Ford company भारतात पुन्हा येणार, नवीन प्रीमियम हि गाडी होणार लाँच

By Pratiksha Majgaonkar

Published on:

ford
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक नावाजलेली कंपनी म्हणजे Ford. काही वर्षांपूर्वी भारतातून या कंपनीने माघार घेतली होती. आता मात्र पुन्हा ही कंपनी भारतात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकन कंपनी असलेली ही Ford कंपनी परत येणार यामुळे या कंपनीच्या गाड्यांची हौस आणि आवड असणाऱ्या लोकांसाठी ही खूप आनंदाची बातमी असणार आहे.

भारतात आता वाहन उद्योग चांगलाच जोर धरत आहे. दिवसेंदिवस हे क्षेत्र मोठे होत आहे आणि याचाच विचार करून फोर्ड भारतात पुन्हा पुनरागमन करण्याचा विचार करत आहे. गेल्या काही महिन्यात फोर्डचा चेन्नई मध्ये असलेला प्लांट JSW ग्रुपला विकण्यास नकार दिल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. एवढेच नव्हे तर फोर्डने त्यांच्या दोन नव्या कार साठी ट्रेडमार्क दाखल केल्याचेही समोर आले आहे. यात फोर्ड एंडेव्हर आणि मॅच-ई इलेक्ट्रिक या दोन कारचा समावेश आहे.

फोर्ड भारतात परत येणार आहे याची खात्रीशीर माहिती समोर येण्याचे अजून एक कारण आहे ते म्हणजे लवकरच फोर्डची वाहने भारतात दिसू लागली आहेत.

Why did the Ford company flee from India?

कोविड काळात अनेक उद्योग क्षेत्राला हादरा बसला. कित्येक उद्योग डबघाईला आले आणि बंद पडले याला फोर्ड देखील अपवाद राहिले नाही. कोविड काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आणि एकंदर अर्थव्यवस्था हलली. याचाच परिमाण म्हणून फोर्ड वाहनाच्या विक्रीत देखील मोठी घसरण झाली. याच कारणाने फोर्ड ने सप्टेंबर २०२१ मध्ये भारत सोडून जाण्याची तयारी सुरू केली. याच काळात भारतातील विक्री कंपनीने थांबवली होती आणि २०२२ मध्ये देशातील निर्यात थांबवली. याचाच एक भाग म्हणून फोर्ड कंपनीने त्यांचा गुजराथ येथे असलेला एक कारखाना टाटा मोटर्स ना विकला आणि चेन्नई मध्ये असलेला कारखाना अद्याप फोर्ड कडेच आहे. चेन्नई मधील कारखाना देखील फोर्ड कंपनीला JSW ग्रुपला आधी विकायचा होता आणि या संदर्भात करार देखील करण्यात आला होता परंतु कंपनीने तो करार पुढे ढकलला होता.

चेन्नई मधील हा कारखाना सुमारे ३५० एकर जागेत बांधलेला आहे. या कारखान्यात सुमारे वर्षाला दीड लाख म्हणजेच १ लाख ५० हजार कार निर्मिती करता येतात.

Ford Company’s popular cars in India

यापूर्वी भारतीय बाजारपेठेतून फोर्डला खूप प्रेम मिळाले. यापूर्वी भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय झालेल्या कारच्या यादीत Ford Aspire, Ford EcoSport, Ford Escort, Ford Endeavour, Ford Fiesta, Ford Figo, Ford Freestyle आणि Ford Mustang यांचा समावेश आहे.

Ford company is coming back to India

डेव्हरची 3-रो SUV ही आवृत्ती भारतीय बाजारात आणली जाऊ शकते अशी आशा आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये ही गाडी भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. फोर्ड रेंजर पिकअपचे काही भाग एंडेव्हरसारखे असू शकतात. याशिवाय फोर्ड जी electric car launch करणार आहे ही Mach-E ही SUV असू शकते. आधीच या गाडीचे डिझाईन पेटंट इंटरनेटवर लीक झाले आहे. मात्र अद्याप कंपनीने भारतातील त्यांच्या प्रवेशाबाबत कोणतीही टाईम लाईन उघड केलेली नाही.

मात्र अमेरिकन ऑटोमेकरने तामिळनाडू सरकारला ‘लेटर ऑफ इंटेंट’ सादर केल्याचे म्हटले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि अमेरिकेतील फोर्डचे नेतृत्व यांच्यातील फलदायी बैठकीच्या पार्श्वभूमीवर हा विकास घडला आहे.

ऑटोमेकरने दिलेल्या माहितीनुसार जागतिक निर्यातीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपनी चेन्नई प्लांटचा पुनर्वापर करू शकते असे सांगण्यात आले आहे. भविष्यातील इतर कामकाजाचा तपशील अजून उघड करणे बाकी असताना फोर्ड ने घेतलेल्या निर्णयामुळे भारतातील कामकाजात धोरणात्मक बदल पाहायला मिळत आहे.

फोर्डची तामिळनाडू मधील उपस्थिती लक्षणीय आहे तिथे 12,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. कंपनीचे कामकाज पुन्हा सुरू करण्याच्या योजनेमुळे पुढील तीन वर्षांत अतिरिक्त 3,000 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

उद्योग विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडू सरकारने फोर्डच्या नेतृत्वासह 2023 पासून उद्योग मंत्री TRB राजा यांच्यासह दोन युनायटेड स्टेट्स भेटी सतत केलेल्या प्रयत्नांमुळे ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील राज्याच्या वेगवान प्रगतीवर प्रकाश पडला आहे ज्याने ऑटोमेकरला राजी केले. यावर प्रतिक्रिया म्हणून फोर्ड ने भारतात परतण्याचा विचार करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मागितली होती.


FAQ:-

  1. 1) Is the Ford car coming back to India?

    The company has not reached a final decision yet

  2. 2) What is the future plan of Ford in India?

    Ford, is planning to re-enter India with a major focus on electric vehicles.

  3. 3) Is Ford Endeavour coming back?

    Expected to arrive in India in early 2025.

2 thoughts on “Ford company भारतात पुन्हा येणार, नवीन प्रीमियम हि गाडी होणार लाँच”

Leave a Reply