DNA test for temple buffalo
Karnataka cops rely on DNA test to settle fight over ‘holy’ buffalo
Biological test for animal ownership
DNA test ordered to settle fight between 2 villages over temple buffalo
कर्नाटकातून एक आश्चर्यजनक बातमी समोर आली आहे. येथे रेड्याची (म्हैस) डीएनए टेस्ट करून तिची मालकी ठरवली जात आहे. खरे तर, हा रेडा एका मंदिराचा असून शेकडो लोक त्याची पूजा करतात. मात्र या रेड्याचा मालक कोण? यावरुन दोन गावांमध्ये वाद सुरू आहे. हे प्रकरण कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील आहे.
fight is between Kunibelakere and Kulagatte villages
येथील कुनीबेळकेरे आणि कुलगट्टे गावांतील हा वाद आहे. दोन्ही गावांमधील अंतर सुमारे 40 किमी आहे. सध्या या रेड्याला शिवमोग्गा गोशाळेत पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. 2021 मध्येही असाच वाद उद्भवला होता, तेव्हाही मालकीचा वाद डीएनए चाचणीद्वारेच सोडवण्यात आला होता.
buffalo was dedicated to Kunibelakere’s village deity Kariyamma Devi
DNA test for temple buffalo
असं आहे संपूर्ण प्रकरण : गेल्या 8 वर्षांपूर्वी कुनीबेळकेरे गावातील करियम्मा देवीला एक रेडा (म्हैस) अर्पण करण्यात आला होती. यानंतर आता शेजारील बेलेकर गावात नुकतीच एक रेडा आढळून आली. हा रेडा होन्नाळी तालुक्यातील कुलगट्टे गावातून बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
कुलगट्टे गावातील लोकांनी हा रेडा आपल्या गावी नेली आहे. संबंधित रेडा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे याच गावातील मंडप्पा रंगनवार सांगतात. आता कुनीबेळकेरे गावातील लोक या रेड्यावर आपला हक्क सांगत आहेत. हा वाद वाढत गेल्याने आता यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.
महत्वाचे म्हणजे, रेड्याच्या वयाचाही वाद आहे. रेड्याचे वय 8 वर्षे आहे, असा दावा कुनीबेळकेरेचे लोक करत आहेत. याच बरोबर रेड्याचे वय 3 वर्षे असल्याचे कुलगट्टे येथील लोक सांगत आहेत. तर पशुवैद्यकांच्या मते संबंधित रेड्याचे वय 6 वर्षं आहे. जे कुनीबेळकेरे गावाच्या दाव्या नजिक जाणारे आहे. मात्र, कुलगट्टे गावातील लोक हे मान्य करण्यास तयार नाहीत. यानंतर आता कुलगट्टे गावातील 7 जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करत डीएनए चाचणीची मागणी केली आहे.
यासंदर्भात बोलताना, जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार संतोष यांनी म्हटले आहे की, डीएनए सॅम्पल गोळा करण्यात आले आहे. निकालानंतर वाद संपुष्टात येईल.
#Karnataka #BuffaloOwnership #DNATest #VillageDispute #AnimalRights #HolyBuffalo #TempleAnimal #Kunibelakere #Kulagatte #KariyammaDevi #PoliceIntervention #AnimalWelfare #LegalBattle #CattleOwnership #VillageConflict #DNAAnalysis #Shivamogga #AnimalCustody #CommunityIssues #JusticeForAnimals
DNA test for temple buffalo
DNA test for temple buffalo