दुचाकीवरील ताबा सुटल्याने तलावात कोसळून त्यांचा मृत्यू
बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर : हलशी (ता. खानापूर) ग्राम पंचायतीचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते इशेंत अंतोन फिगेर यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. काठावरुन जाताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने तलावात कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
घरच्यांनी दोन दिवस त्यांची शोधाशोध केली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, फिगेर शनिवारपासून बेपत्ता होते. घरच्यांनी दोन दिवस त्यांची शोधाशोध केली. पण, शोध लागला नाही. सोमवारी सकाळी हलशी ते हलशीवाडी रस्त्यावर असलेल्या तलावात हेल्मेट परिधान केलेल्या अवस्थेतील एक मृतदेह तरंगताना आढळला. तलावात दुचाकीही आढळून आली आहे. याची माहिती नंदगड पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी स्थानिकांच्या सहकार्याने सायंकाळी उशिरा दुचाकी व मृतदेह बाहेर काढला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. इशेंत फिगेर हलशी ग्राम पंचायतीवर दोनवेळा सदस्य म्हणून निवडून आले होते.
Former member of Halshi Khanapur Gram Panchayat dies in lake
Former member of Halshi Khanapur Gram Panchayat dies in lake