 7 दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत सर्व सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकेल आणि कोणतेही अधिकृत मनोरंजन कार्यक्रम होणार नाहीत.
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली.
सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं.
#ManmohanSingh #FormerPM #India #Economist #CongressLeader #Liberalization #Globalization #EconomicReforms #Legacy #Tribute #RIP #PoliticalLeader #IndianHistory #Leadership #PublicService #NationBuilder #EconomicGrowth #Inspiration #Remembering #HistoryMaker
Former PM Manmohan Singh passes away at 92
Former PM Manmohan Singh passes away at 92