दारूमध्ये पूर्ण बुडालेला Bobby Deol अखेर animal चित्रपटामुळे सुधारला

Admin
5 Min Read
Bobby Deol

ॲनिमल चित्रपट हा खूप प्रसिद्ध झाला आणि त्यातच Bobby Deol ना देखील गेल्यावर्षी यातून खूप प्रसिद्धी मिळाली. या सिनेमाच्या आधी त्यांना खूप संघर्ष पहावा लागला आणि त्यातच त्यांना दारूचे व्यसन जडले होते.

Bobby Deol यांच्या humans of bombay ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यात जो सर्वात कठीण काळ आला होता त्यावर भाष्य केले. यावर बोलताना ते म्हणाले की, तुम्ही चूक केल्यावर त्यावर आयुष्यभर पश्चात्ताप करत बसू शकत नाही पण या चुकांमधून तुम्ही कसे शिकणार हे महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीला स्वतःबद्दलच वाईट वाटते तेव्हा ती भावना खूप वाईट असते. या भावनेपेक्षा वाईट काहीच नाही.

Bobby Deol पुढे असे म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अस्थिरता निर्माण होतेच आणि त्या परिस्थितीशी लढणे, या परिस्थितीवर मात करणे खूप कठीण असते. या काळात आपण बुडत चाललो आहोत अशी भावना जोर धरते. याच परिस्थितीतून बॉबी बाहेर आले आणि त्या काळात त्यांचे कुटुंबीय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्यांचे कुटुंबीय त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यायचे पण बॉबी यांचे तसे वागणे पाहून त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची खूप काळजी वाटायची. त्यांच्या डोळ्यात त्या वेदना दिसत होत्या. बॉबी दारूच्या नशेत असल्याने त्यांना हे जाणवत नव्हते. या नशेतून बाहेर पडण्यासाठी त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. बॉबी देओल यांना मनातून कुठेतरी अपराधीपणाची भावना वाटत होती. आपण चुकीच्या मार्गावर जात आहोत आणि एक वडील म्हणून ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यासाठी आपण थांबले पाहिजे असे मनापासून त्यांना वाटू लागले.

बॉबी देओल यांच्या मुलांनाही चित्रपट सृष्टीत काम करायचे आहे. ते त्यांच्या मुलांशी यावर चर्चा करतात. बॉबी यांनी त्यांच्या मुलांना चित्रपट सृष्टीत येणारा संघर्ष आणि अभिनय क्षेत्रातील येणाऱ्या अडचणी वडील या नात्याने समजावून सांगितल्या आहेत.

- Advertisement -

Bobby Deol’s Struggle Period

२०१४ ते २०१६ हा तोच काळ होता ज्या काळात बॉबी यांनी हाय प्रोफाईल पब्समध्ये आणि नाईट क्लबमध्ये काम न मिळाल्यामुळे निराश होऊन डीजेचे काम सुरू केले.

Bobby Deol debut in acting field

बॉबी यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला अवघ्या वयाच्या ८ व्या वर्षी सुरुवात झाली. धरम – वीर हा १९७७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात बॉबी यांनी बालकलाकार म्हणून काम केले. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या बरसात चित्रपटाद्वारे त्यांची नायक म्हणून चित्रपट सृष्टीत एन्ट्री झाली.

Bobby Deol’s failure

बॉबी देओल यांनी तीन हिट चित्रपट दिले त्यांनतर त्यांच्या चित्रपटाला अपयश येऊ लागले. बरसात चित्रपटानंतर १९९७ साली प्रदर्शित झालेल्या गुप्त, १९९८ साली प्रदर्शित झालेला सोल्जर आणि २००० साली प्रदर्शित झालेला बादल हे चित्रपट चांगलेच हिट झाले. एवढे असूनही बॉबी यांना विशेष चित्रपट मिळाले नाहीत. त्यांनतर त्यांनी किस्मत, बरदाश्त, अब तुम्हारे हवाले वतन साथियो, नन्हे जैसलमेर, झूम बराबर झूम, पोस्टर बॉइज असे चित्रपट केले पण हे हे सर्व चित्रपट फ्लॉप झाले. त्यांना लहानसहान भूमिका मिळू लागल्या. यांनतर त्यांनी २०११ मध्ये त्यांनी यमला पगला दिवाना या चित्रपटात काम केले पण या मल्टी स्टारर चित्रपटाचा फारसा उपयोग त्यांच्या करिअरसाठी झाला नाही.

Youtube – Humans of Bombay

बॉबी यांनी त्यांच्या २८ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत जवळपास ४५ चित्रपटात काम केले आहे पण animal हा त्यांचा एकमेव ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. याआधी त्यांचे फक्त ६ चित्रपट हिट झाले ज्यात बरसात, यमला पगला दिवाना, गुप्त, सोल्जर, बादल आणि हाऊसफुल ४ या चित्रपटांचा समावेश आहेत.

Personal Information of Bobby Deol

बॉबी देओल यांचा जन्म २७ जानेवारी १९६९ रोजी झाला. बॉबी देओल यांनी एका मुलाखतीत असेही सांगितले की, लहानपणी त्यांचा मोठा भाऊ सनी देओल हे त्यांना अभ्यास करण्यासाठी मारायचे. सनी शिवाय त्यांनी त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच धर्मेंद्र कडूनही मार खाल्ला आहे.

बॉबी हे लहान असताना त्यांचा आवाज नाजूक होता त्यामुळे फोनवर अनेकदा महिला बोलत असल्यासारखे वाटायचे. याच कारणाने त्यांना बहन जी म्हणून संबोधले जायचे. याचाही फायदा बॉबीने घेतला आणि अनेकदा त्यांनी मुलगी बनून लोकांना फोन केले आहेत. १९९६ मध्ये तान्या आहुजा यांच्यासोबत बॉबी यांचा प्रेमविवाह झाला. तान्या आहुजा या एक कॉस्च्युम डिझायनर आहेत.

Bobby Deol Net Worth

बॉबी देओल यांची संपत्ती ५० करोड रुपये असल्याचे एक रिपोर्ट नुसार समोर आले आहे. त्यांची वार्षिक कमाई ८ कोटी रुपये आहे. ते एका चित्रपटासाठी २ ते ४ कोटी रुपये घेतात. त्यांना लक्झरी गाड्यांची देखील आवड आहे. या सोबत त्यांना sunglasses देखील आवडतात. नेहमी त्यांच्या सोबत sunglasses असतात.


FAQ

Share This Article
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *