ED recovered Rs 22280 crore from Vijay Mallya, Nirav Modi, Mehul Choksi
Properties worth Rs 14,131 crore – that once belonged to Vijay Mallya – have been seized
Properties worth Rs 22,280 crore of eco-offenders like Mallya, Nirav Modi restored by ED: Nirmala Sitharaman : बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊन पळून गेलेल्या पळपूट्या उद्योगपतींवर सरकार कठोर कारवाई करत आहे. आतापर्यंत विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्ता विकून सरकारने हजारो कोटी रुपये वसूल केले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत ही माहिती दिली (Union Finance Minister Nirmala Sitharaman).
Enforcement Directorate (ED) has successfully restored assets worth Rs 22280 crore
ED has recovered properties valued at Rs 14131.6 crore belonging to fugitive businessman Vijay Mallya
निर्मला सीतारामन म्हणाले, फरार उद्योगपतींच्या मालमत्ता विकून बँकांनी 22,280 कोटी रुपये वसूल केले आहेत. ED ने ही 22,280 कोटी रुपयांची संपत्ती पीडित किंवा दावेदारांना परत केली आहे. एकट्या विजय मल्ल्याची संपत्ती विकून सरकारने 14,131.6 कोटी रुपयांची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना परत केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
नीरव मोदी प्रकरणात 1,052.58 कोटी रुपयांची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी बँकांना परत करण्यात आल्या आहेत. तर, मेहुल चोक्सी प्रकरणात 2,565.90 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करुन तिचा लिलाव करण्यात येणार आहे. नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (NSEL) प्रकरणात, 17.47 कोटी रुपयांची मालमत्ता फसवणुकीला बळी पडलेल्या खऱ्या गुंतवणूकदारांना परत करण्यात आली आहे.
परदेशात दडवलेल्या काळ्या पैशांबाबत काही खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अर्थमंत्री म्हणाल्या की, 2015 च्या काळा पैसा कायद्याचा प्रत्यक्षात अनेक करदात्यांना प्रतिबंध होत आहे आणि ते स्वत: पुढे येत आहेत. परदेशी मालमत्ता घोषित करणाऱ्या करदात्यांची संख्या 2021-22 मध्ये 60,467 वरून 2024-25 मध्ये दोन लाख झाली आहे.
#VijayMallya #NiravModi #MehulChoksi #EDRecovery #AssetSeizure #FinancialFraud #GovernmentAction #BlackMoney #FugitiveBusinessmen #PublicSectorBanks #EconomicJustice #CorruptionFighters #WealthRecovery #IndianEconomy #NirmalaSitharaman #FraudulentAssets #BankingSector #FinancialRegulation #JusticeServed #EconomicReform
ED recovered Rs 22280 crore
ED recovered Rs 22280 crore