FACT CHECK : खानापूरकरांनो…! तुमच्या मोबाईलवर आलेला वाघाचा VIDEO कणकुंबीचा नाही 🐅 🐅 🐅 🐅
बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर : सध्या सोशल मीडियावर पट्टेरी वाघाचा (Tiger – 🐅 🐅) एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्या व्हिडिओला नेटिझन्सकडून तुफान कंमेन्टस आणि काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. खानापूर तालुक्यातील अनेक गावात बिबट्याचे (Leopard) दर्शन झाल्यानंतर विविध भागात बिबट्याचा वावर सुरूच आहे. मात्र यादरम्यान पट्टेरी वाघाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहेत.
कारवार येथील जुना व्हिडिओ खानापूर तालुक्यातील असल्याचे मेसेज सोशल मिडियात व्हायरल झाल्याने नागरिकांत संभ्रम असून प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
सुपा डॅम परिसरात वाघाचे दर्शन
गेल्या काही दिवसांपूर्वी कारवार येथील सुपा डॅम परिसरातील दिग्गी गावात वाघाचे दर्शन झाल्यापासून बेळगावच्या खानापूर तालुक्यातील (जांबोटी फाॅरेस्ट एरिया) कणकुंबी-हुळंद रोडवर (कणकुंबीजवळ) पट्टेरी वाघ दिसल्याचे इतर ठिकाणाचे जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामुळे सर्वजण रेस्क्यू टीमला विचारणा करत आहेत. सर्व सोडून ही टीम व्हायरल व्हिडिओवर लक्ष देऊन त्याची शहानिशा करत आहे.
FACT CHECK केले असता वाघाचा हा व्हिडिओ कारवार येथील सुपा डॅम परिसरातील असल्याचे दिसून आले. मात्र, हा व्हिडिओ देखील जुना असल्याचे सिद्ध झाले. हा व्हिडिओ कारवार येथील सुपा डॅम येथील असल्याचे दिसून आले.
खानापूरातील दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा (Leopard) वावर पहायला मिळतो. गेल्या काही दिवसांत बिबट्याने या भागातील कुत्री, शेळ्या-मेळ्यांवर हल्ला चढवत त्यांना ठार केल्याने या भागात बिबट्याची मोठी दहशत आहे. सध्या अन्नाच्या शोधार्थ बिबट्या इतत्र भटकताना दिसत आहे, त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
शहानिशा करा, संयम बाळगा : सोशल मिडियात विविध मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. फॉरवर्ड करण्याच्या आधी त्याची शहानिशा करा. अशा मेसेजमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तसेच रेस्क्यू टीमच्या कामात देखील यामुळे अडथळा येत आहे.
Fact Check Tiger Belgaum Khanapur Kankumbi
Fact Check Tiger Belgaum Khanapur Kankumbi