जसजसा काळ बदलत गेला तसा समाज आणि समाजातील चालीरीती बदलत गेल्या. आधीच्या काळात बाईला घरातून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. तिची हद्द चूल आणि मूल इथं पर्यंत मर्यादित होती.पण काळ बदलत गेला महिला शिक्षणासाठी घरा बाहेर पाडल्या. आता एकविसाव्या शतकात तर महिला पुरुषांच्या बरोबरीने नोकरी, व्यवसाय करून कमवू लागल्या आहेत. आता सर्रास Employed women स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसतात.
लग्न झालं की महिलेला एक घर सोडून दुसरीकडे यावं लागतं. दुसरं घर, माणसं सांभाळावी लागतात. त्यांच्यावर नैतिक जबाबदारी येते. हा बदल अवघड वाटणारा असला तरीही अशक्य नक्कीच नसतो. पण, तरीही काही स्त्रीयांना हा बदल नकोसा वाटतो. त्यामुळे त्या महिला या सगळ्यापासून दूर राहतात. सिंगल राहण्याचा निर्णय घेतात.
चूल आणि मूलच्या पलीकडे जाऊन महिलांनी त्यांची कौटुंबिक आणि सामाजिक चौकट मोडून अवकाशात झेप घेतली आहे.पारंपारिक जोखडातून बाहेर पडून उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत.
या सगळ्याचा परिमाण सामाजिक स्थितीवर देखील होताना दिसत आहे. आधी मुलीला शिक्षण चांगले स्थळ मिळावे म्हणून दिले जात होते.आता मात्र मुलींना शिक्षण स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी दिले जाते. मुली आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि त्या स्वतंत्र देखील झाल्या आहेत. आता त्या त्यांच्या आयुष्याचा निर्णय स्वतःच घेऊ लागल्या आहेत. सध्या समाजात मुलींचा अविवाहित राहण्याकडे कल वाढलेला दिसून येत आहे. कोणत्याही बंधनात राहण्यापेक्षा स्वतंत्र राहण्याकडे Employed women कल वाढत आहे.त्यामुळे विवाह संस्था आणि कुटुंब संस्था मोडकळीला येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सर्वेक्षणचा धक्कादायक अहवाल (Employed women)
मॉर्गन स्टँलेच्या सर्वेक्षणात तर एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. 2030 पर्यंत 25 ते 44 वयोगटातील जवळपास 45 टक्के Employed women अविवाहित आणि निपुत्रिक राहतील असा निष्कर्ष निघाला आहे. जर असं झालं तर आपली समाज व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस येऊन. 2030 पर्यंत 25 ते 44 वयोगटातील जवळपास 45 टक्के नोकरदार महिला अविवाहित आणि निपुत्रिक राहतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
का महिला अविवाहित राहण्याला पसंती देत आहेत?
जबाबदारी नको – Employed women स्वतंत्र असून त्यांना कोणाच्याही आर्थिक आधाराची गरज भासत नाही. त्यांना लग्न करून कोणत्याही बंधनात राहायचे नाही. नोकरी-घरदार सगळ्याची जबाबदारी घ्यायची नाही. तसेच लग्न करून एका व्यक्तीबरोबर बंधनात राहून त्यांना जीवन घालवण्यात रस राहिलेला नाही. त्यांना स्वतःवर कोणत्याही प्रकारची जबाबदारी नको आहे. लग्न केलं की कुटूंब आले पुढे जाऊन मुलं बाळांची जबाबदारी आली. ती आजकाल महिलांना नको आहे.
नोकरी आणि घर सांभाळणे वाटते अवघड- Employed women आजकाल नोकरी करून घरातील कामे करणे किंवा घराची जबाबदारी घेऊन नोकरी करणे त्यांना अवघड वाटते. महिलांना स्वतःचे आर्थिक स्वतंत्र प्रिय असल्याने त्यांना नोकरी त्यांचे करिअर सोडायचं नाही. म्हणून त्यांना लग्न करायचे नाही.
मुलांची जबाबदारी नको- महिलांना लग्न करून मुलं जन्माला घालून त्यांची जबाबदारी घ्यायची नाही. कारण त्यांना मुलं झाली तर त्यांच्या करिअरमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतात म्हणून महिला निपुत्रिक राहणे पसंत करत आहेत.
Employed women यांना स्वच्छंदी जगणे झाले प्रिय
महिलांना आता कोणत्याही बंधनात राहायला आवडत नाही. त्यांना त्यांचे स्वच्छंदी आयुष्य कोणत्याही ही जबाबदारी शिवाय आणि कोणाच्याही अडवणुकी शिवाय जगायचे आहे. त्यांना त्यांचे असे आयुष्य प्रिय झाले आहे म्हणून ही महिला अविवाहित राहण्याला पसंती देत आहेत.
मागच्या पिढीकडून मिळालेले धडे
बऱ्याच मुलींनी त्यांच्या आई, मावशी, आत्या अशा त्यांच्या जवळच्या स्त्रियांची लग्नानंतर झालेली अवस्था पाहिलेली आहे. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात त्यांनी एका तरी महिलेवर होणारा घरगुती हिंसाचार पाहिलेला असतो. त्यातून या महिलांच्या मनातून विवाह संस्थेवरचा विश्वास उडालेला आहे. त्यामुळे देखील त्यांना अविवाहित राहायला प्राधान्य देत आहेत.
काय होईल परिमाण?
पण महिलांच्या या निर्णयामुळे पुढे जाऊन आपली सामाजिक व्यवस्था मोडकळीस येईल. महिला अविवाहित राहिल्या तर पुरुषांची ही लग्न होणार नाहीत आणि मग मुलं जन्माला घालण्याचे प्रमाण घटेल. त्यातून चीन आणि जपानमध्ये घटती लोकसंख्या, तरुणांचे कमी होणारे प्रमाण आणि वृद्धांची वाढती संख्या या सारख्या समस्यांना आपल्या देशाला देखील तोंड द्यावे लागू शकते जर 2030 पर्यंत 45 टक्के महिला अविवाहित आणि निपुत्रिक राहिल्या तर भविष्यात खूप साऱ्या समस्या आपल्या देशाला भेडसावू शकतात.
या सगळ्या परिस्थितीचा विचार करता हा अंदाज जर खरा ठरला आणि पुढे महिला अविवाहित राहण्याचा निर्णय घेत राहिल्या तर भारताला भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.