आजकालचा जमाना हा डिजिल आहे. आज प्रत्येकाच्या हातात एक मोबाईल आणि त्यात कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतो म्हणून कॅमेरा कंपन्या कॅमेरामध्ये नवीन नवीन गॅजेस्ट बाजार सतत आणत असतात. प्रत्येकाच्या जवळ आज मोबाईल असल्याने एक व्लोगिंगचे नवीन जग सगळ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. यू ट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून अनेक लोकं आज व्हिडीओ पोस्ट करत असतात. त्यामुळे बाजारात सतत नवनवीन टेक्नॉलॉजी असलेल्या नवीन मशिन्स येत असतात. त्यातल्याच एक व्लोगिंग कॅमेराची माहिती आपण पाहणार आहोत. Dji Pocket 2 हा 9 नोव्हेंबर 2020 रोजी डिजेआय नावाच्या गॅजेट मेकर कंपनीने लॉंज केला आहे.
Dji Pocket 2 हा छोट्या आकाराचा स्थिर कॅमेरा अपग्रेड केलेला कॅमेरा आहे.हा कॅमेरा अधिक मायक्रोफोन्स सह लॉंच झाला आहे. Dji Pocket 2 कॅमेरा DJI Osmo pocket या कॅमेराचा नेक्स्ट जनरेशन कॅमेरा आहे. या कॅमेरात 140 मिनिटांपर्यंत टिकणारी बॅटरी देण्यात आली आहे. तर या कॅमेराचे वजन अवघे 117 ग्राम आहे म्हणजे हा कॅमेरा घेऊन आपण सहज कुठेही फिरू शकतो इतका हा कॅमेरा हलका आणि वापरायला सोयीस्कर आहे.यात तीन थ्री एक्सिस गिंम्बल्स आहेत. या कॅमेरामध्ये 4k कॅमेरा आहे. याच्या पूर्वीच्या जनरेशनच्या तुलनेत यात मोठा सेन्सर आणि मोठी लेन्स देण्यात आली आहे. या कॅमेरात चार मॅक्रोफोन्स आणि प्री-प्रोग्रॅम केलेल्या शूटिंग मोड साहित सुधारतील ऑडिओ सिस्टीम आहे.डिजेआय पॉकेट 2 कॅमेराची किंमत ₹23,490 तर पॉकेट 2 क्रिएटर कॉम्बोची किंमत ₹33,990 इतकी आहे.
Dji Pocket 2 मध्ये काढता येण्यासारख्या प्लेटसह मॉड्युलर डिझाइन आहे. DJI Osmo pocket प्रमाणे हा देखील स्टॅण्ड अलोन स्थिर कॅमेरा म्हणून वापरला जाऊ शकतो. हा कॅमेरा मोबाईलशी देखील कनेक्ट करता येऊ शकतो.तसेच वायरलेस ऍक्सेसरीज द्वारे लांबून देखील ऑपरेट केला जाऊ शकतो.
तुम्ही ट्रॅव्हल व्लोगर असाल किंवा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरून तिथले नैसर्गिक सौंदर्य कॅमेरात टिपण्याचा छंद असेल किंवा तुम्ही यू ट्युबर असाल या सगळ्या कॅटेगरीसाठी हा कॅमेरा उपयुक्त आहे.हा तुम्हाला अधिक सुस्पष्ट आणि प्रो सारखे व्हिडीओ शूटिंग करून देऊ शकतो.
Dji Pocket 2 price
Dji Pocket 2 हा कॅमेरा खरेदी करण्यासाठी ऑफ लाईन आणि ऑन लाईन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.ऑन लाईन खरेदीसाठी तुम्ही फिल्फ कार्ड आणि एमेझॉनचा वापर करू शकता.डिजेआय पॉकेट 2 कॅमेराची किंमत ₹23,490 आहे तर पॉकेट 2 क्रिएटर कॉम्बोची किंमत ₹33,990 इतकी आहे.
Dji Pocket 2 कॅमेरा
Dji Pocket 2 या कॅमेरात 1/1.7 इंच इमेज सेन्सर आहे.हा कॅमेरा हाय रिजॉल्युशन मोडमध्ये 64 मेगापिक्सल किंवा 16 मेगापिक्सल इमेज कॅप्चर करू शकतो. या कॅमेरात 20mm/f.19 लेन्स बसवण्यात आली आहे.या कॅमेरात 100MBps बिटरेटर 4k/60fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड केले जाऊ शकतात.या कॅमेरात HDR व्हिडीओ देखील जोडला जाऊ शकतो.
Dji Pocket 2 कॅमेराची वैशिष्ट्ये काय आहेत?
Dji Pocket 2 कॅमेरात प्रो मोड आहे. ज्यामध्ये तुम्ही ISO शटर स्पीड, EV आणि फोकस मोड सारख्या प्रगत कॅमेरा सेटिंग्ज करू शकता.तुम्ही या कॅमेरा मधील Active Track 3.0 या सिस्टीम द्वारे तुम्ही एखादा विषय निवडू शकता आणि डिजेआय पॉकेट 2 कॅमेरा तो आपोआप त्याच्या फ्रेममध्ये ठेवू शकतो. या कॅमेरात स्लो मोशन फीचर्स आणि तीन वेगवेगळ्या टाइम-लॅप्स ऑपरेशन सुविधा देखील आहेत. हा कॅमेरा हायपरलॅप्स सुविधा अतिरिक्त स्मूथनेससाठी इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायजेशन (EIS) ला आटोमॅटिकली संकलित करतो. या मोडमध्ये वापरकर्ते 180 डिग्री पॅनोमध्ये चार फोटो कॅप्चर करू शकतात. आणि 3×3 पॅनो सेटिंगच्या माध्यमातून नऊ फोटो एकत्र करू शकतात. वापरकर्ते या कॅमेराच्या माध्यमातून थेट फेसबुक किंवा यू ट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमिंग पण करू शकतात. या कॅमेरामध्ये एक स्टोरी मोड ही आहे ज्यातून वापरकर्ता कॅमेरा मूव्हमेंट,कलर प्रोफाइल, टेंम्पेट्स पण निवडू शकतो.आणि सोशल मीडियावर शेअर करू शकतो.
नुसता Dji Pocket 2 कॅमेरा आणि डिजेआय पॉकेट कंम्बोमध्ये काय फरक
तुम्ही Dji Pocket 2 कॅमेरा नुसता मागवला तर तुम्हाला नुसता कॅमेरा मिळणार पण जर तुम्ही डिजेआय पॉकेट 2 कॅमेराचा कंम्बो पॅक मागवला तर तुम्हाला त्याबरोबर तेरा प्रकारच्या उपयुक्त एक्सेसरीज मिळणार आहेत.
असा हा व्लोगर्सना उपयुक्त आणि नवीन टेक्नॉलॉजीने युक्त, कुठेही घेऊन जायला आणि हाताळायला सोपा असा कॅमेरा आहे.या कॅमेरात खूप सारे हायटेक आणि हाय कॉलेटी फीचर्स आहेत.
FAQ
Does DJI Pocket 2 take pictures?
Glamour Effects are available in photo and video modes when using Pocket 2 independently and with a smartphone.
Does the DJI Pocket 2 have a zoom?
8x Zoom. Looking for crazy detail? When taking 64MP photos, the stabilized camera takes sharp 8x zoom shots.
Can I use DJI Pocket 2 without SD card?
Can DJI Pocket 2 take photos or videos without an SD card inserted? No. Make sure a microSD card is inserted before shooting.