Former PM Manmohan Singh admitted to AIIMS
Former PM Manmohan Singh admitted to hospital, condition critical
काँग्रेसची शुक्रवारी बेळगावात मोठी सभा होती
देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तानुसार 92 वर्षीय डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र रुग्णालयात दाखल करण्याचे कारण अद्याप कळलेले नाही.
एम्स रुग्णालयातील डॉक्टरांची एक स्पेशल टीम मनमोहन सिंह यांच्यावर उपचार करत आहे. मनमोहन सिंह हे सध्या 92 वर्षांचे आहेत. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत. याआधी देखील त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंह यांना फुफ्फुसात इन्फेक्शन झालं आहे. त्यांना श्वसनास त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. काँग्रेसची उद्या शुक्रवारी बेळगावात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी हे बेळगावात गेले होते. पण मनमोहन सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसची बेळगावातील सभा रद्द करण्यात आली आहे. तसेच मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी दिल्लीच्या दिशेला रवाना होणार असल्याची माहिती आहे.
#ManmohanSingh #FormerPM #India #Economist #CongressLeader #Liberalization #Globalization #EconomicReforms #Legacy #Tribute #RIP #PoliticalLeader #IndianHistory #Leadership #PublicService #NationBuilder #EconomicGrowth #Inspiration #Remembering #HistoryMaker
Former PM Manmohan Singh admitted to AIIMS
Former PM Manmohan Singh admitted to AIIMS