Accused of corruption, Drug inspector Shamli suspended
ड्रग इन्स्पेक्टरने मागितली लाच
उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात ड्रग्ज इन्स्पेक्टर निधी पांडेचा लाच मागणारा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर सरकारने कठोर कारवाई केली आहे. आरोपी ड्रग्ज इन्स्पेक्टरला तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ती बिनधास्त केमिस्टकडे लाच मागताना दिसत आहे.
#शामली की ड्रग इंस्पेक्टर निधि पांडेय की वसूली का अंदाज देखिए..
"बार्गेनिंग न करियो. दुकान चलानी है या नहीं. चलानी है तो जो पैसा बताया है निकाल"
शामली में 3 साल तक "वसूली आतंक" मचाने के बाद मैडम सस्पेंड हुई है
बीजेपी के बड़े नेता रिश्तेदार है और कई प्रशासनिक अफसर घर में है pic.twitter.com/FaSY78e39D
— Narendra Pratap (@hindipatrakar) December 31, 2024
ड्रग्ज इन्स्पेक्टर निधी पांडे हिची ही पहिली पोस्टिंग असल्याचं सांगण्यात येत आहे. नुकताच तिने एका मेडिकल स्टोअरवर छापा टाकला होता. यावेळी ओके रिपोर्ट दाखल करण्याच्या नावाखाली लाचेची मागणी करण्यात आली. त्यानंतर कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकारने ड्रग्ज इन्स्पेक्टरला निलंबित केलं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, निधी पांडे मेडिकलवाल्याशी कशा प्रकारे बोलत आहे. भाव करू नकोस, दुकान चालवायचं आहे की नाही? तुला ते चालवायचं असेल तर मी सांगितले तेवढे पैसे काढ. नाहीतर तुझ्या इथे अनेक कमतरता आहेत, थेट एफआयआर दाखल होईल. आता तूच बघ असं निधीने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. यामुळे केमिस्ट संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
निधी विरोधात अनेक दिवसांपासून तक्रारीही केल्या जात होत्या, मात्र कारवाई होत नव्हती. निधी पांडेंच्या निलंबनाबाबत प्रधान सचिव पी. गुरुप्रसाद यांनी आदेश जारी केले आहेत. या आरोपांची चौकशी करण्यासाठी तपास अधिकारी नियुक्त केले आहेत. सोशल मीडियावर हा व्हि़डीओ जोरदार व्हायरल होत आहे.
Drug inspector Shamli suspended
Drug inspector Shamli suspended