Storage problem solve – आजचे डिजिटल युग आहे आणि आपण मेसेज पाठवण्यासाठी सर्रास डिजिटल मीडियाचा वापर करत असतो. त्यातलेच एक मध्यम म्हणजे व्हॉट्स अप आपण मेसेज, फोटो, व्हडिओ आणि पैसे पाठवण्यासाठी वापर करत असतो.स्मार्टफोन वापरणारे बहुतांश लोक व्हॉट्स अपचा वापर करताना दिसतात.हे जगभरातील सर्वात जास्त लोकप्रिय मेसेजिंग एप आहे. भारतातही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. तुम्ही व्हॉट्स एपच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहू शकता. यात आपल्याला व्हिडीओ, ऑडिओ मेसेज पाठवण्याच्या सुविधा मिळतात.
तसेच आपल्याला व्हॉट्स एपवर ग्रुप्स आणि कम्युनिटीज बनवून देखील एकाच वेळी अनेक लोकांना मेसेज करता येतो त्यामुळे रोजच्या आयुष्यातील खूप कामे सोपी झाली आहेत. आजकाल अगदी फॅमिली ग्रुप्सपासून ते कार्यालयीन ग्रुप्स तयार केले जातात. त्यामुळे एखादा मेसेज सगळ्यांना द्यायचा असल्यास मग तो व्हिडीओ, ऑडिओ, फोटो किंवा लिखित स्वरूपात पाठवायचा असेल तर आपण एक मेसेज करून लोकांना कळवू शकतो. पण या सोयीसुविधांबरोबर त्यामागे काही ड्रॉ बॅक देखील येत असतात.
बरेच लोक फोनमध्ये storage problem झाल्यामुळे वैतागलेले आपल्याला दिसतात त्यामुळे मोबाईल हँग होतो. एखादे एप सुरू असताना एकदम मध्येच बंद पडते.आपण व्हॉट्स एप वापर असू तर बऱ्याचदा आपल्या लक्षात आलं असेल की व्हॉट्स एपला स्टोरेज खूप लागते. आपल्या व्हॉट्स एपमधील फोटो,व्हीडिओ, ऑडिओ फाईल्स थेट जाऊन आपल्या फोनच्या गॅलरीमध्ये आणि फाईल मॅनेजरमध्ये सेव्ह होतात. त्यामुळे आपल्याला storage problem येतो आणि मोबाईल हँग होऊ लागतो. मोबाईलमध्ये स्टोरेज शिल्लक राहिले नाही की इतर एप्स अचानक बंद पडतात.मोबाईल स्लो होतो.
Mobile Storage Management
Storage problem पासून वाचण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल मधील स्टोरेज मॅनेज करून या सगळ्या समस्यांपासून सुटका हवी असेल तर खालील स्टोरेज स्टेप्स फॉलो करून पाहा.
डिसअपेअरिंग मेसेज करा टर्न ऑन
मेटाने चार वर्षांपूर्वी व्हॉट्स एप युजर्ससाठी डिसअपेरिंग मेसेज नावाचे एक फिचर सुरू केले आहे.याच्या मदतीने आपण ठराविक टायमर लावून आटोमॅटिक चॅट डिलीट करू शकतो.यात आपल्या सोयी प्रमाणे चोविस तास ते नव्वद दिवसापर्यंतचे टायमर आपण सेट करू शकतो. हे टायमर लावले की आपण लावलेल्या ठराविक वेळा नंतर चॅट ऑटोमॅटिक डिलीट होते.या सोईमुळे युजर्सची प्रायव्हसी देखील वाढते. मोबाईल storage problem दूर होईल
या फिचरचा वापर कसा करायचा ते पाहू
आयफोन युजर्ससाठी (storage problem in iphone )
आयफोनमध्ये यु वर जा, तिथून स्टोरेज अँड डेटावर जा. तिथे मॅनेज स्टोअरवर टॅप करा. तिथे टर्न ऑन डिसअपेरिंग मेसेज हा ऑप्शन दिसेल,त्यावर टॅप करा आणि तुम्हाला चॅट किती वेळानंतर डिलीट झालेले हवे आहे,ती वेळ सेट करण्यासाठी डिफॉल्ट मेसेज टायमर निवडा. एखाद्या ठराविक चॅटसाठी डिसअपेरिंग मेसेजेस फिचर चालू करण्यासाठी अप्लाय टायमर टू चॅटवर टॅप करा.
अँड्रॉईड युजर्ससाठी (storage problem in Android )
आपण आपल्या काँट्रॅक्टमध्ये असलेल्या व्यक्तीच्या प्रोफाइलवर जाऊन उजवी कडील तीन डॉट्सवर टॅप करायचे आणि तिथे असलेल्या डिसअपिअर मेसेज या सेटिंगवर जाऊन टायमर सेट करा. हीच प्रक्रिया आपण आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सगळ्या प्रोफाइलवर जाऊन करू शकतो.त्यामुळे आपण लावलेल्या टायमरला चॅट ऑटोमॅटिक डिलीट होतील.
डिसेबल ऑटो डाउनलोड
आपण व्हॉट्स एपवर अनेक ग्रुप्सवर असतो जिथे आपण कधी जात देखील नसतो आता आणखीन एक नवीन प्रकार आला आले कम्युनिटी तिथे देखील आपण असतो पण अनेकवेळा आपण अशा ग्रुप्सवर न जाता देखील तिथल्या फाईल्स ऑटोमॅटिक डाउनलोड होतात आणि आपला मोबाई स्टोरेज फुल होऊन त्या डिलीट करणे आपल्यासाठी डोकेदुखी होऊन बसते.
आपला मोबाईल वायफायशी कनेक्ट असतो तेव्हा बाय डिफॉल्ट व्हॉट्सअॅप ऑटोमॅटिक मीडिया फाइल्स डाइनलोड होतात. बऱ्याचदा अनेक ग्रुप्स असतात जे आपण रोज पाहत नाही, तरीही त्यातल्या मीडिया फाइल्स आपोआप डाउनलोड होतात.
ऑटोमॅटिक डाउनलोडमुळे फोनमधील स्टोरेज लवकर भरतं. त्यामुळे फोनमधील स्टोरेजसाठी आयफोन व अँड्रॉइड युजर्सनी काही स्टेप्सचा वापर करा.
आयफोन युजर्ससाठी
व्हॉट्सअॅप उघडा आणि खाली उजव्या कोपऱ्यात युवर टॅप करा. तिथे स्टोरेज अँड डेटा सिलेक्ट करा आणि मीडिया ऑटो डाउनलोड सेक्शनपर्यंत स्क्रोल करा, त्यानंतर इच मीडिया टाइपवर टॅप करून नेव्हर ऑप्शन निवडा.
अँड्रॉईड युजर्ससाठी
व्हॉट्सअॅप उघडा आणि वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्सवर टॅप करा नंतर सेटिंग्जमध्ये स्टोरेज अँड डेटा सिलेक्ट करा आणि नंतर मीडिया ऑटो डाउनलोड सेक्शनवर जा.मोबाइल डेटा व वाय-फायसाठी सर्व मीडिया टाइपचे टॅगला ऑफ करा.ऑटो डाउनलोड डिसेबल केल्याने फोनमध्ये काय सेव्ह करायचे, काय नाही याचा कंट्रोल आपल्याला मिळतो.
अशा प्रकारच्या टिप्स फॉलो करून आपण आपल्या मोबाईलचा स्टोरेज फुल होऊन आपला मोबाईल हँग होण्यापासून वाचवू शकतो.